कोकणात राष्ट्रीय समाज पक्षाचे काम वाढवा : महादेव जानकर
कळंबोली शहर राष्ट्रीय समाज पक्ष कार्यालयात आ. महादेव जानकर यांनी आढावा घेतला. |
कळंबोली : यशवंत नायक ब्यूरो
देशभर राष्ट्रीय समाज पक्षाची पाळेमुळे रुजत आहेत. मात्र म्हणावे तसे संघटन कोकणात दिसत नाही. कोकणात राष्ट्रीय समाज पक्षाचे काम वाढवा, असे निर्देश पदाधिकाऱ्याना राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/ राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिले. काल दिनांक १८/०९/२०२३ रोजी श्री. जानकर यांनी कळंबोली शहर रासप कार्यालयास भेट दिली.
पनवेल तालुका, कळंबोली शहर, पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पक्ष संघटनेचा आढावा घेऊन, उर्वरित नियुक्त्या चार दिवसांत पूर्ण करा. काम करणारे पदाधिकारीच नेमा. निष्क्रिय पदाधिकारी यांना पदमुक्त करून, नवीन कार्यकर्त्यांना संधी द्या, अशा स्पष्ट शब्दांत आ. जानकर यांनी सूचना केल्या. राज्यभरात विविध ठिकाणी पक्षाचे कार्यक्रम होत आहेत. कोकणात मात्र पक्षाचे कार्यक्रम राबवले जात नाहीत. कोकणात अद्याप मिशन लोकसभा २०२४ जन स्वराज यात्रा झालेली नाही. लवकरात लवकर जन स्वराज यात्रेचे नियोजन करावे. पुढील चार दिवसांत पुन्हा दौरा करणार असल्याचे सूतोवाच आ. महादेव जानकर यांनी केले. पक्ष संघटनेचा आढावा घेताना पदाधिकारी यांची हजेरी घेऊन कानपिचक्या दिल्या.
मोठ्या पक्षात बहुजन समाजातील लोकांचा दर्जा वेगळा आहे, याकडे आ. जानकर यांनी लक्ष वेधले. सत्तेत स्थान देताना राज्यमंत्री पदावर बोळवण केली जाते. त्यामुळे रासपच्या पदाधिकारी यांनी उपेक्षित सर्वच समाजाला सोबत घेऊन पक्षाचे काम वाढवावे. यावेळी राज्य कार्यकारणी सदस्य भगवान ढेबे, रायगड महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मनिषाताई ठाकुर, पनवेल तालुका अध्यक्ष मुकेश भगत, गोरखनाथ वाघमारे, कळंबोली शहर अध्यक्ष आण्णासाहेब वावरे, देविदास खेडकर, शहर उपाध्यक्ष शहाजी शिंदे, पंढरीनाथ पवार, पनवेल शहर प्रसिद्धीप्रमुख अक्षय मिसाळ, प्रल्हाद कुंभार, युवा नेते शशिकांत मोरे, दत्ता अनुसे सर, दीलीपशेठ माने, सुनील तांबे, सागरशेठ गोरड, अमोलशेठ माने, अशोक कोकरे, रामचंद्र मदने, तानाजी कोकरे आदी उपस्थित होते.
भेट शुभेच्छ्या...!
छायाचित्र संकलन : ( तानाजी कोकरे, शशिकांत मोरे, दत्ता अनुसे)
Jay RSP
ReplyDelete