Friday, September 15, 2023

साहित्यनगरी पुणे येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा २० वा वर्धापनदिन भव्य दिव्य साजरा

साहित्यनगरी पुणे येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा २० वा वर्धापनदिन भव्य दिव्य साजरा


सत्य असेल त्यालाच न्याय मिळेल, चोऱ्या लपवायला येणाऱ्यांना रासपात प्रवेश नाही : महादेव जानकर 

वर्धापन दिन मेळाव्यात राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका ठणकावून सांगताना रासपचे राष्ट्रीय नेते महादेव जानकर

पुणे : आबासो पुकळे 

दिनांक २९ ऑगस्ट २०२३ वार मंगळवार रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचा २० वा वर्धापनदिन सोहळा गणेश कला क्रीडा मंच सभागृहात भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. "जनतेच्या पैशाचा गैरव्यवहार करणाऱ्यांना सत्ताधारी पक्षात प्रवेश देऊन संरक्षण दिले जात आहे, मात्र रासपाची देशात सत्ता आल्यावर सत्य असेल, त्यालाच न्याय मिळेल. चोऱ्या करुन लपायला येणाऱ्यांना रासपात प्रवेश मिळणार नसल्याचे, महादेव जानकर यांनी ठणकावून सांगितले. 

चांदीची तलवार हात उंचावत जनतेस अभिवादन करताना महादेव जानकर, बाजूस आ. रत्नाकर गुट्टे, अजित पाटील, रामकुमार पाल, संदीप चोपडे, दादासाहेब डोंबाळे व अन्य.

वर्धापन दिन सोहळ्यात मार्गदर्शन करताना महादेव जानकर म्हणाले, आज राष्ट्रीय समाज पक्षाला वीस वर्षे पूर्ण झाली. सर्व लोकांनी मनोगत व्यक्त केले. सगळ्यांनी मानसन्मान दिला, त्याबद्दल त्यांचे हृदयातून अभिनंदन. आज आपण बघितले असेल, हा मंच तुमचा आहे. पैसा, कार्यक्रम तुमचा आहे. या देशात २००३ ला आम्ही पक्ष बनवला. जनतेने तन, मन, धन देऊन पक्षाला इथपर्यंत पोहोचवले. तुम्ही लोकांनी समर्थन सहकार्य केले, म्हणून या ठिकाणी पोहचलो. मी मोठा आहे, असे काही नाही. मी इंटूलेक्चल माणूस नाही, परंतु आपल्या प्रेम, कष्ट, तळमळीवर हा पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न करत आहे. दोस्त हो..! आमचं लक्ष्य दिल्ली आहे. परंतु स्वतःच्या रस्त्याने जायचं आहे. टाटा, बिर्ला यांचा सहारा न घेता इथपर्यंत आलो आहे. इथे दिसणारी गर्दी ही स्वतःच्या पैशाने, स्वतःचा खर्च करून आलेले आहे. आमचं शेवटचे ध्येय काय आहे? छत्रपती शिवाजीराजे, महात्मा ज्योतीबा फुले, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, अण्णाभाऊ साठे, संत रोहिदास, राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर, संत भगवानबाबा या सर्व महामानवांच्या आशीर्वादाने आपल्याला या देशावर सत्ता आणायची आहे. माझी आपणाला कळकळीची विनंती आहे. 

महाराष्ट्रातील आपल्या एकमेव आमदारांनी उदाहरण दिले, त्यांनी सांगितले, मी बोलतो तेवढे करून देतो. गुट्टे साहेब आपल्याला नुसता परभणीत बघायचं नाही. महाराष्ट्राचा कारभार सांभाळायचा आहे, एवढी ताकद आपल्याला उभी करायची आहे. महाराष्ट्रात तुमच्याशिवाय सरकार बनले जाणार नाही. देशात पंतप्रधान देखील तुम्हाला विचारल्याशिवाय बसला जाणार नाही एवढी ताकद आपल्याला उभा करायची आहे. आज मी आनंदाने सांगेन. महाराष्ट्रात चांगलं वोटिंग मिळाले. चार आमदार विजयी झाले. ९० च्यावर झेडपी मेंबर झाले. गुजरातमधून अठरा नगरसेवक निवडून आले. विजयाची गाथा आम्ही वीस वर्षात केली. स्वतःच्या हिमतीवर हे चालू आहे. फक्त लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा मला आशीर्वाद मिळाला आणि महादेव जानकर मंत्री झाला. भाजपबरोबर युती केली. आम्ही भाजपला फसवले नाही, पण भाजपने आमच्याशी दगाखुरी केली. आम्हाला हेच दुःख वाटलं. आमचा दौंडमध्ये आमदार होता. आमचे तिकीट कॅन्सल नाही कराय पाहिजे होते. मी नाही म्हणत असताना, शेवटच्या दहा मिनिटात बी फार्म जोडून २०१९ च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत रत्नाकर गुट्टे हा वाघ रासपचा आमदार झाला. 

वर्धापन दिन सोहळ्यात महादेव जानकर व आ. रत्नाकर गुट्टे यांच्या गळ्यात भला मोठा पुष्पहार घालून स्वागत करताना ज्ञानेश्र्वर सलगर, जे. डी. शहा व अन्य रासप पदाधिकारी.

भाजपचा प्लॅन असा होता, आठवले साहेब तुम्ही आमच्या चिन्हावर लढा. मेटे साहेब आमच्या चिन्हावर लढा. सदाभाऊ खोत आमचे चिन्हावर लढा, पण हा पट्ट्या वाघ म्हनाला, मी माझ्या चिन्हावर लढेल. तुमचा स्वाभिमान विकला नाही. तुमचं दहा हजार, पाच हजार, पन्नास हजार घेऊन स्वाभिमान विकला नाही. गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील लोकांचे अभिनंदन करेल. भाजपने ठरवलं होतं, महादेव जानकरचा एकही आमदार येऊ द्यायचा नाही, पण पट्ट्या महादेव जानकर देखील ब्रह्मचारी आहे. रात्रभर त्याग करून तिथे रासपचा आमदार विजयी केला आणि भाजपचा मनसुबा बंद केला. मी भाजपवर प्रेम करत होतो. लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबामुळे तिथे गेलो होतो. तुम्ही आमच्याशी दोस्ती करचाल तर चांगलं वागा. तुम्ही सापाचा फणा काढला तर मी नाग काढल्याशिवाय राहणार नाही. आमच्याशी चांगलं वागा खरं बोला. तुमच्याच हातात सरकार आहे का? असा सवाल जानकर यांनी केला. आम्ही नसतो तर तुमचा मुख्यमंत्री देखील झाला नसता. आम्ही नसतो तर तुमचा खासदार झाला नसता. आमच्या मनात पाप नव्हतं, तुमच्या मनात जर पाप आला असेल तर त्या पापाचे उत्तर जनता दिल्याशिवाय राहणार नाही. अशा शब्दांत भाजपवर महादेव जानकर यांनी निशाणा साधला. मी एकटा युतीचा आज निर्णय घेणार नाही. तुम्हाला सर्वांनाच निर्णय करावा लागेल. महादेव जानकर खासदार होईल ना होईल तो भाग वेगळा, पण या देशात आपल्या गरिबांच्या विचाराच सरकारी येईल. आमचा दावा आहे, ज्यांचं मतदान कमी आहे ते आमच्या डोक्यावर बसतात. आपले मतदान जास्त असताना आपण भिकार्‍यासारखे भिक मागत फिरतो हेच मला बदलायचे आहे. हीच व्यवस्था मला बदलायचेय. ज्यांचं मतदान कमी आहे, ते आमचे नेते. आमचे मतदान जास्त आहे, आम्ही भिकाऱ्यागत मागतोय. आय एम नॉट डिमांडर, आय एम कमांडर. भीक मागणारा समाज तयार करणार नाही तर देणारा समाज तयार करणार आहे, म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे. असेच प्रेम ठेवा. पक्षाच्या केंद्रीय कमिटीला विनंती करतो, मला चार लोकसभा मतदारसंघात तिकीट पाहिजे. आम्हाला आमची ताकद बघायचीय. इथ आम्हाला हसताय का? आम्हाला भिकारी समजताय का? नाही तुम्हाला मागायला येणार..! आमच्या दारात तुम्हाला यावे लागेल..? आम्ही निर्णय काय घ्यायचा ते घेऊ. काय लावलेय तुम्ही, काँग्रेस-राष्ट्रवादीला घालवण्यासाठी ३०० सभा घेतल्या. अहोरात्र फिरलो. आमचं तारुण्य संपवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला सत्तेत आणल्यावर लाथा मारता, आम्ही हे देतो, ते देतो, तुम्ही देणारे कोण ? जनतेचे मालक आम्ही आहोत. आम्ही जनतेच्या आदालतमध्ये जाऊ. जनतेच्या आदालतमध्ये खर आणि खोटं काय? सांगू. आम्हाला नाही चोरी करता येत, असा उद्विग्न सवाल श्री. जानकर यांनी व्यक्त केला. आम्हाला नाही लबाडी करता येत, जे पोटात आहे तेच ओठात येतं. आमची चूक आहे का..? जर आम्ही तुमच्याशी दोस्ती करतोय तर दोस्ती सारखं वागा. एवढीच तुम्हाला विनंती करतोय. कार्यकर्त्यांना सांगतोय, तुम्ही तुमच्या जिल्ह्यात एकेक रत्नाकर गुट्टे तयार व्हा. येणारा काळ तुमचा असेल. आपल्या मतदार क्षेत्रात लोकसभेत खासदार आणण्यासाठी रासपच्या ४८ लोकसभा मतदार क्षेत्रात तयारी करा. लवकरच दिली, उत्तर प्रदेश, बिहार दौऱ्यावर येतोय. मी फकीर आहे. फकीराला काही लागत नाही. पाठीमागे काही ठेवायचे नाही. देशाचे तकदीर बदलायच काम आम्ही एक दिवस करू, असा विश्वास आ. जानकर यांनी व्यक्त केला. सर्व भाऊ आणि बहिणींना विनंती, आपण आपल्या प्रदेशात चांगलं काम करा. सर्व समाजाला सोबत घेऊन निवडणुकीत यश मिळवा.

पदाधिकारी यांना सांगतो, पक्षात सर्व समाजाला भागीदारी द्यावी लागेल. ओबीसी समाज तर हत्ती सारखा आहे. ओबीसीला आई -बाप नाही, म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष काढलाय. वरचा लाथा घालतोय, खालचा किक मारतोय, मध्येच ओबीसी ऍडमिट होतय. एवढा मोठा समाज असताना, आम्ही भिकाऱ्यागत फिरतोय. मुस्लिम समाज आपला शत्रू नाही, भाऊ आहे आपला. शासन प्रशासनात आमच्या जागा मुसलमानाने खाल्लेल्या नाहीत. आमचा जागा दलितांनी खालेल्या नाहीत. जागा खाणारे वेगळे आहेत. जागा खातोय एक अन् शिव्या देतोय तिसऱ्याला, हा धंदा बंद करा. आम्ही जर आमच्या समाजाचे भलं करायचं असेल तर आमच्या योजना आम्ही लागू करू. तुम्ही दुसरे मंत्री येऊन कोण लागू करणारे. 'खात आमचं मंत्रीपद तुमचं' हे नाटक जास्त दिवस नाय टिकणार. आज काळ बदललाय. ज्यांनी भानगड केली आहे, ते तिकड जायला लागलेत. आम्ही काय भानगड केलेली नाही. आमचं खुले चॅलेंज आहे. आम्ही कोणाला फसलो नाय. आम्ही कुठे जाणार नाही. ह्यात कुठे अडकणार नाही. रासपच्या सैनिकांनी आपल्या भागात लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद निवडणूकीची तयारी करा. रासपची केंद्रीय कार्यकारी समिती निर्णय घेईल. मी एकटा निर्णय घेणार नाही. सर्वांचे मत विचारात घेतले जाईल. भाजप काँग्रेसची नियत सारखीच आहे. रासपचे वीस आमदार येऊ द्या, मुख्यमंत्री रासपचाच असेल. आम्ही होतो म्हणून तुम्ही आहे. तुम्ही मोठे आहे तर हे छोटे पक्ष कशाला फोडून घेताय. तुमचा आत्मविश्वास नाही, म्हणून फोडून घेताय, अशा शब्दांत महादेव जानकर यांनी सत्ताधारी भाजपला टोला लगावला.

जैन, मुस्लिम, लिंगायत, मराठा सर्व समाजाला समानतेने घेऊन चला. मराठा समाजाला आपल्याला सोबत घेऊन जावे लागेल. या राज्यात मराठ्यांचे शोषण झाले. सर्व समाजाला भागीदारी देण्याचा प्रयत्न करा. आपण सर्वच क्षेत्रात हिस्सेदारी देऊ. काहो..? मुसलमानांचा माणूस गृहमंत्री चालत नाही काहो तुम्हाला..? का चालत नाही तुम्हाला..? वडार, कैकाडी, रामोशी, समाजाला का संधी मिळत नाही. त्यांना नुसती महामंडळ देणार नाही, राष्ट्रीय समाज पक्ष मंत्री पदाची खुर्ची देणार, यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे दल उभा केलेला आहे. आमच्या नावावर मत मागून तुम्ही राज्यकर्ते बनता. देशात हेच चाललेल आहे. काँग्रेसने तेच केले. भाजपही तेच करतय, हे फार चांगले आहेत, असे समजू नका. दोघांची नियत आणि नीती सारखीच आहे. काल काँग्रेसमध्ये होते. आज तेच भाजपमध्ये मंत्री होऊन आलेत. भाजपमध्ये सासरा आहे, राष्ट्रवादीत जावई आहे, शिवसेनेत यिवाय आहे, काँग्रेसमध्ये मेव्हणा आहे, मिळून त्यांचीच पार्टी सत्तेत चालतीया. तुमच्या हातात काही हाय का..? याचा विचार करून राष्ट्रीय समाज पक्षावर प्रेम करा. महाराष्ट्राची दिशा बदलल्याशिवाय राहणार नाही. तरुणांना रोजगाराला काम दिले जाईल. शिक्षणात प्रगती केली जाईल. अमेरिकेत नोबेल मिळतं, भारताला मिळत नाही, मग आमची शिक्षण व्यवस्था चांगली आहे का..? याचा अभ्यास आपण मंडळींनी केला पाहिजे. कृषी क्षेत्रात पंजाब, तेलंगणा, हरियाणा पुढे आहे. एवढेच नाही तर कर्नाटक देखील पुढे आहे. महाराष्ट्रात काय कमी आहे..? फक्त शेतकऱ्यांच्या हिताची नियत पाहिजे. माझी तुम्हाला विनंती आहे, भाजप, काँगेस, राष्ट्रवादी शिवसेना या चारही पक्षापासून सावध राहावे. राष्ट्रीय समाज पक्ष मोठा करा. सत्य असेल त्यालाच न्याय मिळेल. चोरी करून लपायला येणाऱ्याला रापात संधी नसणार आहे.

आज मला आनंद वाटला मी १६ लोकसभा मतदारसंघात फिरलो. पाच पैसे मी तुम्हाला दिले नाही. प्रत्येक लोकसभेत तुमच्याच गाड्या घेऊन, तुमचेच पैसे, डिजिटल फलक, बॅनर बघितले. सर्व ठिकाणी पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही कुठला कॉर्नर ठेवला नाही. दहा पैसे कोणाला दिले नाही. उलट प्रत्येक लोकसभा मतदार क्षेत्रात लाख, दीड लाख रुपये मिळाले. फुलांच्या हार ऐवजी सर्व समाजाच्या लोकांनी मला नोटांचा हार दिला. जैन, लिंगायत, मराठा, ओबीसींचे सर्व घटक सर्वच समाजाने मला मोठे केलेले आहे. माझा देह तुमच्यासाठीच राहणार आहे. स्वार्थासाठी काहीच करणार नाही. माझा पुतण्या, पुतणी कोणी राजकारणात नसणार आहे. महादेव जानकर हा शेवट असेल. देशाची सेवा करण्यासाठीच जन्माला आलेलो आहे. राजकारणात बनवाबनवीची भाषा करणार नाही.

आमचं म्हणणं आहे, 'जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी' त्या त्या समाजाला हिसा त्या प्रमाणात मिळाला पाहिजे. राजकीय, प्रशासकीय, सांस्कृतिक हिस्सा मिळाला पाहिजे. सांस्कृतिकचा मक्ता ठराविक लोकांचाच आहे का..? आम्ही फक्त नाव घ्यायची मोठ्या मोठ्या नेत्यांची, हे जर बदलायचे असेल तर आपण देखील बदललं पाहिजे. केंद्रीय कार्यकारी समितीचा निर्णय पाळा. आम्ही तुमचा विचार घेऊ. तुमच्या हिताला बाधा येणार नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या विचाराचे सरकार आणण्याचा प्रयत्न करू.

वर्धापन कार्यक्रमस्थळी देशभरातील रासप प्रेमींच्या उपस्थितीत बारामती लोकसभा मतदार क्षेत्र जन स्वराज यात्रेचा समारोप करण्यात आला. राष्ट्रीय कार्यकारणीतील पदाधिकारी यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. प्रेमकुमार यांनी लोकगीते सादर केली. पुणे रासप पदाधिकारी अंकुश देवडकर यांच्या कन्येने उत्कृष्ट नृत्य केले. 'राष्ट्रीय समाज पक्षाच सरकार देशात आणायचंय' या गीताची धून कार्यक्रमस्थळी वाजत होती. ब्रम्हकुमारी परिवारतर्फे ब्रम्हचारी नेते महादेव जानकर यांना राखी बांधण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी तर्फे चांदीची तलवार, फुले पगडी देउन जानकर साहेबांचा सत्कार करण्यात आला. मराठा समाजाचे युवा नेते विनोद सपकाळ, धनाजी साखळकर, राजकुमार पाटील यांच्यावतीने ५१ हजार रुपयांचा हार जानकर साहेबांना घालून सत्कार करण्यात आला. उपळाई बुद्रुक तालुका माढाचे सरपंच मधुकरमामा वैद्य यांच्याकडून २१ हजार रुपये, एड. विजय लेंगरे, आण्णा नरोटे ११ हजार रुपये हार, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य प्रसाद खोबरे यांच्याकडून ५१ हजार रुपयांचा हार, कोल्हापूर जैन समाज संघटना ५१ हजार रुपये, भाऊसाहेब आखाडे पाच हजार रुपये, लक्ष्मण ठोंबरे अडीच हजार रुपये, बळीराजा संघटना गणेशदादा शेवाळे यांच्याकडून पाच हजार एक रुपये देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते म्हणाले, लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवाजी पार्कवर भव्य दिव्य कार्यक्रम घेऊ. गावागावात राष्ट्रीय समाज पक्षाचे विचार कार्यकर्त्यांनी पोहोचवायचे आहेत. पुणे येथील कार्यक्रमासाठी आर्थिक मदत करणाऱ्या बांधवांचा नामोल्लेख करून रासप पक्ष जनतेच्या लोकवर्गणीतून चालतो, असे महाराष्ट्र राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांनी स्पष्ट केले. 'कार्यकर्ते व ही सभा पाहिल्यानंतर जानकर साहेब तुम्ही आभाळाला गवसणी घातली पण तुमचे पाय जमिनिवरच आहेत, याचा आम्हाला आनंद होत आहे', असे युवा नेते संदीप माटेगावकर यांनी सांगितले. विदर्भात १० पैकी २ लोकसभा मतदार क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्षाला विजय मिळवून देऊ, असा विश्वास विदर्भ अध्यक्ष प्रा. रमेश पिसे यांनी व्यक्त केला. ज्याप्रमाणे मराठवाड्याने विधानसभेचे खाते उघडले त्याप्रमाणे मराठवाड्यातून लोकसभेला राष्ट्रीय समाज पक्षाचे खाते उघडू, असे प्रतिपादन मराठवाडा अध्यक्ष प्रा. विष्णू गोरे यांनी केले. कार्यक्रमस्थळी मासिक विश्वाचा यशवंत नायक अंकाचे सभासद नोंदणी टेबल व्यवस्थापकीय संपादक जयसिंग राजगे सर यांनी मांडला होता. तमिळनाडू महिला आघाडी अध्यक्ष कायल विझी, राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवलिंगप्पा किन्नुर (कर्नाटक), बिहार प्रभारी गोपाल पाठक, गरीब सेना आगरा येथील बालयोगी, युवक आघाडी नेते अजीत पाटील, दिल्लीचे वीरपाल सिंग, जलुलुद्दिन शहा, व्याख्याते मंगेश झंजे, उत्तर प्रदेश अनुसुचीत जाती जमाती आघाडी अध्यक्ष नरेश वाल्मिकी, जनता दलाचे नेते संग्राम शेवाळे, महिला आघाडी नेत्या सुवर्णाताई जराड, उत्तर प्रदेश संघटनमंत्री प्रदीपसिंग तोमर, महाराष्ट्र राज्य सचिव रवींद्र कोठारी, उत्तर प्रदेश अध्यक्ष चंद्रपाल, पत्रकार विवेक चौकीदार, रामलाल यादव आदींनी शुभेच्छ्यापर मनोगत व्यक्त केले. फुले पिठावर राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे (मामा), गोविंदराव शुरनर, पंडित घोळवे, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, ईशान्य भारत संघटक रामकुमार पाल, राष्ट्रीय खजिनदार मोहन माने, गुजरात प्रभारी सुशील शर्मा, कर्नाटक प्रभारी सुनील कीन्नुर, राजस्थान प्रभारी लक्ष्मण राजपुरोहित, वैशाली विरकर, सुनीताताई किरवे, बबनदादा विरकर, किसन भोसले आदी विराजमान होते. सभास्थळी मोठी गर्दी उसळली होती.

आपले मनोगत व्यक्त करताना देशभरातील रासपप्रेमी

प्रा. विष्णु गोरे, मराठवाडा अध्यक्ष रासप 

बालयोगी, आगरा उत्तर प्रदेश

श्री काशिनाथ शेवते- प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र रासप

श्री. रवींद्र कोठारी- महाराष्ट्र राज्य सचिव रासप 

श्री. गोपाल पाठक - प्रभारी बिहार रासप 

श्री. चंद्र पाल - प्रदेशाध्यक्ष उत्तर प्रदेश रासप 

एड. रमेश पिसे -विदर्भ अध्यक्ष रासप 

श्री. नरेश वाल्मिकी - अध्यक्ष राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आघाडी प्रदेश

श्री.शिवलिंगप्पा किन्नुर - प्रभारी कर्नाटक रासप 

श्री. सचिन शेवाळे - युवा नेता जनता दल

श्री. विवेक टायगर- पत्रकार दैनिक यशोभूमी

श्री. ज्ञानेश्वर सलगर - मुख्य महासचिव महाराष्ट्र रासप 

श्री. यादव - उत्तर भारत रासप 

ब्रह्मकुमारी परिवार सदस्य यांचा सन्मान रासपने केला.

श्री. प्रदीप सिंह तोमर- संघटनमंत्री उत्तर प्रदेश रासप 

सौ. कयालविजि- महिला आघाडी अध्यक्ष तमिळनाडू रासप 


जे. डी शहा-  मराठवाडा रासप नेता

श्री वीरपाल सिंह - नेता दिल्ली रासप 

श्री. अजितकुमार पाटील- युवा नेता महाराष्ट्र प्रदेश युवक आघाडी

भुरे सिंह - उत्तर प्रदेश महासचिव रासप 


No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025