राज्यात कोणताही शेतकरी युवक सुखी नाही : महादेव जानकर यांचे जन स्वराज यात्रेत प्रतिपादन
निमगाव केतकी येथून बारामती लोकसभा मतदार क्षेत्रात महादेव जानकर यांनी बैलगाडी हाकत जन स्वराज यात्रेस प्रारंभ केला. |
इंदापूर : यशवंत नायक ब्यूरो २७/८/२३, जनता आता पाहत आहे. वेगवेगळ्या पक्षात कशा घडामोडी चालले आहेत. महाराष्ट्रातील कोणताही शेतकरी व युवक सुखी नाही. तज्यांनाना आम्ही स्वतःचे नेते म्हणत आहोत, ते आज वेगळ्या विचारांनी वागत असल्याचे दिसते. राष्ट्रीय समाज पक्षाची जनस्वराज यात्रा इंदापूर तालुक्यात आल्यानंतर निमगाव केतकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांची बैलगाडीतून पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढून स्वागत केले. यावेळी ते बोलत होते. ग्रामदैवत केतकेश्वर महाराज मंदिरात दुग्धभिषेक करण्यात आला.
विठ्ठलाला साकडे घालून जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी, गेल्या दीड महिन्यापासून जन स्वराज यात्रा सुरू आहे. जनतेचे राज येण्यासाठी तसेच महात्मा फुले यांना अभिप्रेत असणारे शेतकऱ्यांचे राज्य येण्यासाठी रासपच्या वतीने जन स्वराज यात्रा काढली आहे. यावेळी राशीचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, माऊली सलगर,किरण गोफने, तानाजी शिंगाडे, सर्जेराव जाधव, एड. सचिन राऊत, तात्यासाहेब आदलिंग, माणिक भोंग, एड. श्रीकांत करे, संतोष घनवट, दादासाहेब शेंडे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment