ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना पितृशोक
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे पिताश्री भगवानराव गोरे दादा यांचे दुःखद निधन झाले. माण तालुका रेशनिंग संघटनेचे ते अध्यक्ष होते. त्यांना दादा या नावाने ओळखले जायचे. मंत्री जयकुमार गोरे यांच्या सोबत ते राजकारणात खंबीरपणे सक्रीय पाठीशी होते. विधानसभा निवडणुकीच्या काळापासून ते आजारी होते. पुण्यात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज त्यांनी पहाटे अखेरचा श्वास घेतला. दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. बोराटवाडी तालुका माण जिल्हा सातारा येथे दुपारी 4 वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात जयकुमार गोरे, अंकुश गोरे, शेखर गोरे, सुरेखाताई पखाले अशी मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली दादा.
No comments:
Post a Comment