चिंचणी मायाक्कादेवी यात्रेला राष्ट्रीय समाज पक्षाचा पंतप्रधान यावा - महादेव जानकर यांचे साकडे
आरक्षण प्रश्नावरून महादेव जानकरांनी काँगेस, भाजपला केले लक्ष्य
मुंबई (१५/२/२५) : आबासो पुकळे
या देशातली जनता मालक झाली पाहिजे, राजकीय सत्तेत वाटा मिळाला पाहिजे, चिंचणी मायाक्कादेवी यात्रेला राष्ट्रीय समाज पक्षाचा पंतप्रधान आला पाहिजे, मुख्यमंत्री आला पाहिजे, असे साकड राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी घातले. श्री. जानकर यांनी कुलस्वामिनी आई चिंचणी मायाक्कादेवी यात्रेला उपस्थिती लावून विविध गावच्या ओवीकर मंडळास भेट देऊन शुभेच्छ्या दिल्या. अहिल्यादेवी होळकर होळकर ओविकार मंडळ घेरडीचे शाहीर गजानन बंडगर, शाहीर अनिल गडदे, सचिन तामखडे यांच्यासह विविध मंडळाना भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले. यात्रेला भाविक भक्तांना शुभेच्छ्या देत महादेव जानकर यांनी मार्गदर्शन केले.
श्री. जानकर म्हणाले, चिंचणी मायाक्का यात्रेस आलेल्या सर्व भाविक भक्तांचे राष्ट्रीय समाज पक्षातर्फे अभिनंदन करतो. आपल्या राष्ट्रीय समाजाची जागृती झाली पाहिजे. ओवीच्या माध्यमातून शाहीर प्रबोधन करतात. जिस बाप का बेटा लाईक होता है, उस बाप की इज्जत होती हैं! जिस बाप का बेटा बेटी नालायक होती है, उस बाप की बेइज्जत होती है. देशात एवढ्या मोठ्या संख्येने असणारा आपला समाज, त्याची राजकीय भागीदारी शून्य आहे. प्रशासकीय भागीदारी शून्य आहे. म्हणून आपल्या समाजाला आपलं दल मोठं केलं पाहिजे. ज्या पक्षावर आपला समाज विश्वास ठेवतो तो पक्ष आपल्याशी गद्दारी करतो, म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे. तुमच्या मुला मुलींचे भलं करायचं असेल तर तुम्हाला राष्ट्रीय समाज पक्षाला मोठे करावे लागेल. काँग्रेस व भाजप तुम्हाला न्याय देणार नाहित, राष्ट्रीय समाज पक्षच तुम्हाला न्याय देईल, असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, आपल्या समाजात शाहीर निर्माण झाले पाहिजेत, समाजाच्या व्यथा वेशीवर टांगल्या पाहिजेत. या देशात जर न्याय मिळवायचा असेल तर दुसऱ्याचे झेंडे घेऊन न्याय मिळणार नाही. आपलाच झेंडा आणि आपलाच दांडा पाहिजे तरच तुमचा विजय होणार आहे. बांधवांनो, मोठे पक्ष आपल्याला फसवणार आहेत. काँग्रेस फसवणार आहे, भाजप फसवणार आहे, मायाक्कादेवीची शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला न्याय फक्त राष्ट्रीय समाज पक्ष देणार आहे, हे विसरता कामा नये. प्रस्थापित मते घेण्यापूरती गोड बोलतात आणि हक्क द्यायची वेळ आली की तुम्हाला बाजूला सारतात. ४० वर्षं घरी गेलेलो नाही, संसार केलेला नाही, संपत्ती उभा केली नाही, पण राष्ट्रीय समाजाचे दल म्हणून चार राज्यात राष्ट्रीय समाज पक्ष मोठा केला आहे. माझी विनंती आहे, आपली आई ओळखायला शिका. राष्ट्रीय समाज पक्ष आपली आई आहे, दुसरा पक्ष आपला असू शकत नाही. तो आपल्याला उल्लू बनवतो. माझी तुम्हाला शपथ आहे, अहिल्याबाईंची शपथ आहे, एवढा मोठा समाज असताना मागतकरी का बनतो..? देणारा समाज बनला पाहिजे, म्हणून तुम्ही मंडळींनी आपले दल ओळखले पाहिजे, आपली माणसे ओळखली पाहिजेत, ही विनंती करण्यासाठी आपल्या दारात येतोय. वयाच्या चौथ्या वर्षापासून मायाक्कादेवीच्या यात्रेला येतोय. टोलनाके बंद व्हावेत, यासाठी पहिला मोर्चा मीच काढला. समाजाच्या मुलामुलींना आरक्षण मिळावे, म्हणून पहिला दिल्लीत मोर्चा मीच काढला. आम्हाला वाटले काँगेसवाले देत नाहीत, आम्ही भाजप बरोबर युती केली. काँगेस बरोबर भाजप देखील चोर निघाला. आपल्या दोन्ही हिताचे नाहीत. राष्ट्रीय समाज पक्षावर प्रेम करा, येणारा काळ आपला असेल. एक दिवस राष्ट्रीय समाज पक्षाचा पंतप्रधान माखूबाईच्या यात्रेला आल्याशिवाय राहणार, हा तुम्हाला शब्द देतो. यावेळी 'ओवीकार शाहीरांनी आरक्षणाचे आश्वासन देतात आणि आरक्षण कोण देत नाही नाही, असा आरोप काँगेस, भाजपवर केला'. जानकर यांच्या समवेत शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते, रासपचे प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ मोटे, अजित पाटील व अन्य उपस्थित होते.
No comments:
Post a Comment