Wednesday, February 26, 2025

महादेव जानकर यांचा कोकणातील धनगरवाड्यांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी

महादेव जानकर यांचा कोकणातील धनगर वाड्यांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी 

पेण (१८/१/२५) : कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम धनगर वाड्याच्या विकासासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या विधानपरिषद फंडातून कोट्यावधी रुपयाचा निधी देण्यात आला आहे. पेण तालुका धनगर समाज भवनाचे उद्घाटन महादेव जानकर यांच्याहस्ते पार पडले. महादेव जानकर म्हणाले, आज आपले सरकार नाही, राष्ट्रीय समाज पक्षाचे सरकार आल्यावर दुर्गम वाड्यावर त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भरघोस निधी देऊ. देश स्वतंत्र झाल्यापासून या वाड्यावरस्त्यावर निधी पोहोचला नव्हता, पहिल्यांदा निधी देणारा राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जानकर आहेत, असे स्थानिकांनी सांगितले. कमी वयात सरपंचपदी विराजमान झालेल्या सोनलताई उघडे यांचा सत्कार महादेव जानकर यांनी केला. यावेळी शरदभाऊ दडस, संतोष ढवळे, भगवान ढेबे, मनिषाताई ठाकूर, आनंदा ढेबे, मुकेश भगत, आबासो पुकळे, शशिकांत मोरे, विजय उघडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025