बांधकाम विभागाच्या आश्वासनामुळे रायगड रासपचे उपोषण मागे
राष्ट्र भारती द्वारा, माणगाव
राष्ट्रीय समाज पक्षाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख श्री. संतोष (तात्या) ढवळे यांनी कडापुर ते पळसगाव धनवी मार्गे जोर रा. जि. प ग्रामीण मार्ग १०७ या रस्त्याचे काम मार्गी लावावे यासाठी रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता. गेल्या दहा वर्षांत या रस्त्यावर मोठे अपघात झाले आहेत. वारंवार रस्ता दुरुस्तीची मागणी करूनही दखल घेत नसल्याने श्री. ढवळे यांनी शासन व प्रशासन विरोधात आमरण उपोषणाचा करण्याचा इशारा दिला होता. दिनांक १७ /०६/२०२२ रोजी रायगड जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग यांनी पत्रव्यवहार करून कडापुर ते जोर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे अंदाजपत्रक करून कार्यकारी अभियंता यांच्याकडे सादर केले आहे. सदरील कामास मान्यता व निधी प्राप्त झाल्यानंतर रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल. रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी रस्त्याच्या कडेला क्रॅश बारियार बॅरियर बसवण्यासाठी १० लाख रुपयांचे कामास मंजुरी घेऊन तत्काळ निविदा प्रक्रिया पूर्ण करून काम पूर्ण करण्यात येईल. असा पत्रव्यवहार श्री. ढवळे यांच्याशी केला आहे. त्यामुळे श्री. संतोष तात्या ढवळे यांनी दिनांक २०/०६/२०२२ रोजीचे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.
No comments:
Post a Comment