Thursday, September 14, 2023

राज्यकर्त्यांना धनगर आरक्षणाचा प्रश्न प्रलंबीत ठेवायचा आहे : महादेव जानकर यांचा घणाघाती आरोप

राज्यकर्त्यांना धनगर आरक्षणाचा प्रश्न प्रलंबीत ठेवायचा आहे : महादेव जानकर यांचा घणाघाती आरोप



दिल्ली (११/९/२३) : यशवंत नायक ब्यूरो

मराठा, धनगर समाजाला निश्चितपणे आरक्षण मिळायला पाहिजे. मराठा समाजातील कुणबी अगोदपासूनच ओबीसीमध्ये आहेत. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर केंद्रानं ओबीसींचा कोटा वाढवला पाहिजे. ओबीसी समाजावर मुळातच अन्याय झालेला आहे. काँग्रेस, भाजप शासित राज्यकर्त्यांना धनगर आरक्षणाचा प्रश्न प्रलंबीत ठेवायचा आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला. महादेव जानकर दिल्लीत प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. धनगर समाजावर आजपर्यंत अन्यायच केला आहे. केवळ आश्वासने देऊन, मुद्दामहून समाजाला झुलवत ठेवायचे आहे. र आणि ड चा घोटाळा करुन या समाजाला संविधानिक हक्कापासून वंचित ठेवलेले आहे. शासन प्रशासनात या समाजाला जाणीवपूर्वक डावलले जातेय. सत्तेच्या जोरावर आरक्षण रोखले आहे, म्हणूनच आम्ही प्रधानमंत्रीची खुर्ची हलविण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष देशभरात फिरून आपली ताकद वाढवतोय. आम्ही भिक मागत बसणार नाही, स्वतःच सत्तेत जाऊन आरक्षण तात्काळ अंमलबजावणी करणार आहे.

धनगरांची आजही अवस्था आदिवासीपेक्षा बेकार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळायचे. मूळच्या आदिवासी समाजावर आम्हाला अन्याय करायचा नाही. मात्र ज्या बाहेर राहीलेल्या देशभरातील जमाती आहेत, त्यांना केंद्र सरकारने कायदा करुन संविधानिक हक्क दिले पाहिजेत. धनगर समाजाला आरक्षण अमंलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सकारात्मक रिपोर्ट पाठवला पाहिजे. प्रधानमंत्री, राष्ट्रपतीला सर्वपक्षीय शिष्मंडळाने भेट घेतली तर चांगल होईल.

1 comment:

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...