Thursday, June 23, 2022

वडोदरा येथे राष्ट्रीय समाज पक्षाची दिव्य यक्षु धर्मयात्रा

 वडोदरा येथे राष्ट्रीय समाज पक्षाची दिव्य यक्षु धर्मयात्रा

राष्ट्र भारती द्वारा, वडोदरा (गुजरात) : वडोदरा येथे राष्ट्रीय समाज पक्षाने दिव्य यक्षू धर्म यात्रा काढली आहे. या यात्रेचे नेतृत्व राष्ट्रीय समाज पक्षाचे वडोदरा शहराध्यक्ष प्रकाश पटेल करत आहेत.  गुजरात राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते श्री. गढवी यांनी प्रकाश पटेल यांचे अभिनंदन करून यक्ष धर्म यात्रेस शुभेच्छ्या दिल्या. राष्ट्रीय समाज पक्षाच्या यक्ष धर्म यात्रेत वडोदरा शहरातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.  धर्मयात्रेत रासपच्या श्वेता प्रजापती यांच्यासह रासप पदाधिकारी व कार्यकर्ते शुभारंभ प्रसंगी उपस्थित होते.  वडोदरा महानगर पालिकेत राष्ट्रीय समाज पक्षाचे ५ नगरसेवक जिंकले होते.  राष्ट्रीय समाज पक्ष पुन्हा एकदा गुजरात मध्ये आपला प्रभाव पाडत आहे. 



No comments:

Post a Comment

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी  मुंबई (७/१०/२५) : स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडण...