Monday, February 3, 2025

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर


‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा" कार्यक्रमाचा समारोप


नांदेड (१७/१/२५) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी सार्वजनिक वाचनालय होळकरनगर सिडको नांदेड येथे शासनाने दिलेल्या १ जानेवारी २०२५ ते १५ जानेवारी २०२५ पर्यंत " वाचन संकल्प महाराष्ट्राचा" हा उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, क्रांतीकारी राणी तुळसाबाई होळकर, राजमाता जिजाऊ भोसले, विरागंणा झलकारीबाई यांच्या जयंतीनिमित्त ३ जानेवारी ते ४ जानेवारी रोजी "ग्रंथ प्रदर्शन"चा व १७ जानेवारी २०२५ रोजी महिला ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम घेवून " वाचन संकल्प महाराराष्ट्राचा " या अभियानाची सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात सौ. सावित्रा शूरनर म्हणाले, वाचन संस्कृती वाढवण्यासाठी हा उपक्रम सतत चालू ठेवून समाजांत वाचनाचे महत्व समजावून सांगावे लागते. वाचन संस्कृती वाढवावी व विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीत मदत व्हावी, म्हणून शासनाने वाचनालयाची निर्मिती केली आहे. पंरतू शासन अनुदान वाढवून देत नाही, ग्रंथपाल यांना वेतन देतं नाही, त्यामुळे वाचन संस्कृतीचे कार्यक्रम कागदावरच दिसून येतात, यापुढे शासनाने या गोष्टीकडे लक्ष घालून वाचन संस्कृती वाढविण्याकडे लक्ष घालावे, असे वाचकांच्या निदर्शनास सावित्रा शूरनर यांनी आणून दिले.


कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर म्हणाले, महिलांनी राष्ट्रमाता सावित्रीमाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पाल्यांना घडवावे. सावित्रीमाईमुळे शिक्षण मिळाले, शिक्षणामुळे ज्ञान मिळाले, त्या ज्ञानाचा फायदा स्वतः चे आरोग्य व मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी करावे. चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज आहे. वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी वाणात कंगवे चमचे देण्याऐवजी महापुरूषाचे पुस्तके भेट द्यावी, असे प्रतिपादन केले. प्रथम प्रस्ताविक करतांना गोविंदराम शूरनर म्हणाले, स्त्रीयांना शिक्षणाचे दारे खुली करण्यासाठी प्रस्थापिताकडून फुले दांपत्याने शेणमारा खाला, स्त्रियांना पुरूषा बरोबर समान अधिकार मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी प्रस्थापिताचा विरोध असतानाही हिंदू कोड बिल संसदेत पास करून घेतले. त्यामुळेच आजची स्री सन्मानाने उच्च पदापर्यंत जाऊ लागले आहेत. त्यासाठी लोककल्याणासाठी ज्यांनी काम केले त्या महापुरुषांची जयंती सण म्हणून साजरी करावी व तसे संस्कार पाल्यावर करावेत, असा संदेश दिला. 

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रंथालय तपासणी अधिकारी कैलास गायकवाड, ग्रंथालय संघाचे सचिव सचिन पाटील, दत्ताजी काकडे उपस्थित होते. सौ. दिपा गायकवाड, सौ. राधाबाई जाधव, शुभांगी कांबळे, ज्योती कसनकर तसेच अनेक महिला भगिनींनी ग्रंथ वाचन कार्यक्रमात सहभाग घेतला. शेवटी पुस्तके ज्ञानदानात भेट देवून हळदी कुंकूचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे शेवटी सविता हेळगीरे यांनी सर्वांचे आभार मानले.

