Tuesday, June 14, 2022

नांदेड जिल्हा राष्ट्रीय समाज पक्ष आढावा बैठक पार

नांदेड जिल्ह्यची राष्ट्रिय समाज पक्षाची आढावा बैठक पार



 नांदेड ( प्रतिनिधी):- शनिवारी विसावा पॅलेस नांदेड येथे राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक मराठवाडा प्रमुख प्रा विष्णू गोरे यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आली. या बैठकीला प्रमुख पाहुणे राष्ट्रिय संघटक गोविंदराम शूरनर , मराठवाडा मार्गदर्शक डॉ बाबूराव श्रीरामे, लातूर जिल्हाध्यक्ष बोडके यांची उपस्थिती होती.

आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना गोविंदराम शूरनर म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका पक्षाने स्वबळावर लढवण्याचे ठरविले आहे, त्यासाठी कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण, नगरपालिका, महानगरपालिका यांचे वार्ड बांधनी करावी व प्रत्येक बुथवर कार्यकरणी करावी असे प्रतिपादन केले.अध्यक्षिय भाषणात विष्णू गोरे म्हणाले, जिल्हाध्यक्षानी जिल्ह्यात पक्षाचे सर्व आघाड्याची बांधनी करून बुथ पर्यंत लवकरात लवकर पोहचावे आणि निवडणुकीत सर्व जागेवर उमेदवार उभे करणयाची तयारी करावी असे म्हणाले . 

या बैठकित पुढील प्रमाणे नियुक्त्या देण्यात आले.

नांदेड जिल्हाध्यक्ष प्रा.शिवाजीराव इंदूरे यांनी कार्यकर्त्यांना पुढील जबाबदारी सोपवली. महिला जिल्हाध्यक्षापदी अॅड.चंद्रभागाताई बंदखडके, महिला उपाध्यक्षपदी सौ.भाग्यश्री सुभाषराव हाके, जिल्हा संपर्कपदी श्री.राजेश्वर बुद्धेवार, लोकसभा अध्यक्ष श्री.तात्याराव डोके सर, कंधार तालुकाध्यक्षपदी  श्री.संजयकुमार विठ्ठलराव जायेभाये,लोहा तालुका अध्यक्ष श्री.सुभाष सखाराम केंद्रे, जिल्हा उपाध्यक्ष श्री.रावसाहेब दगडोबा गीते, देगलूर तालुका अध्यक्ष श्री अॅड.योगेश मंत्री, अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष देगलूर तालुका मा.श्री.मणियार अहेमदभाई, देगलूर तालुका युवाध्यक्षपदी श्री.प्रकाश दत्ता भालेराव, देगलूर शहर अध्यक्षपदी श्री.मलिकार्जुन कडलवार, लोहा तालुका उपाध्यक्ष राम महाराज वडेपुरीकर, बिलोली तालुकाध्यक्ष श्री मोहन मुदनकर व इतर रासप कार्यकर्ते याना नियुक्ती देण्यात आले.

या आढावा बैठकिला जिल्हाती सर्व तालुका कार्यकर्ते उपस्थित होते. अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव इंदुरे  यांनी दिली.    












-------------------------------- 

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...