Monday, February 3, 2025

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर


‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा" कार्यक्रमाचा समारोप


नांदेड (१७/१/२५) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी सार्वजनिक वाचनालय होळकरनगर सिडको नांदेड येथे शासनाने दिलेल्या १ जानेवारी २०२५ ते १५ जानेवारी २०२५ पर्यंत " वाचन संकल्प महाराष्ट्राचा" हा उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, क्रांतीकारी राणी तुळसाबाई होळकर, राजमाता जिजाऊ भोसले, विरागंणा झलकारीबाई यांच्या जयंतीनिमित्त ३ जानेवारी ते ४ जानेवारी रोजी "ग्रंथ प्रदर्शन"चा व १७ जानेवारी २०२५ रोजी महिला ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम घेवून " वाचन संकल्प महाराराष्ट्राचा " या अभियानाची सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात सौ. सावित्रा शूरनर म्हणाले, वाचन संस्कृती वाढवण्यासाठी हा उपक्रम सतत चालू ठेवून समाजांत वाचनाचे महत्व समजावून सांगावे लागते. वाचन संस्कृती वाढवावी व विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीत मदत व्हावी, म्हणून शासनाने वाचनालयाची निर्मिती केली आहे. पंरतू शासन अनुदान वाढवून देत नाही, ग्रंथपाल यांना वेतन देतं नाही, त्यामुळे वाचन संस्कृतीचे कार्यक्रम कागदावरच दिसून येतात, यापुढे शासनाने या गोष्टीकडे लक्ष घालून वाचन संस्कृती वाढविण्याकडे लक्ष घालावे, असे वाचकांच्या निदर्शनास सावित्रा शूरनर यांनी आणून दिले.


कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर म्हणाले, महिलांनी राष्ट्रमाता सावित्रीमाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पाल्यांना घडवावे. सावित्रीमाईमुळे शिक्षण मिळाले, शिक्षणामुळे ज्ञान मिळाले, त्या ज्ञानाचा फायदा स्वतः चे आरोग्य व मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी करावे. चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज आहे. वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी वाणात कंगवे चमचे देण्याऐवजी महापुरूषाचे पुस्तके भेट द्यावी, असे प्रतिपादन केले. प्रथम प्रस्ताविक करतांना गोविंदराम शूरनर म्हणाले, स्त्रीयांना शिक्षणाचे दारे खुली करण्यासाठी प्रस्थापिताकडून फुले दांपत्याने शेणमारा खाला, स्त्रियांना पुरूषा बरोबर समान अधिकार मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी प्रस्थापिताचा विरोध असतानाही हिंदू कोड बिल संसदेत पास करून घेतले. त्यामुळेच आजची स्री सन्मानाने उच्च पदापर्यंत जाऊ लागले आहेत. त्यासाठी लोककल्याणासाठी ज्यांनी काम केले त्या महापुरुषांची जयंती सण म्हणून साजरी करावी व तसे संस्कार पाल्यावर करावेत, असा संदेश दिला. 

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रंथालय तपासणी अधिकारी कैलास गायकवाड, ग्रंथालय संघाचे सचिव सचिन पाटील, दत्ताजी काकडे उपस्थित होते. सौ. दिपा गायकवाड, सौ. राधाबाई जाधव, शुभांगी कांबळे, ज्योती कसनकर तसेच अनेक महिला भगिनींनी ग्रंथ वाचन कार्यक्रमात सहभाग घेतला. शेवटी पुस्तके ज्ञानदानात भेट देवून हळदी कुंकूचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे शेवटी सविता हेळगीरे यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...