Monday, June 20, 2022

दिल्लीत राजा राहतो; आम्हाला राजा बनायचंय : महादेव जानकर

दिल्लीत राजा राहतो; आम्हाला राजा बनायचंय : महादेव जानकर
दिल्लीत अहिल्याबाई होळकर जयंती प्रसंगी बोलताना रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर
दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षातर्फे महाराणी अहिल्याबाई होळकर यांची २९७ वी जयंती साजरी!

राष्ट्र भारती द्वारा, दिल्ली- आबासो पुकळे : 'नकली सत्ता मुंबई, लखनऊ, बेंगलोर मध्ये आहे तर असली सत्ता दिल्लीत आहे'.  दिल्लीत राजा राहतो तर मुंबई, लखनमध्ये सुभेदार राहतो. आम्हाला राजा बनायचे आहे म्हणून दिल्लीला आलोय असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. राष्ट्रीय समाज पक्ष नवी दिल्ली युनिट द्वारा दिनांक  ३१ मे २०२२ रोजी महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या २९७ व्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन श्री सत्यसाई आंतराष्ट्रीय सभागृह लोधी रोड, दिल्ली येथे केले होते. यावेळी मार्गदर्शन करताना महादेव जानकर बोलत होते.

श्री.जानकर भाषणात म्हणाले, महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी काय केले, याबद्दल बरेच लोक बोलले. अहिल्याबाई होळकर यांचा फोटो, विचारधारा घेऊन पुढे कसे जायचे, हे आज मी सांगणार आहे. 'हिंदू'चा फायदा कोणाला जास्त झाला, याचा आम्हाला विचार केला पाहिजे?  हिंदू तर आपण सगळे आहोत. माझी आई हिंदू आहे, मी हिंदू आहे, परंतु हिंदू नावाचा फायदा आजपर्यंत कोणी घेतला?  मी ज्यावेळेस महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री झालो, त्यावेळी माझ्या समाजात एकही चीफ सेक्रेटरी नव्हता. त्यागी समाजाचाही नव्हता, मी बघितले ९०% कोणाचे बनले तर वेगळे आहे. आपण इतिहास वाचतो, लिहितो पण इतिहासाचा फायदा कोण घेत आहे? अहिल्याबाई होळकर यांची जयंती मला का करावी लागली.?  आमचे डांगे साहेब, शेंडगे साहेब पुण्यतिथी करत होते. जयंती कोण करतही नव्हते. महाराणी अहिल्याबाईं होळकरांच्या जन्मगावात पार्टी का बनवावी लागली? आमची दखल घेत नव्हते, म्हणून आम्हाला अहिल्याबाईच्या जन्मगावात पार्टी बनवावी लागली. जिस समाज का दल नहीं है, उस समाज का बल नही ! ज्या दलात आपण काम करतो, ते दलही आमच्यासाठी काम करत नाही, चमचा बनून राहावे लागते. लीडर नाही लॅडर बनके रहते है!  काँग्रेसचा चमचा, नाहीतर बीजेपीचा चमचा बनतात, परंतु मालक बनून राहत नाही. मी तुम्हाला मालक बनवण्यासाठी दिल्लीत आलोय, मी लग्न केले नाही, त्याग केला असे लोक बोलतात. मला हे का करावे लागले? मी स्वतःला दोषी मानतो. जोपर्यंत डेलिगेशन, डीओशन, डिटरमिनेशन सुत्राने काम करत नाही, तोपर्यंत यशस्वी होणार नाही. मला आठवते वीस वर्षांपूर्वी नोयडात डॉ.रमेश पालच्या घरी आलेलो, त्याच्या बायकोला अध्यक्ष केले होते, त्यावेळेस तो बोलत होता, समता पार्टी चांगली आहे. छगन भुजबळांची पार्टी. छगन भुजबळ हुशार माणूस आहे, चांगला माणूस आहे, परंतु छगन भुजबळांचे नेतृत्व करणारे शरद पवार वेगळे आहेत. त्यांनी माझे ऐकले नाही, उत्तर प्रदेशात तर खूप लोकांनी पार्टी बनवली, मी त्यावेळी प्रवेश केला तर लोक बोलले असते जानकर आडवे येतात, खोडा घालतात. म्हणून मी युपीत आलो नाही. कर्नाटक, गुजरात केरळ, महाराष्ट्रवर भर दिला. माझा फोटो लावून आमदार, जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष, सभापती निवडून आलेत. फक्त खासदार नाही, संसद सदस्य जिंकल्यावर माझे राजकीय वर्तुळ पूर्ण होईल. जोपर्यंत तुम्ही तुमचे दल मजबूत करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कोणाच्या तरी मागे फिरत राहावे लागेल. बीजेपी, काँग्रेसमधून मंत्री झाला तरी त्यांचा चमच्या बनून राहावे लागणार. रासपातून बनला तर मालक बनून राहणार, मला माहित आहे रस्ता खूप आडवातिडवा आहे. मात्र एक दिवस जिंकू. मी वीस वर्षापूर्वी बोलत होतो, मी पंतप्रधान प्रधानमंत्री बनणार लोक, मला लोक वेडा बोलायचे. साधा नगरसेवक नाही, मोठी भाषा कशाला करताय? महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात राज्यात रासपचा झेंडा घेऊन नगरसेवक जिंकलेत. त्यामध्ये ब्राह्मण, मुस्लिम,  ख्रिश्चन, ठाकूर, कायस्त, दलीत, आदिवासी, ओबीसी आहेत. सर्व राष्ट्रीय समाज आहे. बुद्धिजीवी वर्ग माझ्यावर विश्वास ठेवत नव्हते, म्हणायचे बीएसपी, काँग्रेस, समाजवादी, बीजेपीचे काम करा. मी भाजपचा युतीतला भागीदार आहे, परंतु भाजप चांगला पक्ष नाही, तर आमची दुश्मन पार्टी आहे, हे सांगण्यासाठी मी दिल्लीत आलोय. मोदी मोठा माणूस आहे, परंतु भाजप माझा पक्ष नाही. मी मंत्री होतो, तेव्हा मी पार्टीचा राजीनामा दिला, पार्टीचा मालक एस.एल.अक्कीसागर यांना केले. मी एमएलसी बनलो, त्यावेळी त्यांची सही त्या ए.बी.फॉर्मवर होती, माझी नव्हती.  

अहिल्याबाई होळकर यांनी अनेक मंदिरे बांधली हे सर्वांना माहीत आहे, पण चर्च बांधले, मस्जिद बांधले, गुरुद्वार बांधले, हे का लपवले. हे कोण करतय? इतिहास लिहणारे कोण होते?  मला दहा-बारा भाषा बोलता येतात. इतिहासाच्या ठेकेदारांनो, अहिल्याबाई होळकरांनी मस्जिद, चर्च, गुरुद्वारा बांधले, हे का लीहले नाही.?  हे सर्व अभ्यासण्यासाठी ब्रिटिश लायब्ररी चा सदस्य व्हावे लागले, तेव्हा मला कळले, मंदिरासोबत अहिल्याबाई होळकरांनी मस्जिद बांधली. आमच्या समोर काय आले अहिल्याबाई केवळ हिंदू ची देवता आहे, सर्वजन कल्याणकारी महाराणी का समोर आली नाही, कारण आमच्या जवळ इतिहासकार नव्हते. 

श्री. जानकर पुढे म्हणाले, मी बुद्धिजिवी नाही, परंतु चांगला संघटक आहे, इंजिनीअरिंगचा विद्यार्थी आहे, तुमची पुस्तक अभ्यासून प्रात्यक्षिक प्रॅक्टिकल कसे करायचे ते करून मी पुढे जाणार आहे, नोकरी, घर, कपडा कोणीही देईल परंतु राजपाट कोणी देणार नाही, राज राजपाट घ्यायचा असेल तर तो स्वबळावर घ्या, हे गुरु गोविंद सिंगांनी सांगितलय, हे मानून दिवसातून तीन वेळा विचार करून चालतो. उत्तर प्रदेशात सरकार मोफत राशन देत आहे, आम्हाला राशन नाही पाहिजे, आम्हाला शासन "आमचं शासन" पाहिजे. आम्हाला भीक नको, राशन भिका आ. आम्हाला उल्लू बनवू नका,पंगू बनवू नका. आमची क्षमता सामर्थ्य विकसित केल पाहिजे, भारतात तीन लाख लोकांना कॅडर करत आहोत, संसदेत बहुमताने प्रधानमंत्री बनवण्यासाठी २७६ खासदार आले पाहिजेत, आम्हाला सत्ता पाहिजे, सत्ता नसेल तर तुम्हाला कोणी विचारणार नाही, महाराणी अहिल्याबाई शासक होत्या, म्हणून अहिल्याबाईंची आज आपण त्यांची जयंती करतोय.  शिकलेले लोक बोलतात, राजकारण घाणेरडे आहे, पोलीस मध्ये आमचा समाज जादा आहे, आपल्याला सरपंच नको तर खासदार बनायचंय, पोलीस नको कमिशनर पाहिजे, क्लार्क नको कलेक्टर बनायचे आहे. आम्ही राहुल गांधी, नड्ड, अखिलेश, मायावती जवळ तीन करोड रुपये देऊन प्रस्थापित पक्षांनी उमेदवारी मागतो, तरीही ते तिकीट देत नाहीत. कोणी म्हटले रासपकडे जावा तर म्हणतात त्यांना सोडा. आम्ही एनडीए मध्ये होतो. २८ पार्टी एनडीएमध्ये होतो. आम्ही सांगू इच्छितो, ज्यावेळी त्यांना कोण मानत नव्हते, त्यावेळी छोट्या पक्षांना त्यांनी पुढे आणले. वरती गेल्यावर छोट्या पक्षांना संपविण्याचा प्रयत्न केला, छोट्या पक्षांना संपविण्याचा कट भाजपने रचला. महाराष्ट्रात भाजप सोबत रासप नसेल तर भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही. आम्ही असेल तर तुम्ही असाल. आम्ही नसेल तर तुम्हीही सत्तेत राहणार नाही.  कारण माझा रस्ता एसपी सिंग बघेल, राजाराम पाल सारखा नाही. महादेव जानकरचा स्वतःचा रस्ता आहे, अशा शब्दात भाजप नेतृत्वाला श्री. जानकर यांनी फटकरले.

