प्रधानमंत्री 'नरेंद्र मोदी'वर महाराणी अहिल्याबाई होळकर जयंती वरून 'कुमार सुशील' यांचा निशाणा
म्हसवड / आबासो पुकळे
दि. ३१ मे रोजी देशभरात महाराणी अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात येते. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रार्दूभाव असल्याने देशभरात लॉकडाऊन होता. त्यामुळे देशात कोठेही अहिल्याबाई होळकर जयंतीचा मोठा कार्यक्रम झाला नाही. प्रधानमंत्री यांच्या 'मन कि बात' कार्यक्रमात अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करावे, याबद्दल रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना पत्र व्यवहार केला होता. परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अहिल्याबाई होळकर यांचा 'मन कि बात' कार्यक्रमात साधा उल्लेखही केला नाही. उलटपक्षी सोशल मीडिया वरून 'महाराणी अहिल्याबाई होळकर' यांना साधी आदरांजलीही वाहिली नाही. यावरून रासपचे राष्ट्रीय महासचिव 'कुमार सुशील' यांनी समाज माध्यमांत प्रधानमंत्री 'नरेंद्र मोदी' यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. कुमार सुशील यांनी लिहलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "अशा प्रधानमंत्रीचे नाव सांगा, कि जो सर्वांच्या जयंतीला आदरांजली वाहतो, परंतु अहिल्यादेवी होळकर यांची जयंतीची आठवण राहत नाही." 'कुमार सुशील' यांच्या पोस्टवर वाचकांनी प्रतिक्रिया देताना 'नरेंद्र मोदी' यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.
'कुमार सुशील' यांच्याशी भ्रमणध्वनिवरून संवाद साधला. श्री. सुशील म्हणाले, अहिल्याबाई होळकर आमच्या आई आहेत. इंदौर, महेश्वर येथे अहिल्याबाईचे राज्य असताना राज्याबाहेर काशी, रामेश्वर, सोमनाथ, नाशिक, केदारनाथ येथे मंदिर बांधले. आदर्श राज्यकर्त्या अहिल्याबाई होळकर यांच्या 'विदेश नीती'चे जगभर कौतुक केले जाते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना कर्नाटकातील 'शेफर्ड केरे कामेगौडा' यांचे नाव आठवते, मात्र ज्यांचे कर्तृत्व मोठे आहे अशा आदर्श राज्यकर्त्या अहिल्याबाई होळकर यांचे नाव घेता येत नाही. पूर्वीच्या लोकांनी आमचा इतिहास चुकीचा मांडला तर आता आमचा इतिहास संपविण्याचे प्रयत्न चालू आहेत. मी असा एक प्रश्न केला आहे की, सर्वांचे जयंतीला नाव घेतो, मात्र अहिल्याबाईंचे नाव घेत नाही असा प्रधानमंत्री कोण आहे? लोकांनी मोदीजींचे नाव घेतले आहे. यातले खरे- खोटे काय हे पत्रकारांनी, लोकांनी ठरवावे.
No comments:
Post a Comment