Wednesday, February 26, 2025

सत्याला पडलेली स्वप्ने

सत्याला पडलेली स्वप्ने

स्वप्न ३ रे

अखिल भारतीय साहित्य परिषद भरली आहे. सर्व भाषिक साहित्यीक जमले आहेत. विविध परिचर्चा, कथा वाचन, काव्य वाचनाने परिषद गजबजून गेली आहे. एका ठिकाणी भाषा विकास या विषयावर चर्चा सुरू आहे. चर्चा खालील प्रमाणे चालू आहे. त्याचे चेहरे स्पष्ट असले तरी त्यांचे भाष्यच तेवढे अवतारीत केले आहेत.

- दोन किंवा अधिकच्या समूहाला भाषेची गरज भासली. 

- - बरोबर आहे, कृती आणि ध्वनी

माध्यमाद्वारे आपले विचार मानस, मानव प्रगट करू लागला आणि भाषेचा उगम झाला. 

- याप्रकारे जगात साधारणतः सहा ध्वनिगट वा भाषा स्रोत आहेत असे मानले जाते. 

- बरोबर आहे. त्यात इंडो-युरोपीयन एक गट आहे.

भारतात दोन भाषा स्रोत आहेत. एक 'द्रविड' आणि दुसरी 'इंडो-युरोपियन'

 - 'इंडो-युरोपियन' मध्ये संस्कृत, इंग्रजी, जर्मन, गुजराती, मराठी आदी भाषा आहेत तर द्रविड मध्ये कन्नड, तेलगु, तमीळ आदी- भाषा आहेत.

- परंतु संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे. संस्कृतापासून सर्व भारतीय नव्हे तर जगातील भाषा तयार झाल्या असे म्हणतात.

 - द्रविड भाषा स्रोत तसेच इतर ५ स्रोत पुर्णत संस्कृत पासून वेगळ्या आहेत. तेव्हा तुमच्या 

- म्हणण्याला अर्थ रहात नाही.

संस्कृत ही सर्वात विकसीत व्याकरण आदी गोष्टीने परिपूर्ण अशी भाषा होती व आहे.

- असावी. संस्कृत भाषा उगमातच विकसीत होती असे म्हणता येईल काय ?

 - नाही. ती हळूहळू किंवा इतर भाषेपेक्षा वेगात वाढली असावी. परंतु उगमातच ती विकसीत असावी असे म्हणता येणार नाही.

 - याचा अर्थ सुरवातीला विविध भाषा प्राकृत, स्वरूपात बोलल्या जात असाव्यात, ज्या अविकसीत वा विकसनशील असाव्यात.

- हे र्तकशुध्द आहे. परंतु संस्कृत पासून सर्व प्राकृत भाषा तयार झाल्या असे म्हटले जाते. ते कसे ?

सार एकच एक 

आदी अर्थ अती अर्थ 

शब्द नव्हे ब्रहम, अर्थ हेच ब्रहम

झोपलेल्या माणसालाच स्वप्ने पडतात. म्हणून कदाचित स्वप्ने-स्वप्नेच राहतात. कधीच खरी न होण्यासाठी. मला जागत्यानेच स्वप्ने पडतात. परंतु ती खरी असतात, झोपतो तेव्हा भविष्यातील गोष्टी दिसतात. ती खरी होण्यासाठी नसतात. जागतो तेव्हा भुतकाळातील गोष्टी दिसतात. ती खरी झालेली असतात. भविष्य काळातील गोष्टी दिसतात ती खरी होण्यासाठी असतात. ज्याला पडते तोच फक्त ही स्वप्ने पाहू शकतो. दुसरा कोणी कोणी नाही. बाकी सर्वांना वेगळेच दिसत असते. तेच त्याना खरेही वाटते. पण खरे काय ? काय ? काय ? अनंताकडे हा प्रश्न आदळत गेला आणि आदळत परत आला. त्याने उत्तर दिले मला मला.!जागत्यापणी तुला जे दिसते तेच खरे एकच एक तुझ्या "सत्याला पडलेली स्वप्ने" जागा असताना 'सत्या'ला हे पहिले स्वप्न पडले आणि सुरू झाली स्वप्नाची एक मालिका. 

शब्द हे दृश्य, अर्थ हे अदृश्य

शब्द हे साधन, अर्थ हे साध्य

शब्द हे किरण, अर्थ हे प्रकाश

शब्द हे ग्रंथ, अर्थ हे ज्ञान 

शब्द हे मार्ग, अर्थ हे ध्येय.


शब्द हे मर्त्य, अर्थ हे अमर 

शब्द हे स्वप्न, अर्थ हे जीवन 

शब्द हे भ्रम, अर्थ हे सत्य 

शब्द अशाश्वत, अनित्य, अर्थ चिरंतन, नित्य


शब्द हे शरीर, अर्थ हे आत्म 

शब्द हे प्राकृत, अर्थ हे संस्कृत 

सार एकची एक 

आदी अर्थ, अंती अर्थ 

शब्द नव्हे ब्रह्म, अर्थ हेच ब्रह्म


- हे केवळ अशक्य आहे .

- ते कसे ?

- प्राकृत आणि संस्कृत याचा अर्थ काय

- प्राकृत म्हणजे निर्सगतः सुरवाती प्राथमिक अवस्था आणि संस्कृत म्हण संस्कार केलेली, नंतरची अवस्था

- म्हणजे प्राकृत वर संस्कार केले अस संस्कृत तयार होते.

- अगदी बरोबर.

- मग प्राकृत अगोदर कि संस्कृत अगोदर

- निःसंशय प्राकृत प्रथम.

- मग विकसीत संस्कृत अवस्था अगोदर अविकसीत प्राकृत अवस्था अगोदर ? अर्थात प्राकृत प्रथम कि संस्कृत प्रथम ?

- प्राकृत प्रथम, संस्कृत नंतर.

- असे असता संस्कृत पासून सर्व भाषा तयार झाल्या हा सिध्दांत खरा ठरत नाही.

- अगदी बरोबर! संस्कृत ही विकसीत भाषा आहे असे म्हणू शकतो. परंतु तिला भाषा जननी म्हणू शकत नाही. त्या भाषेमुळे दुसरी भाषा समृध्द होत गेली असेल. अर्थात भाषा पिलापाने भाषा समृध्दच होत असते. हा सार्वत्रिक नियम आहे.

- म्हणजे आम्ही उलटी गंगा पहात होतो कि काय ?

- अर्थात. चुकीचे गृहीते धरल्यास गणिताचे उत्तर चुकच येणार, म्हणून गृहीते तपासा अन्यथा चुकीच्या उत्तरांना बरोबर समजून गटांगळ्या खात रहाणार.  

- प्राकृत प्रथम नंतर संस्कृत हा सिध्दांत एकमताने मान्य.

प्राकृत प्रथम नंतर संस्कृत ह्या सिध्दांताने भारतीय इतिहासाचे संदर्भ - क्रांतीकारकरित्या बदलेले गेले: संस्कृत भाषा कोणत्या एका आणि अधिक प्राकृत भाषा मधून विकसीत पावली याचा शोध घेतला गेला. भाषा अगोदर बोलली जाते नंतर विकसीत होत रहाते आणि लोक मान्यता, राज मान्यता यावरून तिची विकासाची तिव्रता ठरते. मग संस्कृतची मुळ प्राकृत भाषा कोणती ? तर त्या भाषा (बोली) पाली, अर्ध मागधी अशा स्वरूपात असावी. तत्कालीन भारतीय विद्वानात विविध बोली बोलणाऱ्या लोकासाठी एक संपर्क भाषा असावी असे वाटले असणार. त्या विद्वानांना कदाचित राजमान्यता व धर्म मान्यता मिळाली असणार. त्यातुन विविध विद्वानांनी अनेक बोलीतून काही शब्द घेऊन व्याकरणाचा उपयोग करून त्या काळातील एक परिपूर्ण भाषा तयार करण्याचा प्रयत्न केला. अर्थ हरवू नये असे शब्द तयार करून ही भाषा तयार केली. अर्थपूर्ण असे तत्व जेव्हा बोली वा प्राकृत भाषेमुळे अर्थ हरवत होती, तेव्हा शुद्ध भाषा निर्माण करण्याची गरज भासली. ह्यातून जी विशिष्ट जाणिवपूर्वक संस्कारातून एक संस्कारीत भाषा साकार होत गेली, तीच संस्कृत भाषा होय. काही कारणामुळे या भाषेचा प्रसार झाला नाही. ती लोकभाषा झाली नाही. ज्या विद्वानांनी ही भाषा तयार केली ते गुणकर्माने विद्वान होते. त्यांना ब्राह्मण म्हणत होते. नंतरच्या काळात ते जन्मजात बनले आणि एक सर्वोत्तम भाषा कंठित झाली. एवढेच नव्हे तर हळूहळू ऱ्हास होत गेली. अर्थ बांधण्यासाठी जी भाषा तयार केली. त्याचेच अर्थ हरवले गेले. काही शब्द तोंडपाठातंरामुळे जीवंत राहिले. परंतु त्यांचे अर्थ हरवत गेले. यातुनच उभा राहिला एक भयानक गोंधळ असलेला, विसंगती असलेला भारताचा इतिहास. जो तो त्या शब्दांना स्वतःचे हितासाठी व विशेष हितसंबंधासाठी निरनिराळे अर्थ देवू लागला, शब्द ब्रह्मातून शब्द तयार भ्रम झाला.

निर्गुण निराकार अर्थ ब्रह्माचे सगुण-साकार रूप म्हणजे शब्दब्रह्म. अशाप्रकारे या शब्द ब्रह्मातून अर्थ ब्रह्म शोधले असता खरी रत्ने बाहेर पडतात.

_ सिद्धप्पा अक्कीसागर

- शब्दांकन : आबासो पुकळे

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025