७५ वर्षात उपेक्षित ओबीसी समाजाला न्याय मिळू न देण्यासाठी भाजप, काँग्रेस कडून जातनिहाय जनगणनेस टाळाटाळ : महादेव जानकर
![]() |
ओबीसी हक्क परिषदेत बोलताना रासप नेते महादेव जानकर |
राष्ट्र भारती द्वारा, नांदेड : राष्ट्रीय समाज पक्ष वंचित, उपेक्षित राष्ट्रिय समाजाला न्याय मिळवून देण्यासाठीच काम करीत आहे. कांग्रेस भाजपा सारखे राजकीय पक्ष उपेक्षित ओबीसी समाजाला न्याय मिळवून न देण्यासाठीच ७५ वर्षात ओबीसींची जातीनिहाय जनगणना करणेस टाळित आहे. गरीब मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यास टाळाटाळ करित आहे, असे टीकास्त्र राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी नांदेड येथे बोलताना सोडले.
राष्ट्रिय समाज पक्ष आयोजित महाराणी अहिल्याई व राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त ओ.बी.सी हक्क परिषद मेळावा ११ जून २०२२ रोज शनिवारी , ठिक दुपारी १.०० वाजता विसावा पॅलेस शिवाजी नगर येथे पार पडला.
ओबीसी हक्क परिषदेत मार्गदर्शन करताना राष्ट्रिय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मंत्री आमदार महादेवजी जानकर म्हणाले , येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आमचा पक्ष स्वबळावर लढवणार असून, कार्यकर्त्यांनी गाव बुथ पातळीपर्यंत पक्षाची बांधणी करावी. आपला पक्ष वंचित, उपेक्षित राष्ट्रिय समाजाला न्याय मिळवून देण्यासाठीच काम करीत आहे. या देशात जनावरांची गणना होते, मात्र ओबीसींची गणना होत नाही, जातनीहाय जनगनना व्हावी, यासाठी रासप प्रयत्न करत आहे. काँग्रेस, भाजपा उपेक्षित ओबीसी समाजाला न्याय मिळू न देण्यासाठीच ७५ वर्षात ओबीसींची जातीनिहाय जनगणना करणे टाळित आहे. गरीब मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यास टाळाटाळ करित आहे. त्यासाठी सर्व जाती धर्मातील उपेक्षित समाजांनी राष्ट्रिय समाज पक्ष बळकट करण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाला राष्ट्रिय संघटक गोविंदराम शूरनर, मराठवाडा प्रमुख प्रा. विष्णू गोरे, मराठवाडा मार्गदर्शक प्रा.डॉ. बाबूराव श्रीरामे, लातूर जिल्हाध्यक्ष बोडके या़ची भाषण झाली. जिल्हाध्यक्ष प्रा. शिवाजी इंदूरे यांनी प्रस्तावना केली.
या कार्यक्रमात सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. तात्याराव डोके यांनी सुत्रसंचालन केले व राजेश्वर बुधेवार यांनी आभार मानले. महिलाध्यक्षा चंद्रभागाताई बंदखडके, मदनेश्वर शूरनर , नितिन सापनर, वैभव पांढरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment