Wednesday, July 1, 2020

शिक्षक नव्हे पालक : श्री. एन. टी. पाटील सर

विद्यार्थ्यांशी नाळ जोडलेला शिक्षक नव्हे पालक : श्री. एन. टी. पाटील सर
@Abaso Pukale सन- २०२० च्या सुरवात म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात हवेतील थंडी संपून मार्च महिन्यात उन्हाळ्याची चाहूल लागते न लागते तोच  'कोरोना' या महामारीच्या साथीने भारतासह जग भीतीच्या छायेत आले. एप्रिल, मे महिन्याचा काळ टाळेबंदीत लोटला. चैत्र, वैशाखाचे ऊन्ह संपवून पावसाळ्याचे अर्थात नवीन शैक्षणिक वर्षाचे दिवस सुरु आहेत. पण महामारीच्या साथीने विद्यार्थी- पालक संभ्रमात आहेत. शाळा कधी चालू होणार ?  हा  प्रश्न प्रत्येकाच्या मनात घोळत असतानाच आज दि. ३० जून २०२० रोजी 'सांगरूळ शिक्षण संस्था' संचलित 'न्यू इंग्लिश स्कूल कोगे' तालुका करवीर या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. एन. टी. पाटील सर शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त होत आहेत. म्हणून थोडेसे श्री. पाटील सरांविषयी....

'जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्याशी देत जावे' !
'शहाणे करून सोडावे सकळ जन'!!
या समर्थ रामदास स्वामी यांच्या काव्य पंक्तीप्रमाणे सरांनी खऱ्या अर्थाने शिक्षकी पेशात राहून ज्ञानदान केले. परंतु सरांनी विद्यार्थ्यांशी केवळ शिक्षकाचे नाते न ठेवता पालकाप्रमाणे हरएक विद्यार्थ्यांशी आपुलकीची नाळ जोडणाचा प्रयत्न केलेला आहे.

सरांनी 'न्यू इंग्लिश स्कूल' पोर्ले तर्फ ठाणे तालुका पन्हाळा येथे २ वर्षे सेवा, 'सांगरूळ शिक्षण संस्थे'मध्ये सलग ३३ वर्षे सेवा, असे जवळपास तीन तप ज्ञानदानाचे कार्य अंखडपणे केले.

सरांचे आज अनेक विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकी, शिक्षण, व्यापार व प्रशासन अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. विद्यार्थ्यांना शाबासकीची थाप पाठीवर मारून प्रोत्साहन देणारे शिक्षकाचे नाव आहे श्री एन. टी. पाटील सर. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशाप्रकारचे सरांचे जीवन आहे. कोणत्याही प्रसिद्धीचा, पुरस्काराचा हव्यास नाही. आदर्श शिक्षकांचे गुणसमुचय असणारे सर्वांग सुंदर व्यक्तिमत्व म्हणजे श्री. एन. टी. पाटील सर होय. पालक, समाज यांच्याशी अनुबंध सरांनी जपलेला आहे. एकत्र कुटुंबपद्धतीचा प्रभाव सरांच्या वर आहे. म्हणूनच सर्वांना बरोबर घेऊन आज सरांचा जीवन प्रवास चालू आहे.

 सर एक उत्तम प्रशासक आहेत. अतिशय सेवाभावी वृत्तीने काम, आपल्या कामावर निष्ठा, अध्यापनाची आवड, शाळेत नियमित वेळेवर हजर राहणे, अतिमहत्त्वाच्या प्रसंगीच रजा घेणे, वेळेच्या बाहेर जाऊन काम, सहकाऱ्यांशी मिळून मिसळून वागणे, सर्वांच्या मनाचा आदर राखणे, शांत व संयमी स्वभाव अशी सरांचे अनेक भाव वैशिष्ट्य आहेत. पुढील आयुष्यात सरांना उत्तम आरोग्य मिळो, उर्वरीत त्यांच्या इच्छा,आकांशा पूर्ण होवो अशी सद्गुरू चरणी प्रार्थना करतो..!

आपला : अमर शिंदे , शिंदेवाडी ता- पन्हाळा जि- कोल्हापूर.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...