महादेव जानकर यांच्या उपस्थितीत उदयपूर येथे लोकसंत अमरा भगत जयंती साजरी
उदयपूर - राजस्थान(७/०९/२३) : यशवंत नायक ब्यूरो
लोकसंत श्री. अमरा भगत यांच्या १८१ व्या जयंती निमित्त आयोजित विशाल समाज समागम यात्रेस उदयपुर जिल्हा राजस्थान येथे लाखो जनसमुदायास राष्ट्रनायक श्री महादेव जानकर, विधायक, पूर्व कॅबिनेटमंत्री महाराष्ट्र संस्थापक राष्ट्रीय समाज पार्टी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. भव्य मोटर सायकल रॅलीला झेंडा दाखवला. पूढे ही रॅली श्री अनगढ़ भावजी समाधिकडे रवाना झाली. यावेळी रासपचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरेमामा, गिर्राज पहलवान, सुभाष चौधरी, भेरूलाल गाडरी, प्रकाश गायरी एवम श्री लोकेश उपस्थीत होते. सायंकाळी महादेव जानकर राजस्थान दौऱ्यावरून उत्तरप्रदेश मथुरा, आगराकडे मार्गस्थ झाले.
No comments:
Post a Comment