श्री. जानकर पुढे म्हणाले, आमच्या समाजात खूप मोठे नेते आहेत, पण त्यांना यातले काही समजणार नाही. राष्ट्रीय समाज पक्षाचे शेकडो उमेदवार उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या मैदानात होते, जिंकलो नसले तरी शिवसेना-राष्ट्रवादी पेक्षा रासपने मते जादा मिळवली. कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेशमध्ये रासपची पाळेमुळे रुजत आहेत. माझे दिल्लीवर जास्त प्रेम आहे, असली सत्ता दिल्लीत आहे, नकली सत्ता मुंबई लखनऊ बेंगलोर मध्ये आहे. दिल्लीत राजा राहतो. मुंबईला सुभेदार राहतो. आम्हाला सुभेदार बनायचे नाहीतर राजा बनवायचा आहे, म्हणून दिल्लीला आलोय. आज तीनशे लोक आहेत, पण तीनशेचे ३ करोड करून दाखवणार असा विश्वास श्री. जानकर यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, मी घरी जात नाही, लग्न नाही, कार्यकर्त्यांच्या घरी राहणारा देशातला एकमेव नेता महादेव जानकर आहे, प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी राहतो. मी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत नाही, माझ्यावर वरवरचे प्रेम नको तर मनापासून प्रेम करा. आरएसएसच्या अगोदर पाल महासभा स्थापन झाली, परंतु पलमहासभेने एकही नगरसेवक जिंकला नाही. लग्न लावण्याशिवाय पाल महासभेचे काम नाही. १९११ ला आर एस एस बनली.  आतापर्यंत त्यांनी प्रधानमंत्री, राष्ट्रपती पर्यंत सर्वकाही बनवले. मी पुढच्यावेळेस रासपातुन खासदार बनुन येतोय, मला कोणाची गरज भासणार नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मला मोदी, गडकरी व ज्यांनी मुलगा मानले ते गोपीनाथ मुंडे साहेब म्हणत होते, जानकरसाहेब कमळ चिन्ह घ्या. मी म्हणालो, पराभव झाला तरी चालेल, पण कमळावर लढणार नाही, शरद पवारांच्या कन्येविरोधात लढत होतो. ६९००० हजार मतांनी पडलो, मी धनगर समाजाला विचारले, माझी चूक काय आहे? ते म्हणाले, जानकर साहेब दीड लाखाच्या वर जाणार नाहीत, पवार साहेब जायंट किलर आहेत व ते जिंकतील. ज्यावेळेस मी सातव्या फेरीपर्यंत आघाडी घेतली, तेव्हा धनगरांना वाटायला लागले आपण चूक केली. आपण जानकर साहेबांना मत द्यायला पाहिजे होते.

उपस्थितांचे डोळे उघडताना जानकर म्हणाले, मोदी, राहुल गांधी, अहिल्याबाई होळकरांची जयंती करत असते? तर मला इथे यावं लागलं नसतं. १७ मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना पत्र लिहून पाठवले; अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त त्यांच्या नावाने 'मन की बात'मध्ये युवकांचे कल्याण, रोजगार शिक्षणासाठी बजेट पेश करा. मोदींनी साध ट्वीट केले नाही, इतरवेळी मोदी चांगल्या बाता करतात, अशा शब्दांत जानकरांनी तोफ डागली. आमचे सगळे बुद्धिजीवी लोक बोलतात, मोदी इज ग्रेट. मोदीने जयंतीला ट्विट केलं नाही.  अशा शब्दात समाजबांधवांना कानपिचक्या दिल्या. ते पुढे म्हणाले, जिस बाप का बेटा लायक होता है, उस बापकी इज्जत होती है, जिस बाप का बेटा नालायक होता है, उस बापकी बेइज्जत होती है, अहिल्याबाई आपल्या बाप होत्या. इतर वेळी मोदी अच्छी बाते करतात, त्यांना अहिल्याबाई होळकर जयंतीची आठवण आली नाही, आपण लायक नव्हतो, शिवीगाळ करून पाय खेचून समाजाचा विकास होणार नाही. 

रासपतर्फे  राजस्थान, कर्नाटक उत्तर प्रदेशात अहिल्याबाई होळकर जयंती साजरी झाली. परवानगीसाठी पलमहासभेचे लोक गेले तर , परवानगी मिळाली नाही.  परंतु रासपचे नरेश वाल्मिकी परवानगीसाठी गेले तर  एसपीने सल्यूट करत बाजूला बसवुन लगेच परवानगी दिली. कारण राजकीय पार्टीत ताकद असते, याचा विचार केला पाहिजे. आम्ही बार-बार सांगतो पण शिकले, सवरलेले लोक ऐकत नाहीत. साहेब चांगले आहेत, पण राजकारण नको, अडाणी लोकांनी राजकारण केले नाही ठीक आहे, पण तुम्ही सुशिक्षित आहात. इतर समाजांनी ब्राह्मण समाजाकडून शिकले पाहिजे. ब्राम्हण समाज  डेलिगेशन, डिओशन आणि डीटरमिणेशनने काम करतात. दोन हजार ब्राह्मणांनी ठरवले, देशाची लोकसभा जिंकायची. लग्न केले नाही तर संपत्ती आरएसएसला देतील.  रासपला पाल देणार नाहीत पण छाबडा देईल अशी कोपरखळी जानकरांनी हाणली.  ब्राह्मण Think tank, Money Tank, Plan Tank देतात म्हणून सगळीकडे राज्य करतात. आपण देणारे नाही तर मागणारे आहोत.  दिल्लीत आज सोनू भैय्या व छाबडाने पैसे दिले, त्यांचा आभारी आहे.

