सामान्य माणूस राजकारणात जिंकला पाहिजे : महादेव जानकर

बारामतीत महादेव जानकर यांचे जंगी स्वागत
बारामती (२८/८/२३) : यशवंत नायक ब्यूरो
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वात जन स्वराज यात्रा सायंकाळी बारामती शहरात आली असता, बारामतीकरांनी जंगी स्वागत केले. काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांचं घराणेशाहीच राजकारण चालू आहे, ते मोडीत काढून. सामान्य माणसाचं राज या देशात यावे, यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाने जन स्वराज यात्रा सुरू केली आहे. पुतण्या, भाऊ, नातू, मुलगा याला कुठेतरी छेद दिला पाहिजे. ज्यांच राजकरणात कोणी नाही, असे लोक या देशाचे मालक झाले पाहिजे. बारामती लोकसभा मतदार क्षेत्रातील जनतेने माझ्यावर प्रेम केले. याठिकाणी रासपचा आमदार खासदार जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. ५४३ लोकसभा मतदार क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्ष निवडणुकीच्या आखाड्यात उतरनार आहे. या देशातील घराणेशाही संपली पाहिजे. सामान्य माणूस देखील या राज्याचा मुख्यमंत्री आमदार खासदार झाला पाहिजे. राजकरणात सामान्य माणूस जिंकला पाहिजे. यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे, बारामती तालुकाध्यक्ष एड. अमोल सातकर व अन्य रासप पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. बारामती लोकसभा मतदार क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्षाचे तगडे वातावरण आहे.
No comments:
Post a Comment