शासकीय नोकऱ्यांचे खासगीकरणास राष्ट्रीय समाज पक्षाचा तीव्र विरोध : शरद दडस
ठाणे : यशवंत नायक ब्यूरो, महाराष्ट्र राज्यात शासकीय नोकऱ्यांचे खासगीकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सदरचा निर्णय हा संविधानविरोधी आहे. शासनाने हा निर्णय लवकरात लवकर मागे घ्यावा. या निर्णयाने युवकांचे भविष्य धोक्यात आले आहे, त्यामुळे या निर्णयास राष्ट्रीय समाज पक्षाचा तीव्र विरोध राहील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय समाज पक्षाचे विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष शरदभाऊ दडस यांनी यशवंत नायकशी बोलताना दिली. श्री. दडस हे ठाणे जिल्ह्याचा दौऱ्यावर विद्यार्थ्यांचे संघटन बांधणीसाठी आले होते. यावेळी प्रा. डी. जी. अनुसे सर, ठाणे विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष सार्थक बागुल, सैय्यद खान, करण वर्मा आदी उपस्थित होते.
श्री. दडस पुढे म्हणाले, खासगिकरण म्हणजे गुलामीकरण होय. ब्रिटिशकालीन भारतात उच्ववर्णीय कर्मचारी वर्गावर अन्याय होत होता, त्यातूनच गोखले, रानडे यांनी काँग्रेस उभी केली. आज स्वतंत्र भारतात भारतीयांना स्वातंत्र्य मिळाले आहे का? असा प्रश्न निर्माण झालाय. राज्यकर्त्यांनी युवकांचे हित पाहण्याऐवजी त्यांच्यावर अन्याय करणार धोरण राबिविले आहे. शासन आपल्या मर्जीतील लोकांना नोकर भरतीचे कंत्राट देऊन युवकांचे शोषण करू इच्छित आहे, असा आरोप ही श्री. दडस यांनी केला.
No comments:
Post a Comment