राज्यातील प्रस्थापित पक्ष भाषा गरिबांची बोलतात, पण न्याय द्यायची भूमिका घेत नाहीत : महादेव जानकर
खोरोची ता. इंदापुर येथे महादेव जानकर यांना महिला भगिनींनी औक्षण करून व नोटांचा हार घालून स्वागत केले. |
खोरोची(२८/८/२३) : ए. पी. यशवंत
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर खोरोची ता- इंदापूर येथे भाषणात म्हणाले, आज मला येथे माता-भगिनींनी पैशाचा हार घालून स्वागत केले. त्याबद्दल माता-भगिनींचं गावकऱ्यांचं अभिनंदन करतो आणि हृदयातून आभार मानतो. २० वर्षापूर्वी या गावातील लोकांनी मला वाढदिवसाला पैशाची थैली दिली होती, ते पोलीस पाटील देखील आज हयात आहेत. आज त्यांच्या बहिणीने देखील मला पैसे दिले. त्या पैशाचा वापर मी चांगल्यासाठी केला. स्वतःचा आयुष्य मौज मजा करण्यासाठी घालवले नाही. स्वतःचा स्वतःचा झेंडा आणि दांडा असणारा स्वतःचा पक्ष भारतभर सक्षम केला. तुमच्या मुलाबाळांना येणाऱ्या पिढीला तिकिटाची फॅक्टरी तयार केली. कोणाकडे तिकीट मागायची गरज नाही. प्रस्थापित पक्षातून आमदार खासदार मंत्री झालो तरी समाजाचे भले होणार नाही. स्वतःचा पक्ष मोठा केला तरी एक दिवस समाजाचे भलं होईल असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. डॉक्टर आंबेडकरांनी स्वतःचा पक्ष काढून काँग्रेस बरोबर युती करून 340 व कलम देण्याचा प्रयत्न केलेला आहे. राज्यातील काँग्रेस भाजप शिवसेना राष्ट्रवादी हे प्रस्थापित पक्ष गरीबाची भाषा बोलतात, पण सर्वसामान्यांना न्याय देत नाहीत. आज मी तुमच्या गावात कुठल्या पक्षाचा आमदार, चमचा बनून आलेलो नाही. तुम्ही दिलेल्या दहा रुपयेच्या जीवावर झालेला आमदार म्हणून तुमच्या गावात आलेलो आहे. मला मोदी सोनिया गांधी बाळासाहेब ठाकरे शरद पवार यांचा फोटो लावावा लागत नाही. तर महादेव जानकर यांचा फोटो लावून महाराष्ट्राच्या विधानसभेत चार आमदार आणलेला हा महादेव जानकर आहे. हा स्वाभिमानाचा लढा आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, आपला पक्ष सांभाळलं पाहिजे. माझ्याकडे गरीब कार्यकर्त्यांनी दहा दहा रूपये देऊन पक्ष वाढवला. तुमच्या पैशावर १८०० कीमी दिवसाला प्रवास करतोय. कधी विमान, मोटारसायकल, चारचाकी, रेल्वेने असेल. माझी तुम्हाला विनंती आहे आपला एवढा मोठा समाज असताना तुम्हाला कोणीही विचारत नाही. या देशात सत्तावन्न टक्के ओबीसी असताना ओबीसींची जनगणना होत नाही. तुम्हाला नुसत ऊसावर अवलंबून राहू नये. मुलामुलींना चांगल शिक्षण द्यावं लागेल. मी भल्याभल्यांना सांगू इच्छितो आमच्या फॅक्टरी तयार होतात आणि दुसऱ्या फॅक्टरीत निघून जातात, पण पाच वर्षांनी ते विजून जातात. मला सोडून जातो, तो मातीमोल होतो आजपर्यंतचा इतिहास आहे. तुमच्या जिल्ह्यात राहुल कुल राष्ट्रवादीच्या तिकिटावर हरला होता. त्याला राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावर दौंडमध्ये निवडून आणला. भाजपने त्याला चोरून नेलं, पण पुढच्या निवडणुकीत त्याचा कार्यक्रम केला जाईल, त्यासाठी महादेव जानकर खंबीर आहे. राष्ट्रीय समाज पक्ष कलेकलेने वाढत चाललेलाय. कोण येतय कोण जातय याचा विचार करू नका. महादेव जानकरने या देशात वादळ सुरू केलेला आहे त्याला साथ द्यायची भूमिका करा. या देशात माझ्या वाढदिवसाला सर्वात जास्त पैसा जैन समाजाने दिला, त्या जिल्ह्याच नाव कोल्हापूर आहे. तुम्ही शंभरच्या, दोनशेच्या, पाचशेच्या नोटा दील्या आया बहिणीनो, तो पैसा सत्कर्मी काम केल्याशिवाय महादेव जानकर राहणार नाहीत. एक दिवस पंतप्रधान होऊन खोरोची गावाला येईल. एकवेळ मला नाही मानले तरी चालेल पण मी दिलेल्या जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षाला माना.
No comments:
Post a Comment