एज्युकेशन आरोग्याच्या बाबतीत केजरीवाल यांचे काम चांगले आहे, पार्टी कोणतीही असू द्या, पण ते चांगले काम करतात. मी त्यांचा साथीदार नाही, परंतु माझे चांगले मित्र आहेत. महाराष्ट्रात माझ्याकडे ते आले होते, आपण युती करूया म्हणून, मी बोललो दिल्लीत युती केली तर महाराष्ट्रात युती करू. तुमच्या अंगणात मला घ्यायला जमत नसेल तर माझ्या अंगनात तुम्हाला घ्यायला जमणार नाही.  दिल्लीत सोनू पाल, छाबडाना हिस्सा द्या. महाराष्ट्रात लगेच युती करू. कारण ते अग्रवाल आहेत, म्हणून ते पुढे गेले, मी पाल आहे म्हणून मागे राहिलो, अशी खंत जानकरांनी बोलून दाखवली. श्री. जानकर म्हणाले, ज्या दिवशी केजरवालांनी पार्टी बनवली त्या दिवशी बारा करोड रुपये अग्रवाल लोकांनी आरटीजीएस केले. आम्ही बोललो तर एक रुपयाही कोण देणार नाही, पण मी नाराज नाही. पण तुम्ही लोकच मला व्होट आणि नोट देणार आहेत, हा मला भरोसा आहे, कारण तुम्ही माझी परीक्षा घेत होतात.  समाज जादा विश्वास का ठेवत नाही, कारण समाजाच्या ठेकेदारांनी पहिला विश्वास तोडला आहे. समाजाला नाही तर मी स्वतःला दोषी ठरवून चालत आहे.  राष्ट्रीय समाज पक्षाला पुढे तुमची तन, मन बुद्धीची गरज आहे. एक रस्ता मोदी ने बनवलाय तो सिमेंट कॉंक्रिटचा आहे, सोनिया गांधींने एक रस्ता बनवला तो डांबरीकरणाचा आहे, माझा रस्ता कच्चा माती मुरमाटीचा आहे, या देशात पाल समाजाचे १८% मत आहे, पाल समाजाने पालला मत दिले असते तर ८० खासदार संसदेत जातील.  'कमी व्होट असलेले लोक देशावर राज्य करतात आणि ज्यांचे व्होट जास्त आहे ते भीक मागतात.' आता आरक्षण संपत आहे, खासगीकरण होत आहे. अहिल्याबाई होळकर जयंती बहाना है! समाज को जगाना आखिरी निशाना है! कोणावर टिका-टिपणी करून पुढे जाणार नाही कोणत्या राजकीय पक्षांना शिव्या देऊन पुढे जाणार नाही, आज भाजपसोबत युती असली तरी, उद्या कॉंग्रेससोबत युती होऊ शकते, असे जानकर यांनी स्पष्ट केले.  परंतु मोका आल्यावर धोका देऊ शकतो, त्यांनी धोका देण्याअगोदर मी देऊ शकतो, कारण राजकारण आहे. मी संन्याशी आहे परंतु धर्माच्या नावाने मंदिरात जाऊन घंटा वाजवणारा संन्याशी मी नाही. असे शेवटी जानकर म्हणाले. 

