Monday, February 3, 2025

रासपचा पंतप्रधान नंदगडला येईल : महादेव जानकर

रासपचा पंतप्रधान नंदगडला येईल : महादेव जानकर 

महादेव जानकर राष्ट्रीय समाजाचा आवाज बनून मैदानात लढत आहेत, त्यांना साथ देणे गरजेचे : अक्कीसागर


नंदगड (क्रांतिवीर संगोळी रायन्ना स्मृती/बलिदान स्थळ येथून...) : जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत 26 जानेवारीला नंदगडला येत राहणार. रासपाचा मुख्यमंत्री झाल्यानंतर तो नंदगडला येईल. रासपचा पंतप्रधान देखील नंदगडला येईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर माजी मंत्री महाराष्ट्र यांनी केले आहे. श्री. जानकर हे नंदगड ता - खानापुर जिल्हा बेळगाव येथे  राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित राष्ट्रवीर संगोळी रायन्ना राज्याभिषेक वार्षीकोत्सव -१७ वा कार्यक्रमात बोलत होते. यावेळी रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर, राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवलिंगप्पा किन्नुर, मखनापुर गुरूपिठाचे सोमेश्वर स्वामी, जोकानहट्टी(गोकाक) येथील योग सिद्धेश्वर आश्रमाचे बिळीयान सिद्ध स्वामी, रामदुर्ग येथील पूर्णानंद आश्रमाचे कृष्णानंद स्वामी उपस्थित होते.

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर उपस्थितांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, सन 2008 सालापासून अंखडपणे राष्ट्रीय समाज पक्ष संगोळी रायन्ना राज्याभिषेकाचा कार्यक्रम नंदगडला घेत आहे. सुरुवातीला येथे काहीही नव्हते. राष्ट्रीय समाज पक्षाने लक्ष घातल्यानंतर कर्नाटक शासनाने दिले. रासपच्या चळवळ पाहून सर्वच सत्ताधारी राजकीय पक्षांनी नंदगडच्या विकासासाठी सहकार्य केले आहे. संगोळी रायन्ना कन्नडवीर नसून राष्ट्रवीर बनले पाहिजेत, यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची चळवळ चालू आहे. तमिळनाडू, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तेलंगणा सर्वच राज्य प्रदेशातून राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी येत असतात. राष्ट्रीय समाज पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणीची वार्षिक २ बैठका पैकी १ नंदगड येथे आयोजित केली जाते. संगोळी रायन्नाचा इतिहास उजेडात आल्यानंतर सर्वप्रथम राष्ट्रीय समाज पक्षाने 'समाज संगम राष्ट्र यात्रा' काढून २००८ मध्ये देशाच्या कानाकोपऱ्यात संगोळी रायन्नाचे महान कार्य पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. संगोळी रायन्ना समाधीस्थळ राष्ट्रीय स्मारक बनले पाहिजे, रासपची इच्छा आहे. 


कर्नाटकच्या जनतेने राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार खासदार विधानसभा, संसदेत पाठवावेत, असे आवाहन महादेव जानकर यांनी केले. जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत 26 जानेवारीला नंदगडला येत राहणार. रासपाचा मुख्यमंत्री झाल्यानंतर तो नंदगडला येईल. रासपचा पंतप्रधान देखील नंदगडला येतील. स्वामीजींनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या पाठीशी आशीर्वाद उभा करावा. राणी चेन्नमा, छ. शिवाजीराजे, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर आदी सर्वच महामानवांचा विचार घेऊन राष्ट्रीय समाज पक्ष वाटचाल करत आहे.

रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर संगोळी रायन्ना पुतळ्याजवळ उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांचा राज्याभिषेक आयोजित करण्याचे कारण, क्रांतिवीर रायन्ना यांस आपल्या भारतीयांचे स्वराज्य आणावयाचे होते, त्यासाठी ते ब्रिटिश कंपनी सरकार विरोधात लढले. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता वयाच्या 33 व्यां वर्षी आपले बलिदान दिले. विशेष म्हणजे आजच्या प्रजासत्ताक दिवशी रायन्ना स्मृती/बलिदान दिवस आहे आणि त्यांचा जन्मदिन हा आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे. त्यांना अभिप्रेत असलेले भारतीयांचे स्वराज्य, त्यासाठी त्यांनी दिलेला लढा, बलिदान याची सर्व आठवण लक्षात घेऊन महादेवजी जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे सन 2008 पासून दरवर्षी येथे क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांचा राज्याभिषेक कार्यक्रम घेतला जात आहे. रायन्ना सारखा देशभक्त अन् शुरवीर पुत्र प्रत्येक घरी व्हावा, असे बोलले जाते. पण रायन्ना बनणे हे तितके सोपे नाही. महादेवजी जानकर हे सुद्धा आपले घर दार सोडून राष्ट्रीय समाजाचा आवाज बनून ते मैदानात आजही लढत आहेत. त्यांना साथ देणे गरजेचे आहे. आज राष्ट्रीय समाज पक्षातर्फे आयोजित क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्या राज्याभिषेक कार्यक्रमास रासपचे कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, गुजरात आदी. राज्यातून विविध राष्ट्रीय समाजातील लोक येथे आलेले आहेत. दरवर्षी येथे येत असतात. विविध जाती धर्म  प्रांतांतील लोक म्हणजेच राष्ट्रीय समाज होय आणि अशा सर्वांचा पक्ष म्हणजेच राष्ट्रीय समाज पक्ष होय. क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांचे क्रांतिकारी कार्य, त्यांस अभिप्रेत असलेले स्वराज्य संकल्पना, त्यांचा लढा आणि त्यासाठी त्यांचे बलिदान आदिचे स्मरण करून रायन्ना यांस आपण आदरांजली वाहुया. तसेच आपणां सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


सकाळी महादेव जानकर यांच्याहस्ते, पुजारी गोविंद चव्हाण, श्रीमती चव्हाण आई यांच्या समवेत संगोळी रायन्ना राज्याभिषेक करण्यात आला. सिद्धप्पा अक्कीसागर यांनी कन्नडमध्ये भाषण केले. शालेय विद्यार्थ्यांनी राणी चेंनम्मा व संगोळी रायण्णा त्यांची वेशभूषा परिधान करून नाटिका सादर केले. संगोळी रायन्ना रायन्ना समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी/कार्यकर्ते देशभरातून उपस्थित होते. राष्ट्रीय संघटक गोविंदराम शुरनर, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य तथा ईशान्य भारत प्रभारी डॉ. मनोज निगडकर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, कर्नाटक रासपा प्रभारी शिवलिंगप्पा जोगीन, तेलंगणा राज्य प्रभारी रमाकांत करगटला, महाराष्ट्र राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, कर्नाटक राज्य महासचिव शरणबसप्पा दोड्डमनी, मराठवाडा रासप नेते ओमप्रकाश चितळकर, उत्तर कर्नाटक रासपा प्रभारी सुनीलदादा बंडगर, बेळगांव प्रभारी बलराम कामन्नावर, महाराष्ट्र सचिव नरेशकुमार मंडल (नागपूर), प. संपर्क प्रमुख विनायकमामा रुपनवर (पुणे), प. महाराष्ट्र संघटक कालिदास गाढवे(आटपाडी), युवा नेते अजित पाटील(सांगली), कलबुर्गी माजी जिल्हाध्यक्ष देवेंद्र चिगरहल्ली, नंदगडचे सामाजिक नेते किशोर कुरिया, रासपचे ज्येष्ठ नेते शिवाजीबुवा गावडे (उमरगा), कर्नाटक कुरबर संघ पदाधिकारी राजश्री यरनाळ, सूर्यकांत गुंडाळे (लोहा नांदेड), परमेश्वर पुजारी (मोहोळ सोलापूर), रासेफचे महावीर सरक (सातारा), पत्रकार आप्पाजी पाटील दै. तरुण भारत, रमेश संगप्पा पुजारी, हालसिद्धप्पा आदी उपस्थित होते.






No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...