Thursday, June 16, 2022

आपचे सरकार करतय अहिल्यादेवी होळकर यांचा वारसा चालवण्याचे काम

अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवण्याचे काम आपचे सरकार करतय : सखाराम बोबडे पडेगावकर

राष्ट्रभारती द्वारा,  पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या काळात शिक्षण व आरोग्य या विषयावर सर्वात जास्त निधी खर्च व्हायचा. होळकरांच्या कार्याचा वारसा चालवण्याचे काम दिल्लीतील आम आदमी पार्टीचं सरकार करतंय असे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे नूतन जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकऱ यांनी केले. कोटबवाडी तालुका परभणी येथे मंगळवारी अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.

परभणी लोकसभा मतदारसंघातील नरसिंह पोखरणी जवळ असलेल्या कोटंबवाडी येथे मंगळवारी दुपारी अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर भाजपा नेते विठ्ठल रबदडे, नारायणराव धनवटे, भागवतराव बाजगिर, सुरेश बंडगर आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी विचार मांडले.

अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या कार्यकाळात समाजातील उपेक्षित घटकाला न्याय देण्याचं काम केलं. राज्यातील एकही व्यक्ती आजारी पडू नये, अन पडला तर त्याच्यावर तात्काळ उपचार झाले पाहिजेत, यासाठी पुढाकार घेतला. स्वतः राज्यातील महिला ही शिक्षित झाल्या पाहिजे यासाठी पुढाकार घेतला. अहिल्यादेवी होळकर यांच्या शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील कार्याचा वारसा दिल्ली येथील आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सरकार चालवत आहे. दिल्ली, पंजाब नंतर महाराष्ट्रातही आम आदमी पार्टी आगामी काळात लोकांमध्ये जनसेवेची संधी मागणार आहे. लोकसभेच्या उमेदवार म्हणून मागील पाच वर्षापासून लोकसभा मतदारसंघातील सोडवलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांचा उल्लेख श्री. पडेगावकर यांनी केला. 31 मे रोजी चौंडी येथे परभणी लोकसभा मतदार संघातील प्रत्येक आगारातून बस सोडण्यात आल्या होत्या. भारसावडा येथे विषारी वनस्पती खाऊन मृत्युमुखी पडलेल्या दीडशे मेंढ्यांच्या मालकांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासनही त्यांनी दिले.

मतदारांनी संधी दिल्यास आगामी काळात मतदार संघाचे प्रतिनिधित्व करायला आवडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमा नंतर महाप्रसाद चा लाभ उपस्थितांनी घेतला. त्यानंतर मिरवणूक झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोटांबवाडी येथील युवकांनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...