फार्मसी विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये खूप संधी : नवनाथ ढवळे
गणपती फार्मसी, टेंभुर्णी मध्ये स्पर्धापरीक्षांवर कार्यशाळा संपन्न
Rashtrabharti Desk 22/2/2025| श्री गणपती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च, टेंभुर्णी येथे आयोजित "फार्मा कॉम्प्युटिटीव एक्झाम्स: स्टेट, नॅशनल व इंटरनॅशनल ऑपोर्ट्युनिटिस" या विषयावर वर्कशॉपमध्ये बोलताना राज्य विक्रीकर अधिकारी नवनाथ ढवळे यांनी विद्यार्थ्यांना विस्तृतपणे औषधनिर्माण शास्त्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या संधी याबद्दल माहिती दिली. तसेच पॅरामेडिकल क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा खूप मोठ्या संधी उपलब्ध असून, मुलांनी आता याकडे लक्ष देऊन संधीचा फायदा घ्यायला हवा. सध्या फार्मसीमध्ये मुलींची वाढलेली संख्या, तसेच प्रायव्हेट सेक्टरमधील नोकरीच्या संधी बघता मुलांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये तसेच देशाबाहेरील संधींचा सुद्धा विचार करून, त्यानुसार आपले स्किल्स अवगत करून घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
श्री. ढवळे यांनी थोडक्यात जीपॅट, नायपर, गेट, जीआरई टोफेल, फार्मसी ऑफिसर, रेल्वे फार्मासिस्ट, आर्मी, हॉस्पिटल फार्मासिस्ट या सारख्या विविध पदांबाबत तसेच अभ्यासक्रम याबद्दल विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली. आपल्या आई-वडिलांचे स्वप्न तसेच विद्यार्थ्यांची चिकाटी नक्कीच यशस्वी वाटचाल ठरेल, यात शंका नसल्याचे प्रतिपादन प्राचार्या डॉ. रुपाली बेंदगुडे यांनी केले व जास्तीत जास्त मुलांनी याकडे लक्ष देऊन यश मिळविले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. वर्कशॉपला विद्यार्थ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून भविष्यात महाविद्यालयातील मुलांना सरकारी सेवेमध्ये सहभागी झाल्याचे पाहण्याची सचिव डॉ. रवींद्र बेंदगुडे यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रा. डॉ. सचिन सकट, प्रा. डॉ. प्रशांत मिसाळ, प्रा. नामदेव शिंदे, प्रा. शिवराज ढगे, प्रा. कोमल साळुंखे, प्रा. धनश्री कारंडे आदी. शिक्षक, प्राचार्या डॉ. रुपाली बेंदगुडे, सचिव डॉ. रविंद्र बेंदगुडे, उपाध्यक्ष श्री. बाबा येडगे, अध्यक्ष अँड. विजयराव हिरवे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रेनिंग प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. नामदेव शिंदे यांनी केले.
No comments:
Post a Comment