Thursday, June 2, 2022

नाशिकमध्ये पार पडला राजमाता पुण्यश्लोक आहिल्यदेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा

नाशिकमध्ये पार पडला राजमाता पुण्यश्लोक आहिल्यदेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा

राजमाता पुण्यश्लोक आहिल्यदेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक यांचे कार्यक्रमा प्रसंगी सामाजिक शैक्षणिक विशेष पुरस्कार राजमाता अहिल्यादेवी होळकर सन्मान पुरस्कारार्थी व सत्कारमुर्ती मा. नारायण इंगळे, मा.  चंन्द्रशेखर पाटील , होळकर शाहीचे सरदार वंशातील भाऊसाहेब राजोळे व्याख्याते मा. गणेश शिंदे,  यांचाही सत्कार करण्यात आला  उपस्थित मान्यवर मंत्री दादासाहेब भुसे, मा. शेफाली ताई भुजबळ , मा .नगरसेवक डिगंबर भाऊ मोगरे आंणि मा. समाधान भाऊ बागल यांचे हस्ते गंगा गोदावरी आरती करण्यात आली.

आहिल्याराम मंदिरातील आरती पुरोहित व साधु संत यांच्या हस्ते झाली. होळकर शाहीचे सरदार वंशातील भाऊसाहेब राजोळे यांचे हस्ते व मा. खंडेराव पाटील, मा. आण्णासाहेब सापनर, मा. साहेबराव बागल आणि मान्यवरांचे  उपस्थितित करण्यात आली. 

 कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. आमदार डॉ शोभाताई बच्छाव होत्या. व मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यसम्राट नगरसेविका मा. पुनमताई मोगरे यांचाही सत्कार करण्यात आला. स्थानिक विविध पक्षाचे नगरसेवक यांचाही सत्कार करण्यात आला महानगरपालिका नाशिक आणि सर्व जाती धर्माचे समाज बांधवांनी महाराष्ट्रातील कानाकोपरयातुन हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. ग्रामीण भागातील नाशिक शहरातील च नव्हे नव्हे महाराष्ट्रातुन मान्यवरांचे आगमन आपल्या नाशिक पुण्यनगरीत झाले.  राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा निमीत्ताने महिलांचा लक्षणीय सहभाग विविध वेषभुषा करुन आलेल्या महिला ढोल पथक, वारकरी भजनी मंडळ महिला पथक, बाल गोपाळ चित्ररथ अशा विविध पथकांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली गेली. अशाप्रकारे  त्याच बरोबर  न भूतो न भविष्यती असा प्रसंग डोळ्यांची पारणे फेडणारा आणि  होळकर शाहीच्या पराक्रमाची वैभव गाथा सांगणारा, जन्मोत्सव सोहळा झाला.  या जन्मोत्सव निमित्ताने होळकर शाहीचा व मराठयांचा गौरवशाली इतिहास  पुन्हां एकदा कुठेतरी जनमाणसाच्या मनात उर्जा निर्माण करुन गेला, कुठेतरी स्वभिमानाची ज्योत पेटवली गेली असे म्हणता येईल. सामान्य माणसाला व कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली असे म्हणता येईल आंणि  भगवा ध्वज घेऊन तरुण मित्रांना कार्यकर्त्यांना एक नविन दिशा मिळाली, नवचैतन्य मिळाले. कार्यकर्त्यांचे मन भरून गेले, मन भरून आले अशा स्वर्णमहोत्सवी होळकर शाहीचा भगवा ध्वज मानाने डौलत होता. आपल्या सर्वांचे साक्षीने राजमाता आहिल्यदेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा अतिशय उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला. भव्य दिव्य स्वरुपात साजरा झाला.

हा सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात मा. डिगंबर भाऊ मोगरे मा. दत्तुभाऊ बोडके  आंणि मा.  समाधन भाऊ बागल यांची मुख्य भूमिका होती व संयोजन समितीने पण खूप मेहनत घेतली आपले सर्वांचे मी समितीच्या वतीने  मनापासून जाहिर आभार व्यक्त करतो व सदर जन्मोत्सव यशस्वी करण्यासाठी त्याच बरोबर सर्व  जाती धर्माचे समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि ठरल्या प्रमाणे अपेक्षा पेक्षा मोठा जनसमुदाय आणि सर्वच क्षेत्रातले दिग्गज मान्यवरांनी उपस्थित राहून  कार्यक्रमाची शोभा वाढवली अशाप्रकारे ज्ञात आज्ञात समाज सेवकांची जर समिती कडुन काही कमी राहिली असेल तर मी समितीच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांनी आशीच साथ वेळोवेळी देत चला अशी मी  अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना सप्रेम जय मल्हार जय महाराष्ट्र .!

आपलाच :- आण्णासाहेब सापनर पाटील 













No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...