Monday, February 3, 2025

चिकन पार्टीचे पैसे दिले नाही म्हणून मित्राने केली मित्राचीच हत्या

चिकन पार्टीचे पैसे दिले नाही म्हणून मित्राने केली मित्राचीच हत्या 

पनवेल (31/1/25) : चिकन पार्टीसाठी पैसे दिले नाही म्हणून मित्रानेच आपल्या मित्राची हत्या केल्याचा भयानक प्रकार खारघर मध्ये घडला आहे. जयेश वाघे असे मृत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मन्नू दिनेश शर्मा याला अटक केली असून त्याच्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मृत जयेश हा पनवेल महानगरपालिका येथे मलनिस्सारण वाहनावर सफाईचे काम करत होता. 23 जानेवारीला रात्रीच्या सुमारास आदिवासी वाडी, बेलपाडा, खारघर येथे क्रिकेट मैदानाच्या बाजूच्या रस्त्यावर जयेश आणि त्याचे इतर मित्र हे चिकन बनवत होते. मात्र मन्नू यांच्याकडून चिकनसाठी कोणतीही वर्गणी येत नाही, पैसे मिळाले नाहीत याच कारणावरून जयेश आणि मन्नू यांच्यात वाद झाला. पुढे भांडण वाढलं. जयेशने मन्नू याच्या कानाखाली मारली. त्यामुळे मन्नू हा प्रचंड संतापला आणि त्याच रागाच्या भरात त्याने जयेशला हाता बुक्यांनी छातीत आणि पोटावर मारहाण केली. एवढंच नव्हेतर क्रिकेटच्या लाकडी बॅटने जयेशच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर प्रहार केले. मारहाणीमुळे जयेश हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी तातडीने एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यावर खारघर पोलिस तेथे दाखल झाले. आरोपी मन्नू विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पनवेल पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...