Tuesday, February 18, 2025

महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० वी जयंती निमित्त रासपाची दिल्लीत महाअधिकार रॅली होणार !

महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० वी जयंती निमित्त रासपाची दिल्लीत महाअधिकार रॅली होणार !

नंदगड येथे राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत निर्णय 

नंदगड (२६/१/२५) : होळकर राजांची लढाई ही दिल्लीवर राज्य करण्याची होती. महाराजा यशंतराव होळकर यांनी दिल्लीला ९ दिवस वेढा घातला होता, दिल्ली ताब्यात आली होती ! होळकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुण्यश्लोक महारानी अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त भारताची राजधानी दिल्ली येथे 31 मे 2025 रोजी राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे 'महाविशाल महाअधिकार रॅलीचे आयोजन केले जाणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत केले. हा पूर्वनियोजित कार्यक्रमस्थळ आणि वेळेनुसार राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक महादेव जानकर यांच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता संगोळी रायन्ना वीर भूमि क्षेत्र, तालुका खानापुर , जिल्हा बेलगावी, कर्नाटक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री शिवलिंगप्पा किन्नुर होते. 

राष्ट्रव्यापी एकसमान राष्ट्रीय शिक्षण, समतामुलक समाज निर्मितीसाठी सर्व राष्ट्रीय समाजाची जातीयगणना, देशातील सर्व नागरिकांना मोफत आरोग्य उपचार, प्रत्येक क्षेत्रात महिलांना संख्येनुसार समान भागीदारी, पुण्यश्लोक महारानी अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती निमित्त अखिल भारत स्तरावर भव्य दिव्य कार्यक्रम, रामलीला मैदान नवी दिल्ली येथे करणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रमुख ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. एक राष्ट्र - एक शिक्षण पद्धती, सर्वांना मोफत आरोग्य व्यवस्था, सर्व जाती जमाती समुदाय गणना आणि दिल्लीत महाअधिकार रॅलीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.





राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वार्षिक दोन बैठका होतात. पहिली अर्ध वार्षिक बैठक नंदगड़ बेळगावी कर्नाटक येथे राष्ट्रवीर संगोळी रायन्ना पुण्यतिथि आणि रासपा आयोजीत रायन्ना राज्याभिषेक वार्षिकोत्सव दिनी २६ जानेवारी रोजी प्रतिवर्षी आयोजित केली जाते . दूसरी अर्ध वार्षिक बैठक महारणी अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मजयंती दिनी ३१ मे रोजी प्रतिवर्षी देशाची राजधानी दिल्ली येथे आयोजित केली जाते. याशिवाय आवश्कतेनुसार विशेष बैठीकांचे आयोजन केले जाते, अशी माहिती रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी दिली. 

एस. एल. अक्कीसागर म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ता ते नेता हा निष्ठावान असला पाहिजे. शिस्तवान असला पाहिजे. आणि ज्ञान असला पाहिजे. प्रथम संघटनेवर निष्ठा असायला हवी नंतर नेत्याशी निष्ठा असायला पाहिजे. संघटनेत शिस्त आणि शेवटी ज्ञान असले पाहिजे. 

राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीवेळी नंदगड येथील कार्यक्रमास रासपचे कार्यकर्ते तेथे उपस्थित होते, त्यांना देखील मार्गदर्शन करण्यात आले. कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा राज्याचे प्रमूख आणि कार्यकारणीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. बैठकीसाठी ज्येष्ठ नेते गोविंदराम शुरनर(नांदेड, महाराष्ट्र), कुमार सुशील(जौनपुर, उत्तर प्रदेश), डॉ. मनोज निगडकर(ईशान्य भारत), शिवलिंगप्पा जोगीन (बेंगलोर, कर्नाटक), काशीनाथ शेवते(सातारा, महाराष्ट्र), ज्ञानेश्वर सलगर(सोलापूर, महाराष्ट्र), रमाकांत करगटला (हैदराबाद, तेलंगणा), शरणबसप्पा दोड्डमणी(कलबुर्गी, कर्नाटक), ओमप्रकाश चीतळकर (जालना, महाराष्ट्र), बलराम कामन्नावर (बेळगावी कर्नाटक) व अन्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025