Friday, July 31, 2020

कवी बाबासाहेब कोकरे यांच्या कविता भविष्यकाळात मोठा पल्ला गाठतील - संगीता धायगुडे ( महानगरपालिका आयुक्त )

कवी बाबासाहेब कोकरे यांच्या कविता भविष्यकाळात मोठा पल्ला गाठतील : संगीता धायगुडे, महानगरपालिका आयुक्त 


श्री.बाबासाहेब कोकरे यांच्या कविता, गीते ही मनाचा वेध घेणारी आणि विचार करायला प्रवृत्त करणारी अशी आहेत. त्यांच्या कवितेतून सामाजिक भान आणि ग्रामीण भागातील चित्रण तसेच चालीरीती यांचा उल्लेख वारंवार आढळतो. त्याचे कारण त्यांचे स्वतःचे बालपण आणि जडणघडण त्याच मातीतून झाली आहे. त्या मातीशी इमान राखत श्री. बाबासाहेब कोकरे शेतकऱ्यांच्या कष्टाचा आढावा घेतात तर कधी ' देव देव करण्यात' अशा कवितेमधून अंधश्रद्धेवर प्रहार करतात. 'जगाला सांभाळणारा' या कवितेत शेतकऱ्याच्या श्रमाचं आणि त्याच्या अस्तित्वाचं महत्त्व ते विषद करतात आणि  'काळीज फत्तराचे ' या कवितेतून धान्य पिकवणाऱ्या कुणब्याचं महत्त्व पटवून देतात तेव्हा ते वाचकाला अंतर्मुख होऊन महात्मा गांधीच्या  'खेड्याकडे चला'  या हाकेची आठवण करून देतात. अशा या श्री. बाबासाहेब कोकरे यांच्या कविता भविष्यकाळात मोठा पल्ला गाठतील असा विश्वास वाटतो. त्यांच्या भविष्यासाठी अनेक शुभेच्छा !                                     'कवयित्री - संगीता धायगुडे  ( महानगरपालिका आयुक्त) 

2 comments:

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...