कवी बाबासाहेब कोकरे यांना शब्दांची देणगी आहे - प्रा. दादाराम साळुंखे
दुष्काळाच्या झळा सोसत सोसत त्यातून शब्दांचे हिरवेगार मळे फुलविणारे बाबासाहेब कोकरे यांना शब्दांची देणगी आहे. त्यांच्या कवितेतून चौफेर विषय आले आहेत. अनेक अंगांना स्पर्श करता करता त्यांनी श्रोत्यांच्या आणि वाचकांच्या अंतःकरणात हात घातला आहे. समाज आणि समाजातील दुःखं, दारिद्र्य, अज्ञान यांनी पिचलेली माणसे यांच्यात या कविता आशावाद निर्माण करतात. शेतकरी असून ही पाण्याअभावी मेंढराच्या मागे फिरता फिरता जगाचा अनुभव घेणारा कवी. प्रत्येक कवितेतून डोकावताना दिसतो. दुष्काळ आहे म्हणून तो निराश नाही. तो म्हणतो -
'सामना करतो दुष्काळाशी '
बोलणं दमदार पण ठळक आहे.'
कणखर, कष्टाळू माणदेशी माणूस ' हीच आमची ओळख आहे.'
सगळ्या कविता कवीच्या हृदयात दुःख असले तरी कवी नर्मविनोदी शैलीत मांडतांना दिसतो. हसता हसता श्रोत्यांना त्यांचे फटके मनावर आघात करून विचार करण्यास भाग पाडतात. कवितेच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला माणदेशी माणूस मोडून पडणारा नव्हे तर उभा राहणारा सर्वांना जोडणारा आहे. हे दाखवून देण्यासाठी ' शब्दांचे फटकारे' घेऊन निघाला आहे. एक दिवस हेच फटकारे सर्वांना संस्कार देणारे ठरणार आहेत.
-प्रा. दादाराम साळुंखे
(प्रेरणादायी वक्ते आणि लेखक)
nice 👌
ReplyDeleteसुंदर!
ReplyDeleteकोकरे सर आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
ReplyDeleteकोकरे सर आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
ReplyDeleteVery nice keep it up
ReplyDeleteVery nice babasahebji keep it up
ReplyDeleteNice keep it up u have bright future in life. Kokare saheb
ReplyDeleteखुप छान
ReplyDeleteखुप छान
ReplyDeletekokre hardik Abhinandan.pudil waatchalis hardik subhechya.ur.Ashok jondhale' parbhani
ReplyDeleteNice👌👌👌
ReplyDelete