गुलबर्गा कर्नाटक येथे महाराणी अहिल्याबाई होळकर जयंती साजरी
Thursday, June 30, 2022
Monday, June 27, 2022
धर्मसिंहसनाला आव्हान देणारा लोकराजा....
धर्मसिंहसनाला आव्हान देणारा लोकराजा....
धर्म आणि ईश्वर या दोन्ही संकल्पनांवर राजर्षी शाहू छत्रपतींचा विश्वास होता. परंतु हिंदू समाजाला वर्णजाती शृंखलांनी सर्वांगानी जखडून टाकून माणसाचे माणूसपण हिरावून घेणारी अमानुष धर्मसिंहासने त्याला मान्य नव्हती, त्यांच्यापुढे झुकणे त्याला कधीच पटले नाही म्हणून त्यानी ही धर्मसिंहासने उलथापालथी करून टाकली.
अस्पृश्यतेचा समूळ नायनाट करण्यासाठी या जुलमी आणि जीर्ण अशा संस्थेवर घणाघाती असा चौफर हल्ला या लोकराजाने चढविला, त्यासाठी त्यानी सर्वणांच्यापासून वेगळ्या असणाऱ्या अस्पृश्यांच्या शाळा बंद करून सर्वांना एकत्र शिक्षण देण्यास सुरुवात केली. प्राथमिक शिक्षण सर्वांना केवळ मोफत करून तो लोकराजा थांबला नाही, तर ते त्याने सर्वांना शिक्षण सक्तीचे केले. 'खालच्या वर्गाच्या लोकांच्या बुद्धीवर व ज्ञानावर हे जे जड व जुलमी जू लादले आहे ते झुगारून देण्याची शक्ती समाजाच्या अंगी येण्यात सक्तीच्या व मोफत प्राथमिक शिक्षणाची फार जरूरी आहे' या शब्दात शाहू छत्रपतींनी आपली प्राथमिक शिक्षणासंबंधी असणारी भूमिका १५ एप्रिल १९२० रोजी नाशिक येथील उदाजी मराठा विद्यार्थी वसतिगृहाच्या इमारतीच्या पायाभरणी समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना स्पष्ट केली होती. महारवतनाची चेठबिगारीची दृष्ट पद्धत कायद्याने बंद केली. माणूस जन्मतः गुन्हेगार नसतो, त्याला सुधारण्याची संधी दिलो तर त्या संधीचे सोने करण्याची किमया त्याच्या अंगी असते, यावर अपार विश्वास ठेवून त्याने महार-मांग समाजाची हजेरीची निर्दय पद्धत संपुष्टात आणली.
फासेपारधीसारख्या भटक्या आणि तथाकित गुन्हेगार म्हणून बदनाम झालेल्या जमातीला शाहू छत्रपतींनी पोटाशी धरून फासेपारध्यांच्या नेमणुका स्वतःच्या खासगी पहान्यावर प्रत्यक्ष राजवाड्यात करून त्यांच्यात आपणही इतरांच्यासारखी हाडामाणसांची माणसे आहोत हा दुर्दम्य आत्मविश्वास निर्माण केला.
केवळ जन्माने श्रेष्ठ मानल्या गेलेल्या समाजातील विशिष्ट लोकांना जे सुखसमृद्धीचे जीवन जगता येते, तेच जीवन मोठ्या प्रतिष्ठेने बहुजनांच्या वाट्याला यावे म्हणून आपल्या संस्थानातील नोकल्यांमध्ये ५० टक्के जागा मागासलेल्या सर्व जातींना राखून ठेवून एकोकडे समतेचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा हा राजा दुसरीकडे जातीच्या निकषावर नोकरीत प्रवेश दिल्यावर त्या व्यक्तीची पुढील प्रगती-बढ़ती ही तिच्या गुणवत्तेवर राहील, असाही कायदा अंमलात आणण्यास तो विसरला नव्हता!
- (प्रवीण शिंदे, संपादक नवराष्ट्र, सांगली आवृत्ती)
Saturday, June 25, 2022
Thursday, June 23, 2022
वडोदरा येथे राष्ट्रीय समाज पक्षाची दिव्य यक्षु धर्मयात्रा
वडोदरा येथे राष्ट्रीय समाज पक्षाची दिव्य यक्षु धर्मयात्रा
Monday, June 20, 2022
दिल्लीत राजा राहतो; आम्हाला राजा बनायचंय : महादेव जानकर
दिल्लीत राजा राहतो; आम्हाला राजा बनायचंय : महादेव जानकर
दिल्लीत अहिल्याबाई होळकर जयंती प्रसंगी बोलताना रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर |
राष्ट्र भारती द्वारा, दिल्ली- आबासो पुकळे : 'नकली सत्ता मुंबई, लखनऊ, बेंगलोर मध्ये आहे तर असली सत्ता दिल्लीत आहे'. दिल्लीत राजा राहतो तर मुंबई, लखनमध्ये सुभेदार राहतो. आम्हाला राजा बनायचे आहे म्हणून दिल्लीला आलोय असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. राष्ट्रीय समाज पक्ष नवी दिल्ली युनिट द्वारा दिनांक ३१ मे २०२२ रोजी महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या २९७ व्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन श्री सत्यसाई आंतराष्ट्रीय सभागृह लोधी रोड, दिल्ली येथे केले होते. यावेळी मार्गदर्शन करताना महादेव जानकर बोलत होते.
श्री.जानकर भाषणात म्हणाले, महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी काय केले, याबद्दल बरेच लोक बोलले. अहिल्याबाई होळकर यांचा फोटो, विचारधारा घेऊन पुढे कसे जायचे, हे आज मी सांगणार आहे. 'हिंदू'चा फायदा कोणाला जास्त झाला, याचा आम्हाला विचार केला पाहिजे? हिंदू तर आपण सगळे आहोत. माझी आई हिंदू आहे, मी हिंदू आहे, परंतु हिंदू नावाचा फायदा आजपर्यंत कोणी घेतला? मी ज्यावेळेस महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री झालो, त्यावेळी माझ्या समाजात एकही चीफ सेक्रेटरी नव्हता. त्यागी समाजाचाही नव्हता, मी बघितले ९०% कोणाचे बनले तर वेगळे आहे. आपण इतिहास वाचतो, लिहितो पण इतिहासाचा फायदा कोण घेत आहे? अहिल्याबाई होळकर यांची जयंती मला का करावी लागली.? आमचे डांगे साहेब, शेंडगे साहेब पुण्यतिथी करत होते. जयंती कोण करतही नव्हते. महाराणी अहिल्याबाईं होळकरांच्या जन्मगावात पार्टी का बनवावी लागली? आमची दखल घेत नव्हते, म्हणून आम्हाला अहिल्याबाईच्या जन्मगावात पार्टी बनवावी लागली. जिस समाज का दल नहीं है, उस समाज का बल नही ! ज्या दलात आपण काम करतो, ते दलही आमच्यासाठी काम करत नाही, चमचा बनून राहावे लागते. लीडर नाही लॅडर बनके रहते है! काँग्रेसचा चमचा, नाहीतर बीजेपीचा चमचा बनतात, परंतु मालक बनून राहत नाही. मी तुम्हाला मालक बनवण्यासाठी दिल्लीत आलोय, मी लग्न केले नाही, त्याग केला असे लोक बोलतात. मला हे का करावे लागले? मी स्वतःला दोषी मानतो. जोपर्यंत डेलिगेशन, डीओशन, डिटरमिनेशन सुत्राने काम करत नाही, तोपर्यंत यशस्वी होणार नाही. मला आठवते वीस वर्षांपूर्वी नोयडात डॉ.रमेश पालच्या घरी आलेलो, त्याच्या बायकोला अध्यक्ष केले होते, त्यावेळेस तो बोलत होता, समता पार्टी चांगली आहे. छगन भुजबळांची पार्टी. छगन भुजबळ हुशार माणूस आहे, चांगला माणूस आहे, परंतु छगन भुजबळांचे नेतृत्व करणारे शरद पवार वेगळे आहेत. त्यांनी माझे ऐकले नाही, उत्तर प्रदेशात तर खूप लोकांनी पार्टी बनवली, मी त्यावेळी प्रवेश केला तर लोक बोलले असते जानकर आडवे येतात, खोडा घालतात. म्हणून मी युपीत आलो नाही. कर्नाटक, गुजरात केरळ, महाराष्ट्रवर भर दिला. माझा फोटो लावून आमदार, जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष, सभापती निवडून आलेत. फक्त खासदार नाही, संसद सदस्य जिंकल्यावर माझे राजकीय वर्तुळ पूर्ण होईल. जोपर्यंत तुम्ही तुमचे दल मजबूत करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कोणाच्या तरी मागे फिरत राहावे लागेल. बीजेपी, काँग्रेसमधून मंत्री झाला तरी त्यांचा चमच्या बनून राहावे लागणार. रासपातून बनला तर मालक बनून राहणार, मला माहित आहे रस्ता खूप आडवातिडवा आहे. मात्र एक दिवस जिंकू. मी वीस वर्षापूर्वी बोलत होतो, मी पंतप्रधान प्रधानमंत्री बनणार लोक, मला लोक वेडा बोलायचे. साधा नगरसेवक नाही, मोठी भाषा कशाला करताय? महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात राज्यात रासपचा झेंडा घेऊन नगरसेवक जिंकलेत. त्यामध्ये ब्राह्मण, मुस्लिम, ख्रिश्चन, ठाकूर, कायस्त, दलीत, आदिवासी, ओबीसी आहेत. सर्व राष्ट्रीय समाज आहे. बुद्धिजीवी वर्ग माझ्यावर विश्वास ठेवत नव्हते, म्हणायचे बीएसपी, काँग्रेस, समाजवादी, बीजेपीचे काम करा. मी भाजपचा युतीतला भागीदार आहे, परंतु भाजप चांगला पक्ष नाही, तर आमची दुश्मन पार्टी आहे, हे सांगण्यासाठी मी दिल्लीत आलोय. मोदी मोठा माणूस आहे, परंतु भाजप माझा पक्ष नाही. मी मंत्री होतो, तेव्हा मी पार्टीचा राजीनामा दिला, पार्टीचा मालक एस.एल.अक्कीसागर यांना केले. मी एमएलसी बनलो, त्यावेळी त्यांची सही त्या ए.बी.फॉर्मवर होती, माझी नव्हती.
अहिल्याबाई होळकर यांनी अनेक मंदिरे बांधली हे सर्वांना माहीत आहे, पण चर्च बांधले, मस्जिद बांधले, गुरुद्वार बांधले, हे का लपवले. हे कोण करतय? इतिहास लिहणारे कोण होते? मला दहा-बारा भाषा बोलता येतात. इतिहासाच्या ठेकेदारांनो, अहिल्याबाई होळकरांनी मस्जिद, चर्च, गुरुद्वारा बांधले, हे का लीहले नाही.? हे सर्व अभ्यासण्यासाठी ब्रिटिश लायब्ररी चा सदस्य व्हावे लागले, तेव्हा मला कळले, मंदिरासोबत अहिल्याबाई होळकरांनी मस्जिद बांधली. आमच्या समोर काय आले अहिल्याबाई केवळ हिंदू ची देवता आहे, सर्वजन कल्याणकारी महाराणी का समोर आली नाही, कारण आमच्या जवळ इतिहासकार नव्हते.
श्री. जानकर पुढे म्हणाले, मी बुद्धिजिवी नाही, परंतु चांगला संघटक आहे, इंजिनीअरिंगचा विद्यार्थी आहे, तुमची पुस्तक अभ्यासून प्रात्यक्षिक प्रॅक्टिकल कसे करायचे ते करून मी पुढे जाणार आहे, नोकरी, घर, कपडा कोणीही देईल परंतु राजपाट कोणी देणार नाही, राज राजपाट घ्यायचा असेल तर तो स्वबळावर घ्या, हे गुरु गोविंद सिंगांनी सांगितलय, हे मानून दिवसातून तीन वेळा विचार करून चालतो. उत्तर प्रदेशात सरकार मोफत राशन देत आहे, आम्हाला राशन नाही पाहिजे, आम्हाला शासन "आमचं शासन" पाहिजे. आम्हाला भीक नको, राशन भिका आ. आम्हाला उल्लू बनवू नका,पंगू बनवू नका. आमची क्षमता सामर्थ्य विकसित केल पाहिजे, भारतात तीन लाख लोकांना कॅडर करत आहोत, संसदेत बहुमताने प्रधानमंत्री बनवण्यासाठी २७६ खासदार आले पाहिजेत, आम्हाला सत्ता पाहिजे, सत्ता नसेल तर तुम्हाला कोणी विचारणार नाही, महाराणी अहिल्याबाई शासक होत्या, म्हणून अहिल्याबाईंची आज आपण त्यांची जयंती करतोय. शिकलेले लोक बोलतात, राजकारण घाणेरडे आहे, पोलीस मध्ये आमचा समाज जादा आहे, आपल्याला सरपंच नको तर खासदार बनायचंय, पोलीस नको कमिशनर पाहिजे, क्लार्क नको कलेक्टर बनायचे आहे. आम्ही राहुल गांधी, नड्ड, अखिलेश, मायावती जवळ तीन करोड रुपये देऊन प्रस्थापित पक्षांनी उमेदवारी मागतो, तरीही ते तिकीट देत नाहीत. कोणी म्हटले रासपकडे जावा तर म्हणतात त्यांना सोडा. आम्ही एनडीए मध्ये होतो. २८ पार्टी एनडीएमध्ये होतो. आम्ही सांगू इच्छितो, ज्यावेळी त्यांना कोण मानत नव्हते, त्यावेळी छोट्या पक्षांना त्यांनी पुढे आणले. वरती गेल्यावर छोट्या पक्षांना संपविण्याचा प्रयत्न केला, छोट्या पक्षांना संपविण्याचा कट भाजपने रचला. महाराष्ट्रात भाजप सोबत रासप नसेल तर भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही. आम्ही असेल तर तुम्ही असाल. आम्ही नसेल तर तुम्हीही सत्तेत राहणार नाही. कारण माझा रस्ता एसपी सिंग बघेल, राजाराम पाल सारखा नाही. महादेव जानकरचा स्वतःचा रस्ता आहे, अशा शब्दात भाजप नेतृत्वाला श्री. जानकर यांनी फटकरले.
