Friday, September 1, 2023

"हाक देतसे धरती आई, जतन करूया वनराई" उपक्रम राबवत तिरकवाडीच्या माजी विद्यार्थ्यांकडून समाजासमोर आदर्श

"हाक देतसे धरती आई, जतन करूया वनराई" उपक्रम राबवत तिरकवाडीच्या माजी विद्यार्थ्यांकडून समाजासमोर आदर्श 

दुधेबावी येथील भवानी माता मंदिराच्या डोंगरावर दि. २६ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत "हाक देतसे धरती आई, जतन करूया वनराई.." हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम जय भवानी हायस्कूल, तिरकवाडी शाळेचे  एस.एस.सी बॅच १९९५ च्या माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केला होता. हा वृक्षारोपण कार्यक्रम  निसर्गप्रेमी माननीय "श्री. सचिन दशरथ सोनवलकर" यांच्या मार्गर्शनाखाली राबवण्यात आला.

वृक्षारोपणाचा कार्यक्रम सर्व माजी विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात पार पाडला. वृक्षारोपण कार्यक्रमासाठी नर्सरीतून चिंच, करवंद, वड, पिंपळ व बोगनवेल या प्रकारची झाडे मागवण्यात आली होती. फक्त झाडे लावणेच नाही तर सर्वांनी ही झाडे जगण्यासाठी ठिबक सिंचन करून पाण्याची चांगल्या प्रकारे सोय केली आहे. प्रमोद झगडे यांनी ५० वृक्ष दिले. विद्या चतुरे यांनी अल्पोहारची व्यवस्था केली. शबाना मुलाणी यांचा वाढदिवस उत्सहात साजरा करण्यात आला. सर्व माजी विद्यार्थ्यांकडून पुढील एक वर्षासाठी वृक्षसंवर्धनसाठी आर्थिक संकलन केले आहे.

या कार्यक्रमासाठी दुधेबावी गावचे सुहास शिंदे, अण्णा वावरे, संपत वावरे, राजेंद्र नाळे, लक्ष्मण नाळे, दिलीप नाळे, राजेंद्र सोनवलकर, संतोष मोरे तसेच शबाना मुलानी, अश्विनी भिसे, बाबा काळे, गजानन ठोंबरे, पिंकी आंबोले, विजय टेळे, मेहुल शहा, निलेश काळुके, दत्तात्रय पवार, बाळासाहेब सोनवलकर, उमेश ननवरे, सागर जाधव हे उपस्थित होते. वृक्षारोपणाचा कार्यक्रम व्यवस्थित पणे पार पडला  व प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे अशी सर्वांना त्यांनी विनंती केली.

जेव्हा भवानी मातेच्या डोंगरावर तिरकवाडी शाळेचे माजी विद्यार्थी एकत्र येतात ...!


हाक देतसे धरती आई, जतन करूया वनराई" उपक्रमात सहभागी तिरकवाडीच्या माजी विद्यार्थ्यांची अन्य क्षणचित्रे 











































3 comments:

  1. I really proud of my 10th std 1995 batch, keep it up 👍

    ReplyDelete
  2. बाबासाहेब मस्त 🌹🌹

    ReplyDelete
  3. Well done 👍. Good Initiative . Keep it up 👏👏

    ReplyDelete

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025