अहिल्याबाई होळकर यांचा राजकीय चेहरा लपवला : एस एल अक्किसागर

श्री. एस.एल.अक्कीसागर राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय समाज एम्प्लॉयज फेडरेशन (रासेफ) भाषानात म्हणाले, राजमाता अहिल्याबाई होळकर यांना आपण सर्व लोक राजमाता पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा धार्मिक चेहरा जाणता, तो सांगितला जातो. त्यानंतर सामाजिक चेहरा जाणता, तो सांगितला जातो. मात्र अहिल्याबाई होळकर यांचा राजकीय चेहरा जाणत नाही, तो लपवला गेला आहे. हे मी यासाठी सांगत आहे की महादेव जानकर यांच्या नेतृत्वात त्यांनी ही जी लढाई चालू केली आहे, जी खूप वर्षापासून सुरू केली आहे.  त्यावेळी त्यांनी एक लक्ष्य समोर ठेवून ही लढाई - संघर्ष चालू ठेवला. 'एक अकेला महादेव चल पडा जानकर अपनी मंजिल, लोग जुडते गाये कारवा बनता गया.' वो कारावा चला, चलते चलते यंहा दिल्ली मे इधर पहुचा. इथपर्यंतचा महादेव जानकर यांचा एक प्रवास आहे, तो आपणास जाणावा लागेल. तो प्रवास मी सांगणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचा जन्म २००३ साली झाला. आज एकोणीस वर्षे झाली. त्याअगोदर पक्ष नव्हता. यशवंत सेना होती, ही धनगर समाजाची सामाजिक प्रबोधन पर चळवळ होती. महाराजा यशवंतराव होळकर यांचा राजकीय आदर्श घेऊन महादेव जानकर चालत होते, चालत राहिले. सामाजिक काम करत होते. त्यांनी 2003 साली राष्ट्रीय समाज पक्षाला जन्म दिला. आज राष्ट्रीय समाज पक्षातर्फे दिल्लीत राजमाता अहिल्यादेवी जयंतीचा कार्यक्रम आहे. तुम्ही समाज माध्यमातून बघितले की, चौंडी येथे महाराष्ट्रात आज खूप मोठया प्रमाणात अहिल्याबाई होळकर जयंती साजरी होत आहे. त्याकाळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी साजरी ? केली जात होती. परंतु देशातील पहिली जयंती महादेव जानकर यांच्या नेतृत्वात यशवंत सेनेतर्फे साजरी केली, हे मी आपणास सांगत आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या हातात शिवलिंग पिंड बघितली, मात्र महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या हातात तलवार का नाही,  सिंहासनावर बसलेल्या का नाही याचा विचार महादेव जानकर यांनी केला, आणि तलवारधारी घोड्यावर स्वार अहिल्याबाईंची प्रतिमा महादेव जानकर यांनी निर्माण केली, प्रचारात आणली. आणि प्रसार ही केला. धार्मिक क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर भारतात सर्वश्रेष्ठ कोण असेल तर महाराणी अहिल्याबाई होळकर आहेत. दहा वीस वर्षांपूर्वी धनगरवाड्यात त्यांचे नाव घेतले जात होतं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आहेत, तसेच  हिंदू स्वराज्य संरक्षक अहिल्याबाई होळकर आहेत. परंतु अहिल्याबाई होळकर यांचे नाव जितके घेतले जाणे अपेक्षित होते तितके घेतले जात नव्हते. ते लपवले होते. हे असे कोणी आणि का केले, हा माझा सवाल आहे. भारत राष्ट्रपुरुष-महापुरुषांची खान आहे, परंतु काही महापुरुष - राष्ट्रपुरुष भारताला माहित नाही. मंदिर, मज्जीद, चर्च सोबत गुरुद्वारा अहिल्यादेवी होळकर यांनी बांधल्या परंतु केवळ तीर्थक्षेत्राची चर्चा आहे. चौंडी येथे जयंती साजरी होत आहे, ती देशभर होत आहे, सर्व समाज साजरी करत आहेत. याचा आनंद आहे. १९९५ ला पहिली जयंती अहिल्या जन्मभूमी चौंडी येथे सुरू केली. सुरुवातीला यशवंत सेना आणि २००३ पासून राष्ट्रीय समाज पक्षातर्फे चालू ठेवली. २०१६ साली चौंडी सोडून देशाच्या आर्थिक राजधानीत मुंबईत जयंती चालू केली. आता २०२२ साली दिल्लीत जयंती साजरी करत आहोत. आजची उपस्थिती कमी आहे. त्याला मी महत्व देत नाही. चोंडी येथे जेंव्हा पहिली जयंती सुरू केली, तेंव्हा देखील उपस्थिती कमीच होती. आज आम्ही दिल्लीत आहोत. आजची ही जयंती  हिस्टॉरिकल - ऐतिहासिक आहे, हे नमूद करताना मला खूप आनंद होत आहे. राष्ट्रीय समाज पक्ष केवळ राजकीय पक्ष नसून सामाजिक राजकीय पक्ष आहे,तरी त्याला साथ द्या. विशेषता सुशिक्षित बुद्धीजीवीं यांनी साथ द्यावी, असे अवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष मा एस. एल.अक्कीसागर यांनी यावेळी केले.

महादेव जानकर यांच्या उपस्थितीत रासपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सदन येथे महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. गाझियाबाद येथे रामलीला मैदानावर रॅली काढण्यात आली. घोड्यावर मिरवणूक काढण्यात आली. विविध प्रसार माध्यमांशी श्री. जानकर यांनी संवाद साधला. यावेळी मंचावर राष्ट्रीय महासचिव के. प्रसन्नाकुमार(केरळ), कुमार सुशील, दिल्ली प्रदेश अध्यक्ष सोनुभैय्या पाल, दिल्ली पोलिस अधिकारी श्री धर्मवीर बघेल, पंजाब व उत्तराखंड प्रभारी विनय छाबडा, श्री नरेश कुमार पाल, श्री सार्विन्द्र सिंह पाल, इतिहासकार श्री मधुसुधन  होळकर, श्रीमती नीरज पाल, डॉ  रमेश पाल, उत्तर प्रदेश अध्यक्ष श्री. चंद्र पाल,  उत्तर प्रदेश महासचिव श्री भूरेसिंह पाल, श्री रमेश वर्मा, श्रीमती सीमा त्यागी, श्रीमती भोजरानी पाल, डॉ. उमेश पाल, श्री. धर्मसिंह पाल आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमातील अन्य छायाचीत्रे व ठळक घडामोडी


































No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...