श्री. जानकर पुढे म्हणाले, आमच्या समाजात खूप मोठे नेते आहेत, पण त्यांना यातले काही समजणार नाही. राष्ट्रीय समाज पक्षाचे शेकडो उमेदवार उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या मैदानात होते, जिंकलो नसले तरी शिवसेना-राष्ट्रवादी पेक्षा रासपने मते जादा मिळवली. कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेशमध्ये रासपची पाळेमुळे रुजत आहेत. माझे दिल्लीवर जास्त प्रेम आहे, असली सत्ता दिल्लीत आहे, नकली सत्ता मुंबई लखनऊ बेंगलोर मध्ये आहे. दिल्लीत राजा राहतो. मुंबईला सुभेदार राहतो. आम्हाला सुभेदार बनायचे नाहीतर राजा बनवायचा आहे, म्हणून दिल्लीला आलोय. आज तीनशे लोक आहेत, पण तीनशेचे ३ करोड करून दाखवणार असा विश्वास श्री. जानकर यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, मी घरी जात नाही, लग्न नाही, कार्यकर्त्यांच्या घरी राहणारा देशातला एकमेव नेता महादेव जानकर आहे, प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी राहतो. मी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत नाही, माझ्यावर वरवरचे प्रेम नको तर मनापासून प्रेम करा. आरएसएसच्या अगोदर पाल महासभा स्थापन झाली, परंतु पलमहासभेने एकही नगरसेवक जिंकला नाही. लग्न लावण्याशिवाय पाल महासभेचे काम नाही. १९११ ला आर एस एस बनली. आतापर्यंत त्यांनी प्रधानमंत्री, राष्ट्रपती पर्यंत सर्वकाही बनवले. मी पुढच्यावेळेस रासपातुन खासदार बनुन येतोय, मला कोणाची गरज भासणार नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मला मोदी, गडकरी व ज्यांनी मुलगा मानले ते गोपीनाथ मुंडे साहेब म्हणत होते, जानकरसाहेब कमळ चिन्ह घ्या. मी म्हणालो, पराभव झाला तरी चालेल, पण कमळावर लढणार नाही, शरद पवारांच्या कन्येविरोधात लढत होतो. ६९००० हजार मतांनी पडलो, मी धनगर समाजाला विचारले, माझी चूक काय आहे? ते म्हणाले, जानकर साहेब दीड लाखाच्या वर जाणार नाहीत, पवार साहेब जायंट किलर आहेत व ते जिंकतील. ज्यावेळेस मी सातव्या फेरीपर्यंत आघाडी घेतली, तेव्हा धनगरांना वाटायला लागले आपण चूक केली. आपण जानकर साहेबांना मत द्यायला पाहिजे होते.
उपस्थितांचे डोळे उघडताना जानकर म्हणाले, मोदी, राहुल गांधी, अहिल्याबाई होळकरांची जयंती करत असते? तर मला इथे यावं लागलं नसतं. १७ मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना पत्र लिहून पाठवले; अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त त्यांच्या नावाने 'मन की बात'मध्ये युवकांचे कल्याण, रोजगार शिक्षणासाठी बजेट पेश करा. मोदींनी साध ट्वीट केले नाही, इतरवेळी मोदी चांगल्या बाता करतात, अशा शब्दांत जानकरांनी तोफ डागली. आमचे सगळे बुद्धिजीवी लोक बोलतात, मोदी इज ग्रेट. मोदीने जयंतीला ट्विट केलं नाही. अशा शब्दात समाजबांधवांना कानपिचक्या दिल्या. ते पुढे म्हणाले, जिस बाप का बेटा लायक होता है, उस बापकी इज्जत होती है, जिस बाप का बेटा नालायक होता है, उस बापकी बेइज्जत होती है, अहिल्याबाई आपल्या बाप होत्या. इतर वेळी मोदी अच्छी बाते करतात, त्यांना अहिल्याबाई होळकर जयंतीची आठवण आली नाही, आपण लायक नव्हतो, शिवीगाळ करून पाय खेचून समाजाचा विकास होणार नाही.
रासपतर्फे राजस्थान, कर्नाटक उत्तर प्रदेशात अहिल्याबाई होळकर जयंती साजरी झाली. परवानगीसाठी पलमहासभेचे लोक गेले तर , परवानगी मिळाली नाही. परंतु रासपचे नरेश वाल्मिकी परवानगीसाठी गेले तर एसपीने सल्यूट करत बाजूला बसवुन लगेच परवानगी दिली. कारण राजकीय पार्टीत ताकद असते, याचा विचार केला पाहिजे. आम्ही बार-बार सांगतो पण शिकले, सवरलेले लोक ऐकत नाहीत. साहेब चांगले आहेत, पण राजकारण नको, अडाणी लोकांनी राजकारण केले नाही ठीक आहे, पण तुम्ही सुशिक्षित आहात. इतर समाजांनी ब्राह्मण समाजाकडून शिकले पाहिजे. ब्राम्हण समाज डेलिगेशन, डिओशन आणि डीटरमिणेशनने काम करतात. दोन हजार ब्राह्मणांनी ठरवले, देशाची लोकसभा जिंकायची. लग्न केले नाही तर संपत्ती आरएसएसला देतील. रासपला पाल देणार नाहीत पण छाबडा देईल अशी कोपरखळी जानकरांनी हाणली. ब्राह्मण Think tank, Money Tank, Plan Tank देतात म्हणून सगळीकडे राज्य करतात. आपण देणारे नाही तर मागणारे आहोत. दिल्लीत आज सोनू भैय्या व छाबडाने पैसे दिले, त्यांचा आभारी आहे.
