राष्ट्रीय समाज पक्ष जिवंत ठेवला तरच राष्ट्रातील राष्ट्रीय समाज वाचेल : सिद्धप्पा अक्कीसागर
![]() |
वर्धापन दीन मेळाव्यात बोलताना सिद्धप्पा अक्कीसागर |
राष्ट्रीय समाज पक्षाचे भूतपूर्व राष्ट्रिय अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर आपल्या भाषणात म्हणाले, पुणे ही साहित्य नगरी आहे. विद्येचे माहेरघर म्हणतात. आज हा कार्यक्रम बघितल्यानंतर मला वाटले, हे स्वारगेट नसून सदाशिव पेठ आहे. कार्यक्रम सुंदर झाला, बहारदार झाला. आजच्या कार्यक्रमासाठी दिल्ली, कर्नाटक, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात देशभरातून लोक आलेले आहेत. महाराष्ट्र राज्यभरातून लोक आलेले आहेत. आज मनापासून जानकर साहेबांच्या कार्यकर्त्याचे अभिनंदन करतो. आज रासपला २० वर्षे पूर्ण झाली. राष्ट्रीय समाज पक्ष नवजवान पार्टी झाली. भारतातील पहिली पार्टी कोणती? असा प्रश्न अक्कीसागर यांनी उपस्थित केला? उत्तर आले नाही. त्यावर श्री. अक्कीसागर उत्तरले, १९८५ साली पुण्यात काँग्रेसचा जन्म झाला. सर ह्यूम या ब्रिटिशाने काँग्रेस स्थापन केली. त्यांचे राज आले, आणि ते गेले, भाजप आले. आज जो दिसणारा भारत हा महात्मा फुले यांच्या विचारामुळे बनला आहे. संविधान लिहणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षण देणारे राजा शाहू महाराज यांचे गुरु महात्मा फुले होते. या पुण्यात महात्मा फुले यांनी खूप मोठे मानवतावादी काम केले. 'महात्मा फुलेवादावर चालणारी रासप एकमेव पार्टी आहे. देशातला सर्वात मोठा विचार घेऊन राष्ट्रीय समाज पक्ष चालत आहे. राष्ट्रीय समाज पक्ष दोन पायावर चालत आहे, एक पाय राष्ट्रीय समाज, दुसरा पाय महादेव जानकर आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाला जिवंत ठेवले तरच राष्ट्रीय समाज वाचेल. या देशात लाखो क्रांतिकारकांनी बलिदान दिले. पण आपणाला मोजकेच क्रांतिकारक माहीत आहेत, पण अशा अनेक उपेक्षित महानायकांना घेऊन चालणारी रासप पार्टी आहे. आपल्या जनमतामुळे संसद, विधानसभागृहात जनप्रतिनिधी आहेत. मताधिकार हा मोठा अधिकार आहे. महादेव जानकर यांनी मत अधिकाराची ताकद सांगण्यासाठी, मिशन लोकसभा निवडणूक अंतर्गत जनतेला हुशार करण्यासाठी जन स्वराज यात्रा चालू केली आहे. जानकर साहेबांच्या नेतृत्वात जनतेच राज आणण्यासाठी संसदेवर सत्ता मिळवायची आहे.
👍
ReplyDelete