शासनाविरुद्ध धनगर समाजाचा संताप; कळंबोली नवी मुंबईत केला निषेध
कळंबोली (१७/९/२३): सत्ता मिळवण्यासाठी धनगर समाजाला वेळोवेळी दिलेल्या आश्वासनाकडे केंद्र व राज्य शासनाने दुर्लक्ष केल्याने, सोलापूर येथे भंडारा उधळून समाजाच्या अत्यंत निकडीच्या एस.टी आरक्षण विषयाकडे शासनाचे लक्ष वेधनाऱ्या मल्हाररत्न श्री. शेखर बंगाळे यांना झालेल्या मारहाणीचा कळंबोली नवी मुंबई शहरात धनगर समाजाने शासनाचा जाहिर निषेध केला. केंद्र व राज्य सरकार धनगर समाजाला देत असलेल्या साप्तनुक वागनुकीबद्दल संताप व्यक्त केला.
आद्य महिला स्वातंत्र्यसेनानी भिमाराणी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. चौंडी येथे सुरू असलेले धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी आमरण उपोषण व राज्यभर ठिकठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा दर्शवून नवी मुंबई शहर धनगर समाज बांधवातर्फे समर्थन देन्यात आले. कर्नाटक, गोवा येथील राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. महाराष्ट्र सरकारने तातडीने योग्य तो अहवाल देऊन केंद्र सरकारकडे शिफारस करावी व केंद्र सरकारने विशेष अधिवेशनात धनगर समाज एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी वटहुकूम काढावा. नरेंद्र मोदी यांनी सोलापुर, बारामती येथे केलेल्या भाषनाची आठवण करुन दिली व आमची फसवणूक कराल तर तुम्हाला नक्कीच आमची ताकद दाखवून दिल्याशिवाय धनगर समाज स्वस्थ बसणार नाही, असा इशारा दिला. एकीची वज्रमूठ आवळत 'यळकोट यळकोट जय मल्हार', 'एस.टी आरक्षण आमच्या हक्काचे' अशी जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी सुदर्शन अक्कीसागर, आण्णासाहेब वावरे, बाळासाहेब पुकळे, चैतन्य जरग, शशिकांत मोरे, देवानंद मोटे, विजय मोटे, ऋषिकेश जरग, शहाजी खटके, बाळासाहेब हुलगे, अमोल ठोंबरे, आबासो पुकळे, चंद्रशेखर दडस, विकास ठोंबरे यांच्यासह अन्य समाज बांधव उपस्थित होते.
👍
ReplyDelete👍
ReplyDelete