रासपचा पंतप्रधान नंदगडला येईल : महादेव जानकर

रासपचा पंतप्रधान नंदगडला येईल : महादेव जानकर 

महादेव जानकर राष्ट्रीय समाजाचा आवाज बनून मैदानात लढत आहेत, त्यांना साथ देणे गरजेचे : अक्कीसागर


नंदगड (क्रांतिवीर संगोळी रायन्ना स्मृती/बलिदान स्थळ येथून...) : जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत 26 जानेवारीला नंदगडला येत राहणार. रासपाचा मुख्यमंत्री झाल्यानंतर तो नंदगडला येईल. रासपचा पंतप्रधान देखील नंदगडला येईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर माजी मंत्री महाराष्ट्र यांनी केले आहे. श्री. जानकर हे नंदगड ता - खानापुर जिल्हा बेळगाव येथे  राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित राष्ट्रवीर संगोळी रायन्ना राज्याभिषेक वार्षीकोत्सव -१७ वा कार्यक्रमात बोलत होते. यावेळी रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर, राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवलिंगप्पा किन्नुर, मखनापुर गुरूपिठाचे सोमेश्वर स्वामी, जोकानहट्टी(गोकाक) येथील योग सिद्धेश्वर आश्रमाचे बिळीयान सिद्ध स्वामी, रामदुर्ग येथील पूर्णानंद आश्रमाचे कृष्णानंद स्वामी उपस्थित होते.

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर उपस्थितांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, सन 2008 सालापासून अंखडपणे राष्ट्रीय समाज पक्ष संगोळी रायन्ना राज्याभिषेकाचा कार्यक्रम नंदगडला घेत आहे. सुरुवातीला येथे काहीही नव्हते. राष्ट्रीय समाज पक्षाने लक्ष घातल्यानंतर कर्नाटक शासनाने दिले. रासपच्या चळवळ पाहून सर्वच सत्ताधारी राजकीय पक्षांनी नंदगडच्या विकासासाठी सहकार्य केले आहे. संगोळी रायन्ना कन्नडवीर नसून राष्ट्रवीर बनले पाहिजेत, यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची चळवळ चालू आहे. तमिळनाडू, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तेलंगणा सर्वच राज्य प्रदेशातून राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी येत असतात. राष्ट्रीय समाज पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणीची वार्षिक २ बैठका पैकी १ नंदगड येथे आयोजित केली जाते. संगोळी रायन्नाचा इतिहास उजेडात आल्यानंतर सर्वप्रथम राष्ट्रीय समाज पक्षाने 'समाज संगम राष्ट्र यात्रा' काढून २००८ मध्ये देशाच्या कानाकोपऱ्यात संगोळी रायन्नाचे महान कार्य पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. संगोळी रायन्ना समाधीस्थळ राष्ट्रीय स्मारक बनले पाहिजे, रासपची इच्छा आहे. 


कर्नाटकच्या जनतेने राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार खासदार विधानसभा, संसदेत पाठवावेत, असे आवाहन महादेव जानकर यांनी केले. जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत 26 जानेवारीला नंदगडला येत राहणार. रासपाचा मुख्यमंत्री झाल्यानंतर तो नंदगडला येईल. रासपचा पंतप्रधान देखील नंदगडला येतील. स्वामीजींनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या पाठीशी आशीर्वाद उभा करावा. राणी चेन्नमा, छ. शिवाजीराजे, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर आदी सर्वच महामानवांचा विचार घेऊन राष्ट्रीय समाज पक्ष वाटचाल करत आहे.

रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर संगोळी रायन्ना पुतळ्याजवळ उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांचा राज्याभिषेक आयोजित करण्याचे कारण, क्रांतिवीर रायन्ना यांस आपल्या भारतीयांचे स्वराज्य आणावयाचे होते, त्यासाठी ते ब्रिटिश कंपनी सरकार विरोधात लढले. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता वयाच्या 33 व्यां वर्षी आपले बलिदान दिले. विशेष म्हणजे आजच्या प्रजासत्ताक दिवशी रायन्ना स्मृती/बलिदान दिवस आहे आणि त्यांचा जन्मदिन हा आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे. त्यांना अभिप्रेत असलेले भारतीयांचे स्वराज्य, त्यासाठी त्यांनी दिलेला लढा, बलिदान याची सर्व आठवण लक्षात घेऊन महादेवजी जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे सन 2008 पासून दरवर्षी येथे क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांचा राज्याभिषेक कार्यक्रम घेतला जात आहे. रायन्ना सारखा देशभक्त अन् शुरवीर पुत्र प्रत्येक घरी व्हावा, असे बोलले जाते. पण रायन्ना बनणे हे तितके सोपे नाही. महादेवजी जानकर हे सुद्धा आपले घर दार सोडून राष्ट्रीय समाजाचा आवाज बनून ते मैदानात आजही लढत आहेत. त्यांना साथ देणे गरजेचे आहे. आज राष्ट्रीय समाज पक्षातर्फे आयोजित क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्या राज्याभिषेक कार्यक्रमास रासपचे कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, गुजरात आदी. राज्यातून विविध राष्ट्रीय समाजातील लोक येथे आलेले आहेत. दरवर्षी येथे येत असतात. विविध जाती धर्म  प्रांतांतील लोक म्हणजेच राष्ट्रीय समाज होय आणि अशा सर्वांचा पक्ष म्हणजेच राष्ट्रीय समाज पक्ष होय. क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांचे क्रांतिकारी कार्य, त्यांस अभिप्रेत असलेले स्वराज्य संकल्पना, त्यांचा लढा आणि त्यासाठी त्यांचे बलिदान आदिचे स्मरण करून रायन्ना यांस आपण आदरांजली वाहुया. तसेच आपणां सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


सकाळी महादेव जानकर यांच्याहस्ते, पुजारी गोविंद चव्हाण, श्रीमती चव्हाण आई यांच्या समवेत संगोळी रायन्ना राज्याभिषेक करण्यात आला. सिद्धप्पा अक्कीसागर यांनी कन्नडमध्ये भाषण केले. शालेय विद्यार्थ्यांनी राणी चेंनम्मा व संगोळी रायण्णा त्यांची वेशभूषा परिधान करून नाटिका सादर केले. संगोळी रायन्ना रायन्ना समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी/कार्यकर्ते देशभरातून उपस्थित होते. राष्ट्रीय संघटक गोविंदराम शुरनर, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य तथा ईशान्य भारत प्रभारी डॉ. मनोज निगडकर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, कर्नाटक रासपा प्रभारी शिवलिंगप्पा जोगीन, तेलंगणा राज्य प्रभारी रमाकांत करगटला, महाराष्ट्र राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, कर्नाटक राज्य महासचिव शरणबसप्पा दोड्डमनी, मराठवाडा रासप नेते ओमप्रकाश चितळकर, उत्तर कर्नाटक रासपा प्रभारी सुनीलदादा बंडगर, बेळगांव प्रभारी बलराम कामन्नावर, महाराष्ट्र सचिव नरेशकुमार मंडल (नागपूर), प. संपर्क प्रमुख विनायकमामा रुपनवर (पुणे), प. महाराष्ट्र संघटक कालिदास गाढवे(आटपाडी), युवा नेते अजित पाटील(सांगली), कलबुर्गी माजी जिल्हाध्यक्ष देवेंद्र चिगरहल्ली, नंदगडचे सामाजिक नेते किशोर कुरिया, रासपचे ज्येष्ठ नेते शिवाजीबुवा गावडे (उमरगा), कर्नाटक कुरबर संघ पदाधिकारी राजश्री यरनाळ, सूर्यकांत गुंडाळे (लोहा नांदेड), परमेश्वर पुजारी (मोहोळ सोलापूर), रासेफचे महावीर सरक (सातारा), पत्रकार आप्पाजी पाटील दै. तरुण भारत, रमेश संगप्पा पुजारी, हालसिद्धप्पा आदी उपस्थित होते.






नवी मुंबईत आद्य स्वातंत्र्यवीर संगोळी संगोळी रायन्ना पुण्यतिथी साजरी

नवी मुंबईत आद्य स्वातंत्र्यवीर संगोळी संगोळी रायन्ना पुण्यतिथी साजरी

नवी मुंबई (२६/१/२०२५) : कळंबोली येथील आई मायाक्कादेवी मंदिरात आद्य स्वातंत्र्यवीर संगोळी रायन्ना यांची 194 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. मायाक्कादेवी मंदिरात आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. यावेळी संगोळी रायन्ना यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. एवढा मोठा शूरवर स्वातंत्र्यवीर भारताच्या इतिहासात उपेक्षित कसा राहिला याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. 

संगोळी रायन्नाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी मंदिराचे पुजारी विठ्ठल कोळेकर, प्रकाश कोळेकर, अतुल देशमुख, चंद्रकांत दडस, राहुल आगलावे, अक्षय पाटील, विजय जाधव, सतीश पिसाळ, सौरभ झंजे, प्रेम करे, अजित पिंगळे, बाबू मासाळ, राहुल खिलारी, विठठल खरात, राहुल सरगर, विशाल मेटकरी, श्रेयस कोळेकर, ओम अमृतसागर, पी. आबासो, संदीप गावडे, मारुती लेंगरे, ममताबाई पाटील, कोळेकर पुजारी ताई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

चिकन पार्टीचे पैसे दिले नाही म्हणून मित्राने केली मित्राचीच हत्या

चिकन पार्टीचे पैसे दिले नाही म्हणून मित्राने केली मित्राचीच हत्या 

पनवेल (31/1/25) : चिकन पार्टीसाठी पैसे दिले नाही म्हणून मित्रानेच आपल्या मित्राची हत्या केल्याचा भयानक प्रकार खारघर मध्ये घडला आहे. जयेश वाघे असे मृत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मन्नू दिनेश शर्मा याला अटक केली असून त्याच्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मृत जयेश हा पनवेल महानगरपालिका येथे मलनिस्सारण वाहनावर सफाईचे काम करत होता. 23 जानेवारीला रात्रीच्या सुमारास आदिवासी वाडी, बेलपाडा, खारघर येथे क्रिकेट मैदानाच्या बाजूच्या रस्त्यावर जयेश आणि त्याचे इतर मित्र हे चिकन बनवत होते. मात्र मन्नू यांच्याकडून चिकनसाठी कोणतीही वर्गणी येत नाही, पैसे मिळाले नाहीत याच कारणावरून जयेश आणि मन्नू यांच्यात वाद झाला. पुढे भांडण वाढलं. जयेशने मन्नू याच्या कानाखाली मारली. त्यामुळे मन्नू हा प्रचंड संतापला आणि त्याच रागाच्या भरात त्याने जयेशला हाता बुक्यांनी छातीत आणि पोटावर मारहाण केली. एवढंच नव्हेतर क्रिकेटच्या लाकडी बॅटने जयेशच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर प्रहार केले. मारहाणीमुळे जयेश हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी तातडीने एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यावर खारघर पोलिस तेथे दाखल झाले. आरोपी मन्नू विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पनवेल पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांसाठी ढकलपास पद्धत आता कायमची बंद

इयत्ता पाचवी अन्‌ आठवीच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांचे होणार जतन; पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांसाठी ढकलपास पद्धत आता कायमची बंद


इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना अंक ओळख, वजाबाकी, भागाकार देखील येत नसल्याची बाब समोर 

मुंबई (१ फेब्रुवारी २०२५) : इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याची पद्धत आता बदलली आहे. इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे बंद झाले आहे. सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा पारदर्शकपणे घेतली का, उत्तरपत्रिकांची तपासणी व गुणदान बिनचूक आहे की नाही?, याची पडताळणी आता 'डायट'चे अधिकारी व शिक्षणाधिकारी करणार आहेत. त्यासाठी सर्व शाळांना पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका वर्षभर जनत करून ठेवाव्या लागणार आहेत.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून आता पाचवी व आठवीच्या परीक्षांवर लक्ष ठेवले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील शाळांमधील या इयत्तेतील विद्यार्थ्यांची पारदर्शकपणे परीक्षा घेतली जाते का?, याची पडताळणी प्राथमिक शिक्षणाधिकारी व जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेच्या (डाएट) माध्यमातून होणार आहे. काही दिवसांपूर्वी पाच ते १६ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसंदर्भातील अहवाल प्रसिद्ध झाला. त्यात इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना अंक ओळख, वजाबाकी, भागाकार देखील येत नसल्याची बाब समोर आली.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून आता पाचवी व आठवीच्या परीक्षांवर लक्ष ठेवले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील शाळांमधील या इयत्तेतील विद्यार्थ्यांची पारदर्शकपणे परीक्षा घेतली जाते का?, याची पडताळणी प्राथमिक शिक्षणाधिकारी व जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेच्या (डाएट) माध्यमातून होणार आहे. काही दिवसांपूर्वी पाच ते १६ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसंदर्भातील अहवाल प्रसिद्ध झाला. त्यात इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना अंक ओळख, वजाबाकी, भागाकार देखील येत नसल्याची बाब समोर आली.

अनेकांना वाचायला देखील जमत नसल्याचे या सर्व्हेतून उघड झाले. दुसरीकडे सरकारी शाळांमधील प्रवेश देखील गुणवत्तेच्या कारणामुळे घटल्याची बाब स्पष्ट झाली. शाळांची गुणवत्ता वाढावी, विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या इयत्तेत पुढे जाताना त्यांच्या बौद्धिक पातळीचा विचार व्हावा, यासाठी आता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ढकलपास पद्धत करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांची परीक्षा पारदर्शकपणे घेण्याचे नियोजन 'एससीईआरटी'कडून करण्यात आले आहे.

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी दोन संधी

इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना स्वतंत्र प्रश्नपत्रिका तयार करून दिल्या जातात. एप्रिलमध्ये या विद्यार्थ्यांची परीक्षा होईल. त्यात अनुत्तीर्ण झालेल्यांची पुढे मे-जून महिन्यात फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. याही परीक्षेत अनुत्तीर्ण झालेला विद्यार्थी त्याच वर्गात राहणार असून त्याला पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार नाही. त्यांची परीक्षा पारदर्शकपणे घेण्यात आली की नाही, याची पडताळणी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या आधारे केली जाणार आहे.

प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांचे जपून ठेवाव्या लागतील

इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा प्रकार आता बंद झाला आहे. मागच्या वर्षी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दोनअंकी आहे. आता इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाल्यावर त्यांची प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका शाळांनी जतन करून ठेवणे बंधनकारक आहे. त्या उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिकांची फेरतपासणी शिक्षणाधिकारी व जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेचे (डाएट) अधिकारी करतील. तसे आदेश त्यांना दिले आहेत. 

- राहुल रेखावार, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

यशवंत नायक: जानेवारी 2025

 





रासपने परंपरागत संघटनाबरोबरच अधुनिकतेचा मीलाप साधावा : धिरज पाटील, नाशिक

रासपने परंपरागत संघटनाबरोबरच अधुनिकतेचा मीलाप साधावा

वय वर्ष १८ ते ४० दरम्यानच्या मतदारांचा संख्या देशात ५०% पेक्षा जास्त आहे. ही मोबाईल पीढी आहे,  ज्या पक्षाकडे संघटनेकडे ही पिढी असेल, तो या देशावर राज्य करेल.

रासपचा संघर्ष कींबहुना रासप नेतृत्वाचा संघर्ष देखील या पिढीने पाहीलेला नाही. मुंबई पुणे सारख्या मेट्रोसीटी मधील आयटी, इंजीनियरींग त्या विद्यार्थ्यांपर्यंत आजही रासप पोहचलेला नही. माणूस वयाने कनेक्ट होत नाही तर विचारांनी कनेक्ट होतो. गडकरी सारख्या नेत्यांना ऐकण्यात या पिढीला इंटरेस्ट आहे. म्हणजे वयाचा तिथे प्रश्न नाही. आदरणीय जानकर साहेबांच्या बाबतीतही हे तंतोतंत लागू होतं, ज्यांनी साहेबांना ऐकलं त्यांचा इतिहास जानला, त्यांचा विचार संघर्ष जानला ते तरूण नक्कीच साहेबांना देखील प्रभावित झालेत. त्यातलाच मी एक आहे. मात्र आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, ही तरूण पीढी राजकारण्यांच्या मीटींगांना यायला तयार नाही, सभा मोर्चे नकोसे झालेत यांना. ही सत्यता नाकारून चालनार नाही. आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण युटुबर, पर्यायाने पॅाडकास्ट मुलाखती यांच्या माध्यमातुन साहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहचण्यासाठी साहेबांची प्रतीमा लोकांमध्ये निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवे आपल्याला कल्पना असेल पण , एकनाथ शींदे, सुप्रीया सुळे, नितीन गडकरी, आपचे काही खासदार अश्या बऱ्याच मंडळींनी या माध्यमांचा प्रभावीपणे वापर करून लोकप्रीयता मीळवलीच. किंबहुना त्यांच्या विचारांना कनेक्ट होणारी मंडळी कायमची त्यांची पाईक झाली.

याला कॅार्पोरेटमध्ये ब्रॅंड आयडेन्टींटी असे म्हणले जाते. उदाहरणार्थ रतन टाटांची प्रतीमा जितकी अधीक विश्वासू संवेदनशील प्रेमळ बनत होती तीतके शेयर मार्केटला टाटा ग्रुप ची गुंतवणूक वाढत होती.  जानकर साहेबांची विचार, व्हीजन, प्रगल्भता, आचरण, संघर्ष जितके नविन पीढीपर्यंत जास्तीत जास्त पोहचेल, तितकी साहेबांची प्रतीमा नविन पीढीमध्ये तयार होत जाईल व त्याचा फायदा ग्राउंडवर काम करणाऱ्या रासपच्या कार्यकर्त्याला संघटन वाढीसाठी लोकांचे मतपरीवर्तन करण्यास होईल. २०१४ नंतर राजकारणाचं कॅार्पोरेटीकरण झालंय, हे आपण मान्य करायलांच हव. त्यामुळे रासपने देखील परंपरागत संगठनबरोबरच अधुनिकतेचा मीलाप साधावा.

  -धिरज पाटील, नाशीक मो - 7875717798

जानकर साहेबांनी पक्ष तयार केला नसता तर नेता झालो नसतो : एड. विकास पाटील, जिल्हाध्यक्ष धाराशिव

जानकर साहेबांनी पक्ष तयार केला नसता तर नेता झालो नसतो 


राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. महादेव जानकर साहेब यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय समाज पक्षाची महाराष्ट्र राज्याची प्रदेश कार्यकारिणी, विभागीय कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारणी तसेच तालुका कार्यकारणीसह महाराष्ट्र राज्यातील सर्व आघाड्यांची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली, या गोष्टी प्रोटोकॉलनुसार घडतं असतात. नवीन जुन्या जबाबदाऱ्या येत जात असतात, पण मला अभिमान याचा वाटतो की, माझ्यासारख्या 26 वर्ष वयाचा एका विद्यार्थी दशेतला युवक, अगदी सामान्य कुटुंबातून येऊन, राजकारणात मलाही कोणताही वारसा लाभलेला नसताना, आदरणीय जानकर साहेब तसेच प्रदेश अध्यक्ष, मुख्य महासचिव, प्रदेश कार्यकारिणी व माझे सहकारी यांनी जो माझ्यावर विश्वास ठेऊन मला जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली, त्याबद्दल धन्यवाद व मी सुद्धा ती जबाबदारीने तंतोतंत पाळली व कोणत्याच विश्वासाला तडा जाऊ देण्याच काम केलं नाही व कधी भविष्यात सुद्धा करनार नाही, हे मला सांगायला अभिमान वाटतोय. कारण की जर जानकर साहेब यांनी पक्ष काढला नसता तर माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातल्या पोराला नेता होता आले नसते, पद मिळली नसती, पदामुळे माझी उंची वाढण्यासाठी खुप मोठा फायदा झाला, गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर काम करता आले, आंदोलन, मोर्चे करता आली, सत्ता येत राहील, जाईल पण हा तुमचा कार्यकर्ता कधीच राष्ट्रीय समाज पक्ष सोडून कुटल्याच गोष्टीचा विचार करणार नाही. पक्ष वाढवण्यासाठी जे जे करता येईल, आम्हाला ते करु, पण जास्तीत जास्त वेळ पक्ष वाढवण्यासाठी देऊ, जानकर साहेब यांच्यावर बोलण्यासारखं खुप काही आहे, पण मी एवढेच सांगेन अस नेतृत्व पुन्हा होणे नाही त्यामुळे या नेतृत्वाला जपा वाढवा.

 -  ॲड विकास पाटील, माजी जिल्हाध्यक्ष धाराशिव 

9623858891

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...