एज्युकेशन आरोग्याच्या बाबतीत केजरीवाल यांचे काम चांगले आहे, पार्टी कोणतीही असू द्या, पण ते चांगले काम करतात. मी त्यांचा साथीदार नाही, परंतु माझे चांगले मित्र आहेत. महाराष्ट्रात माझ्याकडे ते आले होते, आपण युती करूया म्हणून, मी बोललो दिल्लीत युती केली तर महाराष्ट्रात युती करू. तुमच्या अंगणात मला घ्यायला जमत नसेल तर माझ्या अंगनात तुम्हाला घ्यायला जमणार नाही. दिल्लीत सोनू पाल, छाबडाना हिस्सा द्या. महाराष्ट्रात लगेच युती करू. कारण ते अग्रवाल आहेत, म्हणून ते पुढे गेले, मी पाल आहे म्हणून मागे राहिलो, अशी खंत जानकरांनी बोलून दाखवली. श्री. जानकर म्हणाले, ज्या दिवशी केजरवालांनी पार्टी बनवली त्या दिवशी बारा करोड रुपये अग्रवाल लोकांनी आरटीजीएस केले. आम्ही बोललो तर एक रुपयाही कोण देणार नाही, पण मी नाराज नाही. पण तुम्ही लोकच मला व्होट आणि नोट देणार आहेत, हा मला भरोसा आहे, कारण तुम्ही माझी परीक्षा घेत होतात. समाज जादा विश्वास का ठेवत नाही, कारण समाजाच्या ठेकेदारांनी पहिला विश्वास तोडला आहे. समाजाला नाही तर मी स्वतःला दोषी ठरवून चालत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाला पुढे तुमची तन, मन बुद्धीची गरज आहे. एक रस्ता मोदी ने बनवलाय तो सिमेंट कॉंक्रिटचा आहे, सोनिया गांधींने एक रस्ता बनवला तो डांबरीकरणाचा आहे, माझा रस्ता कच्चा माती मुरमाटीचा आहे, या देशात पाल समाजाचे १८% मत आहे, पाल समाजाने पालला मत दिले असते तर ८० खासदार संसदेत जातील. 'कमी व्होट असलेले लोक देशावर राज्य करतात आणि ज्यांचे व्होट जास्त आहे ते भीक मागतात.' आता आरक्षण संपत आहे, खासगीकरण होत आहे. अहिल्याबाई होळकर जयंती बहाना है! समाज को जगाना आखिरी निशाना है! कोणावर टिका-टिपणी करून पुढे जाणार नाही कोणत्या राजकीय पक्षांना शिव्या देऊन पुढे जाणार नाही, आज भाजपसोबत युती असली तरी, उद्या कॉंग्रेससोबत युती होऊ शकते, असे जानकर यांनी स्पष्ट केले. परंतु मोका आल्यावर धोका देऊ शकतो, त्यांनी धोका देण्याअगोदर मी देऊ शकतो, कारण राजकारण आहे. मी संन्याशी आहे परंतु धर्माच्या नावाने मंदिरात जाऊन घंटा वाजवणारा संन्याशी मी नाही. असे शेवटी जानकर म्हणाले.
Sunday, June 19, 2022
ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी संसदेवर मोर्चा काढणार : महादेव जानकर
ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी संसदेवर मोर्चा काढणार- आ.महादेव जानकर
सोलापुरात राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता मेळावा
कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर व मंचावर काशिनाथ शेवते, ज्ञानेश्वर सलगर, पंकज देवकते, अजित पाटील व अन्य |
राष्ट्र भारती द्वारा, सोलापूर : राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री आ.महादेव जानकर महाराष्ट्र विधानमंडळाच्या पंचायत राज समितीच्या तीन दिवसांच्या सोलापूर जिल्ह्याच्या शासकीय दौ-यावर आले होते. दरम्यान रासप पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात बोलत असताना ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी संसदेवर रासपच्या वतीने मोर्चा काढणार असल्याचे प्रतिपादन आ. महादेव जानकर यांनी केले.
राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने शुक्रवार दिनांक १७ जून रोजी दुपारी ३ वा. शांतीसागर मंगल कार्यालय सोलापूर येथे सोलापूर शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष आ.महादेव जानकर होते तसेच प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते , मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, प. महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने, उपाध्यक्ष सुनिल बंडगर, युवक अध्यक्ष अजित पाटील, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष पंकज देवकते या प्रमुख पदाधिका-यांनीही या कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
श्री. जानकर म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्ष हा नेतृत्व घडवणारा पक्ष असून, आम्ही महात्मा फुलेंच्या विचारधारेवर काम करीत आहे. विचारधारेपासून कधीच दूर गेलेलो नाही. राजकारणात केलेली तडजोड वेगळी आणि विचारधारा वेगळी असते. आपली विचारधारा आणि भूमिका कार्यकर्त्यानी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. तसेच जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरा असा आदेश दिला.
ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा घोळ कायमचा मिटवण्यासाठीओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, ही राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी असून येणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात संसदेवर देशातील सर्व कार्यकर्ते आणि ओबीसी समाज घेऊन महामोर्चा काढणार आहे. ओबीसी जो या देशाचा खरा मालक आहे, तोच गलितगात्र आणि मागतकरी झाला आहे. त्यामुळे त्याला मुख्य प्रवाहात आणून, या देशाचा सत्ताधीश बनवणे हा राष्ट्रीय समाज पक्षाचा मुख्य अजेंडा आहे. यासाठी या राज्यातील तसेच देशातील ओबीसी समाजाने राष्ट्रीय समाज पक्षाच्या विचाराला भक्कमपणे साथ द्यावी असे अवाहन जानकर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी पक्षाचे जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुका अध्यक्ष तसेच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा अध्यक्ष रणजित सूळ, जिल्हा संपर्क प्रमुख श्रीमंत हक्के, शहरप्रमुख सतीश बुजरूके यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. संजय वलेकर यांनी केले.
Saturday, June 18, 2022
मेंढर राखणाऱ्याच पोर : हेंमंत बिरा मुढे ला दहावीत शे. ९१.८० % गुण
मेंढर राखणाऱ्याच पोर : हेंमंत बिरा मुढे ला दहावीत शे. ९१.८० % गुण
आईबाप मेंढराकडे पर मुलखात जगायला गेलेले. घरी भाऊ -भाऊ दोघेच. शेंडगेवाडी ते कामत पाच-सहा किलोमीटरचा प्रवास सायकल वर तांगड्या तोडत करायचा. रस्ता खराब असल्याने, सायकल पंक्चर. पुन्हा माळावरची दगड तुडवत कामत मध्ये ती दुरुस्त करायची. मग शाळेमध्ये जायचं, शाळा सुटली की पुन्हा कामत ते शेंडगेवाडी रस्ता धरायचा आणि घराकडे निघायचं. घरी यायला दोन तास अन जायला दोन तास असे दिवसातले चार तास प्रवासातच जायचे आणि उरलेली शाळा करायची. भाऊ अंकुश मुढे एका फाटक्या चळवळीचे नेटका कार्यकर्ता. आपल्या भावाला वेळोवेळी त्याचा मार्गदर्शन लाभले. परिस्थिती हालाखीची, परंतु शिकण्याची उमेद खूप मोठी, गरिबीवर मात करून यशाला गवसणी घालनाऱ्यामध्ये शेंडगेवाडीतलं पोरगं चांगल्या मार्काने पास झाले. मेंढर राखणाऱ्याच पोर : हेंमंत बिरा मुढे ला दहावीत शे. ९१.८० % गुण मिळाल्याने त्याच्यावर कौतुकाचा आणि अभिंनदनचा वर्षाव होत आहे.
नाव - हेमंत बिरा मूढे
टक्के 91.80%
अभिनंदन 💐💐
विक्की राठौड़ साउथ गुजरात सचिव पद पर मनोनीत
विक्की राठौड़ साउथ गुजरात सचिव पद पर मनोनीत
राष्ट्र भारती द्वारा, सुरत गुजरात
कल दि. १७/०६/२०२२ राष्ट्रीय समाज पार्टी गुजरात प्रभारी सुशील शर्मा के आदेशानुसार युवा अध्यक्ष गुजरात प्रदेश महेंद्र राठौड़ के द्वारा विक्की राठौड़ को सूरत शहर साउथ गुजरात सचिव पद पर मनोनीत किया गया इस अवसर पर उपस्थित राजू परमार, प्रकाश राठौड़, किशोर भाटी, वीरेंद्र चौधरी, प्रकाश परमार ने खुशी जाहिर की और उज्जवल भविष्य की बधाई एवं शुभकामनाएं दी
रस्त्याचे काम मार्गी लावण्याचे बांधकाम विभागाचे आश्वासन, रायगड रासपचे उपोषण मागे
बांधकाम विभागाच्या आश्वासनामुळे रायगड रासपचे उपोषण मागे
राष्ट्र भारती द्वारा, माणगाव
राष्ट्रीय समाज पक्षाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख श्री. संतोष (तात्या) ढवळे यांनी कडापुर ते पळसगाव धनवी मार्गे जोर रा. जि. प ग्रामीण मार्ग १०७ या रस्त्याचे काम मार्गी लावावे यासाठी रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता. गेल्या दहा वर्षांत या रस्त्यावर मोठे अपघात झाले आहेत. वारंवार रस्ता दुरुस्तीची मागणी करूनही दखल घेत नसल्याने श्री. ढवळे यांनी शासन व प्रशासन विरोधात आमरण उपोषणाचा करण्याचा इशारा दिला होता. दिनांक १७ /०६/२०२२ रोजी रायगड जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग यांनी पत्रव्यवहार करून कडापुर ते जोर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे अंदाजपत्रक करून कार्यकारी अभियंता यांच्याकडे सादर केले आहे. सदरील कामास मान्यता व निधी प्राप्त झाल्यानंतर रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल. रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी रस्त्याच्या कडेला क्रॅश बारियार बॅरियर बसवण्यासाठी १० लाख रुपयांचे कामास मंजुरी घेऊन तत्काळ निविदा प्रक्रिया पूर्ण करून काम पूर्ण करण्यात येईल. असा पत्रव्यवहार श्री. ढवळे यांच्याशी केला आहे. त्यामुळे श्री. संतोष तात्या ढवळे यांनी दिनांक २०/०६/२०२२ रोजीचे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.
Friday, June 17, 2022
रासप मेहसाणा जिल्हा कार्यकारणी गठित
रासप मेहसाणा (गुजरात) जिल्हा कार्यकारणी गठित
राष्ट्रीय समाज पक्ष गुजरात जिल्हा कार्यकारणी गठित केल्याचे गुजरात प्रभारी सुशील शर्मा यांनी प्रसिध्दी माध्यमाद्वारे कळवले आहे.
राष्ट्रीय समाज पक्ष मेहसाणा जिल्हाध्यक्षपदी
जगदीशभाई पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रकाश पटेल वडोदरा शहर अध्यक्ष पद पर मनोनित
रासप तर्फे विजयपुरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
रासप तर्फे विजयपुरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने विजयपुर (कर्नाटक) येथे पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांची २९७ वी जयंती साजरी करण्यात आली, अशी कर्नाटक राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष धर्मन्ना तोंटापुर यांनी दिली. यावेळी बहुसंख्य कार्यकर्ते कार्यक्रमात सहभागी झाले होते.
ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸಮಾಜ ಪಕ್ಷದ ವತಿಯಿಂದ ರಾಜಮಾತಾ ಆಹಿಲ್ಯಾದೇವಿ ಹೋಳಕರ ಅವರ 297 ನೆ ಜಯಂತಿ ಅಂಗವಾಗಿ ನಡೆದ .ನಮ್ಮ ನಡೆ ಗುಲಾಮಗಿರಿಯಿಂದ ಅಧಿಕಾರ ದ ಕಡೆ ವಿಚಾರ ಸಂಕೀರ್ಣ ,ಬಬಲೆಶ್ವರ ಹಾಗೂ ತಿಕೋಟ ತಾಲೂಕಿನ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಪದ ಗ್ರಹಣ ಸಮಾರಂಭ ಹಾಗೂ SSLC ಯಲ್ಲಿ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಅಂಕ ಪಡೆದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಸನ್ಮಾಯಿಸಲಾಯಿತು ..... ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಶಸ್ವಯಿಗೆ ಶ್ರಮಿಸಿದ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು
प्रकाश परमार सूरत शहर युवा अध्यक्ष पद पर मनोनीत
प्रकाश परमार सूरत शहर युवा अध्यक्ष पद पर मनोनीत
आज राष्ट्रीय समाज पार्टी गुजरात प्रभारी सुशील शर्मा के आदेशानुसार युवा अध्यक्ष गुजरात प्रदेश महेंद्र राठौड़ के द्वारा घांची प्रकाश परमार को सूरत शहर युवा अध्यक्ष पद पर मनोनीत किया गया | इस अवसर पर उपस्थित विक्की राठौड़, राजू परमार, प्रकाश राठौड़, किशोर भाटी, वीरेंद्र चौधरी ने खुशी जाहिर की और उज्जवल भविष्य की बधाई एवं शुभकामनाएं दी |
Thursday, June 16, 2022
काश्मीरमधील मेंढपाळाचे जीवन
काश्मीरमधील मेंढपाळाचे जीवन
त्यांची जीवनशैली साधी आहे आणि त्यांची कार्यसंस्कृती एका पैलूवर अडकलेली आहे, ती म्हणजे त्यांची गुरेढोरे आणि आधुनिक जगाच्या गुंतागुंतीची त्यांना पर्वा नाही.
| लेखक मीर बासित
समकालीन जगामध्ये वेगवान जीवनशैली वसलेली आहे, जिथे प्रत्येकजण व्यस्त आणि घाईघाईने त्यांच्या योजनांमध्ये व्यस्त आहे आणि अस्वस्थ जीवन ही एक सामान्य बाब आहे. विरुद्ध जीवनाची कल्पना करणे ही एक साधी गोष्ट वाटते परंतु या गर्दीच्या आणि स्पर्धात्मकतेच्या निराशेमुळे, थांबलेले आणि या गोंगाटमय जगापासून दूर असलेले जीवन अजूनही अस्तित्वात आहे. त्यांची जीवनशैली साधी आहे आणि त्यांची कार्यसंस्कृती एका पैलूला चिकटलेली आहे, ती म्हणजे त्यांची गुरेढोरे आणि आधुनिक जगाच्या गुंतागुंतीची त्यांना पर्वा नाही, ते काश्मीरचे मेंढपाळ (चोपं) आहेत.
काश्मीरमधील मेंढपाळ (चोपन) त्यांचे मोसमी स्थलांतर करतात, ते हिमालयात वसलेल्या कुरणात, गुरांच्या कळपासह (मेंढ्या, शेळ्या आणि घोडे) त्यांचे दुसरे घर म्हणून काम करतात. नाजूक हवामानाचा कडकपणा सहन करून, उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून ते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह कनेक्टिव्हिटी, (रस्ते आणि दळणवळण) आधुनिक जगापासून दूर असलेल्या जंगली कुरणांमध्ये जातात. काठावरचे जीवन असे आहे की कोणीही कधीही आकांक्षा बाळगणार नाही. हा एक प्रवास आहे जो वसंत ऋतूपासून, उन्हाळ्यापर्यंत आणि शरद ऋतूच्या शेवटपर्यंत चालू असतो.
खोऱ्यातील जवळपास प्रत्येक गावात राहणार्या शेतकर्यांच्या गुरांची सुरक्षा सुनिश्चित करणे हे त्यांचे काम आहे, ज्यासाठी त्यांना नंतर मोबदला दिला जातो. ते उंच उंच पर्वतीय खिंडी आणि हिमालयाच्या विविध रांगा पार करतात. हंगामी स्थलांतर तात्पुरती संरचना आणि निवारा यावर बरेच अवलंबून असते. उन्हाळ्याच्या महिन्यांत, ते साधारणपणे बनवलेल्या दगड, लाकूड आणि मातीच्या झोपड्यांमध्ये राहतात ज्यांना सामान्यतः 'कूठा' म्हणतात आणि हवामान कितीही गंभीर असले तरीही ते टिकून राहतात. भटके जीवन जगणारे, निसर्गाच्या अगदी जवळ असणारे, हे मेंढपाळ विविध प्रकारच्या नैसर्गिक औषधी वनस्पती आणि औषधी वनस्पतींबद्दल पुरेसे जाणकार आहेत, जे फक्त त्या कुरणात आणि डोंगर दऱ्यांमध्ये आढळतात. दिवसभर मोकळ्या आकाशात भिजत राहणे, आपल्या गुरांवर लक्ष ठेवणे हीच त्यांची काळजी असते. कुत्रे, त्यांच्या मालकीचे, त्यांचे विश्वासू सैनिक जंगली श्वापदांपासून रात्रंदिवस त्यांच्या गुरांचे रक्षण करतात आणि कोणत्याही परकीय धोक्यापासून त्यांना आधीच सावध करतात. तात्काळ धोका ओळखण्याची त्यांची क्षमता त्यांना विश्वासार्ह बनवते आणि मेंढपाळांना आराम देते.
नुकतेच मी एका ट्रेकसाठी गेलो होतो तिथे मला एक मेंढपाळ भेटला ज्याच्या एका हातात सामान्य मेंढपाळाची काठी होती तर दुसर्या हातात हुक्का (धूम्रपानाचा पाइप) धरून, कोथळ्याबाहेर घोंगडी घालून धुराचे लोट मंद वाऱ्यात विणत होते. त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या उमटल्या, खास दुपारच्या चाय आणि स्वादिष्ट मक्की की रूटीने आमचे स्वागत केले. त्यांच्या जीवनशैलीबद्दल आणि विविध आव्हानांबद्दल उत्साही, शांतपणे आणि लक्षपूर्वक मी त्यांचा या दुर्गम कुरणांमध्ये राहण्याचा त्यांचा अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न केला, निसर्गाच्या अगदी जवळ, जे त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन आहे, जरी ते जास्त धोका आणि असुरक्षिततेसह आहे.
तो आपला अनुभव शेअर करत असताना बुलंद पर्वतराजी आणि खडतर भूप्रदेशांचे ज्ञान आणि परिचय रोमांचक आणि मंत्रमुग्ध करणारा होता. हे स्पष्ट होते की हिमालयातील खडतर भूप्रदेशांनी त्यांना लवचिक आणि मजबूत बनवले आहे, कारण जंगलात राहणे हा प्रत्येकाचा चहा नाही. त्यांचा साधा आणि डाउन टू अर्थ निसर्ग निर्जन दरींच्या सौंदर्यासारखा दिसतो, सर्वत्र प्रतिध्वनित होतो.
आव्हाने
या मेंढपाळांवर आणि त्यांच्या गुरेढोरे यांच्यावरील असुरक्षितता आणि धोका दुर्लक्षित करता येणार नाही. त्यांच्या डोक्यात पशुधनाचा धोका कायमच असतो, वन्य प्राण्यांपासून किंवा मानवी चोरीपासून आणि ते टाळण्यासाठी त्यांना आपला जीव धोक्यात घालावा लागतो आणि सप्टेंबरमध्ये ते त्यांच्या घरी परत येईपर्यंत जीवन-मरणाची ही लढाई सतत चालू असते. त्यांना त्यांच्या छावण्यांच्या बाहेर आग लावून, किंवा खडक आणि घनदाट जंगले उजळवून किंवा प्रत्येक कोपऱ्याभोवती सतत शिट्ट्या वाजवून त्यांना अंधारलेल्या रात्रीही त्यांच्या गुरांचे रक्षण करावे लागते. काही जण सर्वशक्तिमान देवाच्या नावाचा उच्चार करताना ऐकू येतात. या कुरणातील हवामान नक्कीच कोणाचे मित्र नाही. ढगांचा गडगडाट, ढगफुटी आणि गारपिटीमुळे त्यांच्या दुःखात आणि काळजीत भर पडते.
त्यांच्यासमोर आणखी एक दुर्दैवी बाब म्हणजे काही संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव, ज्यामुळे त्यांच्या त्रासात भर पडते, काही वेळा लसीकरणाबाबत त्यांची आरडाओरड सुरूच राहते आणि त्यांच्या पशुधनाच्या मृत्यूच्या रूपाने त्यांचे मोठे नुकसान होते, तर काही वेळा विभागाला जाग येते. काही कार्यकर्त्यांनी वाजवलेल्या शिट्ट्या त्यामुळे त्यांचे मोठ्या नुकसानापासून बचाव होते.
शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील त्यांची गंभीर चिंता हा वादाचा मुद्दा आहे, कारण त्यांना असे वाटते की ते दर्जेदार शिक्षणापासून वंचित आहेत ज्यामुळे त्यांच्या मुलांना एकदाच शिक्षण सोडण्यास भाग पाडले जाते, जरी त्यांच्या शिक्षणासाठी काही प्रयत्न केले गेले परंतु ते भरीव नाहीत. ज्या गोष्टीचा मी आतुरतेने शोध घेत होतो आणि ऐकण्याची वाट पाहत होतो ती म्हणजे त्यांचा निसर्गाबद्दलचा आदर आणि काळजी आणि नाजूकपणा/अधोगती इकोसिस्टमबद्दल. त्यांना सतत मानवी वस्ती आणि लोकांनी टाकलेल्या कचरा/कचऱ्याची काळजी वाटते. त्यांचे असे मत आहे की हिमनदीची कमी होत जाणारी पातळी आणि कमी हिमवर्षाव या चिंतेचा विषय आहे आणि हा मूर्त बदल भविष्यासाठी चिंताजनक आहे.
आदिम काळी ते चारा, तांदूळ किंवा तेल यांसारखे काहीही गोळा करत असत, त्या बदल्यात दिल्या जाणाऱ्या सेवांच्या बदल्यात, परंतु शेतजमीन कमी झाल्यामुळे, या चरण्याच्या कालावधीसाठी ते आता प्रति मेंढी 500 ते 600 आकारतात. काही लोक, बहुतेक तरुण पिढीने, त्यांचा पारंपारिक व्यवसाय सोडला आहे आणि बांधकाम साइटवर किंवा इतर ठिकाणी दिवसा मजूर म्हणून काम करत आहेत.
मेंढपाळांच्या मते वंशपरंपरागत नोकरी, जी त्यांच्या उत्पन्नाचे एकमेव साधन आहे, त्यांना समाधान तर देतेच पण त्याचवेळी त्यांना काळजी वाटते कारण त्यांच्या पुढच्या पिढीने त्यांच्या पावलावर पाऊल टाकावे असे त्यांना वाटत नाही. या दुर्गम डोंगरात आपण कमावतो तेव्हा त्यांचा विश्वास असतो पण ते जास्त जोखमीवर आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चावर येते, हे निश्चितच कधीही भरून न येणारे नुकसान आहे.
लेखक : मिर बासित
लेखक मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये एम टेक आहेत आणि त्यांच्याशी mirbasit.mech@gmail.com वर संपर्क साधता येईल)
विमुक्त भटक्या जमाती कार्यालयाचे उद्घाटन
विमुक्त भटक्या जमाती कार्यालयाचे उद्घाटन; भटक्या विमुक्तांच्या हक्कासाठी आणि समस्यांसाठी कार्यालय कार्यरत असेल : खा. विकास महात्मे
राष्ट्र भारती द्वारा, विमुक्त भटक्या जमाती, विदर्भ कार्यालयाचे उदघाटन झाले. हे कार्यालय महात्मे हॉस्पिटल, छत्रपती चौक, रिंग रोड, येथे आहे. संपूर्ण भटका विमुक्त समुदाय - मग तो कुठल्याही जाती जमातीचा असेल - त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी आणि त्यांच्या समस्यांसाठी हे कार्यालय कार्यरत असेल, असे उदगार खा. विकास महात्मे यांनी काढले.
कार्यालय उद्घानप्रसंगी श्री प्रमोद काळबांडे, श्री मिलिंद आडेवार, श्री किशोर सायधन, सौ अर्चना भालसागर , शौ सीमा कश्यप, सौ दीपमाला पाल, श्री मनोहर राठोड, प्रदीप बिबटे, सौ अर्चना कोट्टेवार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
नागपुर मे कल घुमंतु (भटके-विमुक्त) समुदाय के लिए विदर्भ कार्यालय का उदघाटन किया गया जो कि महात्मे हॉस्पिटल, छत्रपती चौक, रिंग रोड यहा पर स्थित है।सारा घुमंतु समुदाय - चाहे वह किसी भी जाति या जमाती का हो, उनके हक तथा समस्याओंके लिए राज्यसभा सांसद पद्मश्री डॉ.विकास महात्मे के मार्गदर्शन मे यह कार्यालय कार्यरत होगा।
इस अवसर पर श्री प्रमोद काळबांडे, श्री मिलिंद आडेवार, श्री किशोर सायधन, सौ अर्चना भालसागर , शौ सीमा कश्यप, सौ दीपमाला पाल, श्री मनोहर राठोड, प्रदीप बिबटे, सौ अर्चना कोट्टेवार आदि
आपचे सरकार करतय अहिल्यादेवी होळकर यांचा वारसा चालवण्याचे काम
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवण्याचे काम आपचे सरकार करतय : सखाराम बोबडे पडेगावकर
राष्ट्रभारती द्वारा, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या काळात शिक्षण व आरोग्य या विषयावर सर्वात जास्त निधी खर्च व्हायचा. होळकरांच्या कार्याचा वारसा चालवण्याचे काम दिल्लीतील आम आदमी पार्टीचं सरकार करतंय असे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे नूतन जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकऱ यांनी केले. कोटबवाडी तालुका परभणी येथे मंगळवारी अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.
परभणी लोकसभा मतदारसंघातील नरसिंह पोखरणी जवळ असलेल्या कोटंबवाडी येथे मंगळवारी दुपारी अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर भाजपा नेते विठ्ठल रबदडे, नारायणराव धनवटे, भागवतराव बाजगिर, सुरेश बंडगर आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी विचार मांडले.
अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या कार्यकाळात समाजातील उपेक्षित घटकाला न्याय देण्याचं काम केलं. राज्यातील एकही व्यक्ती आजारी पडू नये, अन पडला तर त्याच्यावर तात्काळ उपचार झाले पाहिजेत, यासाठी पुढाकार घेतला. स्वतः राज्यातील महिला ही शिक्षित झाल्या पाहिजे यासाठी पुढाकार घेतला. अहिल्यादेवी होळकर यांच्या शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील कार्याचा वारसा दिल्ली येथील आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सरकार चालवत आहे. दिल्ली, पंजाब नंतर महाराष्ट्रातही आम आदमी पार्टी आगामी काळात लोकांमध्ये जनसेवेची संधी मागणार आहे. लोकसभेच्या उमेदवार म्हणून मागील पाच वर्षापासून लोकसभा मतदारसंघातील सोडवलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांचा उल्लेख श्री. पडेगावकर यांनी केला. 31 मे रोजी चौंडी येथे परभणी लोकसभा मतदार संघातील प्रत्येक आगारातून बस सोडण्यात आल्या होत्या. भारसावडा येथे विषारी वनस्पती खाऊन मृत्युमुखी पडलेल्या दीडशे मेंढ्यांच्या मालकांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासनही त्यांनी दिले.
मतदारांनी संधी दिल्यास आगामी काळात मतदार संघाचे प्रतिनिधित्व करायला आवडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमा नंतर महाप्रसाद चा लाभ उपस्थितांनी घेतला. त्यानंतर मिरवणूक झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोटांबवाडी येथील युवकांनी प्रयत्न केले.
Tuesday, June 14, 2022
राज्य मागास आयोगास रासपचे कोकण प्रदेश शिष्टमंडळ भेटले
राज्य मागास आयोगास रासपचे कोकण प्रदेश शिष्टमंडळ भेटले
बेलापूर : दिनांक २५ /०५/२०२२ रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे कोकण विभाग शिष्टमंडळच्यावतीने विभागीय आयुक्त कार्यालय कोकण विभाग बेलापूर येथे मा. श्री जयंतकुमार बांठिया अध्यक्ष - मागास प्रवर्ग आयोग यांना, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरीकांच्या मागास प्रवर्गाला आरक्षण देण्याबाबत समर्थनपर निवेदन देण्यात आले. यावेळी रासप कोकण प्रदेश सदस्य भगवानजी ढेबे साहेब, कोकण प्रदेश अध्यक्ष श्रीकांतदादा भोईर, रायगड जिल्हा अध्यक्ष संपतरावजी ढेबे, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संतोष ढवळे-धनवीकर, रायगड जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा मनिषाताई ठाकुर, मावळ लोकसभा अध्यक्षा बळीरामदादा ऐनकर, पनवेल तालुका अध्यक्ष मुकेशभाई भगत, नवी मुंबई रासप नेते महादेव अर्जुन, उरण विधानसभा अध्यक्ष दीपक पाटील, मुरुड शहर अध्यक्ष शकील कुरेशी, रत्नागिरी जिल्हा रासप नेते अशोक पवार, सुरेश पड्याळ, पंकज नरवणकर, सिंधुदुर्ग जिल्हा रासप नेते राजेंद्र माने, आदींसह उपस्थित होते.
७५ वर्षात उपेक्षित ओबीसी समाजाला न्याय मिळू न देण्यासाठी भाजप, काँग्रेस कडून जातनिहाय जनगणनेस टाळाटाळ : महादेव जानकर
७५ वर्षात उपेक्षित ओबीसी समाजाला न्याय मिळू न देण्यासाठी भाजप, काँग्रेस कडून जातनिहाय जनगणनेस टाळाटाळ : महादेव जानकर
ओबीसी हक्क परिषदेत बोलताना रासप नेते महादेव जानकर |
राष्ट्र भारती द्वारा, नांदेड : राष्ट्रीय समाज पक्ष वंचित, उपेक्षित राष्ट्रिय समाजाला न्याय मिळवून देण्यासाठीच काम करीत आहे. कांग्रेस भाजपा सारखे राजकीय पक्ष उपेक्षित ओबीसी समाजाला न्याय मिळवून न देण्यासाठीच ७५ वर्षात ओबीसींची जातीनिहाय जनगणना करणेस टाळित आहे. गरीब मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यास टाळाटाळ करित आहे, असे टीकास्त्र राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी नांदेड येथे बोलताना सोडले.
राष्ट्रिय समाज पक्ष आयोजित महाराणी अहिल्याई व राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त ओ.बी.सी हक्क परिषद मेळावा ११ जून २०२२ रोज शनिवारी , ठिक दुपारी १.०० वाजता विसावा पॅलेस शिवाजी नगर येथे पार पडला.
ओबीसी हक्क परिषदेत मार्गदर्शन करताना राष्ट्रिय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मंत्री आमदार महादेवजी जानकर म्हणाले , येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आमचा पक्ष स्वबळावर लढवणार असून, कार्यकर्त्यांनी गाव बुथ पातळीपर्यंत पक्षाची बांधणी करावी. आपला पक्ष वंचित, उपेक्षित राष्ट्रिय समाजाला न्याय मिळवून देण्यासाठीच काम करीत आहे. या देशात जनावरांची गणना होते, मात्र ओबीसींची गणना होत नाही, जातनीहाय जनगनना व्हावी, यासाठी रासप प्रयत्न करत आहे. काँग्रेस, भाजपा उपेक्षित ओबीसी समाजाला न्याय मिळू न देण्यासाठीच ७५ वर्षात ओबीसींची जातीनिहाय जनगणना करणे टाळित आहे. गरीब मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यास टाळाटाळ करित आहे. त्यासाठी सर्व जाती धर्मातील उपेक्षित समाजांनी राष्ट्रिय समाज पक्ष बळकट करण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाला राष्ट्रिय संघटक गोविंदराम शूरनर, मराठवाडा प्रमुख प्रा. विष्णू गोरे, मराठवाडा मार्गदर्शक प्रा.डॉ. बाबूराव श्रीरामे, लातूर जिल्हाध्यक्ष बोडके या़ची भाषण झाली. जिल्हाध्यक्ष प्रा. शिवाजी इंदूरे यांनी प्रस्तावना केली.
या कार्यक्रमात सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. तात्याराव डोके यांनी सुत्रसंचालन केले व राजेश्वर बुधेवार यांनी आभार मानले. महिलाध्यक्षा चंद्रभागाताई बंदखडके, मदनेश्वर शूरनर , नितिन सापनर, वैभव पांढरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
उरण येथे महाराणी अहिल्याबाई होळकर जयंती निम्मित अभिवादन
उरण येथे महाराणी अहिल्याबाई होळकर जयंती निम्मित अभिवादन
उरण जिल्हा रायगड येथे पुण्यशलोक, महाराणी अहिल्याबाई होळकर जयंती निम्मित अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा नेते अजित पाटील, महाराष्ट्र विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष शरद दडस, उरण तालुका धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नांदेड जिल्हा राष्ट्रीय समाज पक्ष आढावा बैठक पार
नांदेड जिल्ह्यची राष्ट्रिय समाज पक्षाची आढावा बैठक पार
नांदेड ( प्रतिनिधी):- शनिवारी विसावा पॅलेस नांदेड येथे राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक मराठवाडा प्रमुख प्रा विष्णू गोरे यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आली. या बैठकीला प्रमुख पाहुणे राष्ट्रिय संघटक गोविंदराम शूरनर , मराठवाडा मार्गदर्शक डॉ बाबूराव श्रीरामे, लातूर जिल्हाध्यक्ष बोडके यांची उपस्थिती होती.
आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना गोविंदराम शूरनर म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका पक्षाने स्वबळावर लढवण्याचे ठरविले आहे, त्यासाठी कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण, नगरपालिका, महानगरपालिका यांचे वार्ड बांधनी करावी व प्रत्येक बुथवर कार्यकरणी करावी असे प्रतिपादन केले.अध्यक्षिय भाषणात विष्णू गोरे म्हणाले, जिल्हाध्यक्षानी जिल्ह्यात पक्षाचे सर्व आघाड्याची बांधनी करून बुथ पर्यंत लवकरात लवकर पोहचावे आणि निवडणुकीत सर्व जागेवर उमेदवार उभे करणयाची तयारी करावी असे म्हणाले .
या बैठकित पुढील प्रमाणे नियुक्त्या देण्यात आले.
नांदेड जिल्हाध्यक्ष प्रा.शिवाजीराव इंदूरे यांनी कार्यकर्त्यांना पुढील जबाबदारी सोपवली. महिला जिल्हाध्यक्षापदी अॅड.चंद्रभागाताई बंदखडके, महिला उपाध्यक्षपदी सौ.भाग्यश्री सुभाषराव हाके, जिल्हा संपर्कपदी श्री.राजेश्वर बुद्धेवार, लोकसभा अध्यक्ष श्री.तात्याराव डोके सर, कंधार तालुकाध्यक्षपदी श्री.संजयकुमार विठ्ठलराव जायेभाये,लोहा तालुका अध्यक्ष श्री.सुभाष सखाराम केंद्रे, जिल्हा उपाध्यक्ष श्री.रावसाहेब दगडोबा गीते, देगलूर तालुका अध्यक्ष श्री अॅड.योगेश मंत्री, अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष देगलूर तालुका मा.श्री.मणियार अहेमदभाई, देगलूर तालुका युवाध्यक्षपदी श्री.प्रकाश दत्ता भालेराव, देगलूर शहर अध्यक्षपदी श्री.मलिकार्जुन कडलवार, लोहा तालुका उपाध्यक्ष राम महाराज वडेपुरीकर, बिलोली तालुकाध्यक्ष श्री मोहन मुदनकर व इतर रासप कार्यकर्ते याना नियुक्ती देण्यात आले.
या आढावा बैठकिला जिल्हाती सर्व तालुका कार्यकर्ते उपस्थित होते. अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव इंदुरे यांनी दिली.
--------------------------------
चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर
चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...
-
काँगेस आणि भाजपची मस्ती जिरवू : महादेव जानकरांचा सोलापूर मध्ये इशारा सोलापूर (११/१/२५) : मठाच्या आड कोणी आल्यास जश्यास तसे उत्तर देण्याचा इ...
-
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणीस सुरूवात रासपचे ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई पदाधिकारी नियुक्त मुंब...
-
RSP દ્વારા રાષ્ટ્રવીર સંગોલી રાયન્નાની રાજ્યાભિષેક વર્ષગાંઠની ઉજવણીની સફળતાપૂર્વક તૈયારી 26મીએ સંગોલી રાયન્ના સમાધિ સ્થાને મહાદેવ જાનકર સહિ...