Wednesday, July 1, 2020

अखिल भारतीय खुल्या ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत एस.एन.डी.टी महिला विद्यापीठतील विद्यार्थिनीचे यश


 @Abaso Pukale
अखिल भारतीय खुल्या ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत एस.एन.डी.टी महिला विद्यापीठतील विद्यार्थिनीचे यश

दिल्लीच्या श्री शितला माता शक्तीपीठ ट्रस्ट ने आयोजित केलेल्या अखिल भारतीय खुली ऑनलाईन मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत मुंबईच्या खुशनाझ  दादरेवाला हिने २१ वर्षांखालील मुलींच्या गटात द्वितीय क्रमांक पटकावला. 

खुशनाझ हि मुंबईच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एस. एन. डी. टी.) महिला विद्यापीठाची विद्यार्थिनी असून ती आंतरराष्ट्रीय फिडे मानांकित बुद्धिबळपटू आहे.

खुशनाझने जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील  विविध बुद्धिबळ स्पर्धांमध्ये भाग घेतला असून ती पारितोषिकांची मानकरीही ठरली आहे. 

सदर  बुद्धिबळ स्पर्धा www.lichess.org या संकेतस्थळावर खेळविण्यात आलेली होती. भारताच्या विविध भागातून ८५ महिला बुद्धिबळ खेळाडूंनी यात भाग घेतला होता. 

लखनऊच्या किर्ती मिश्रा हिने २१ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. 

द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरलेली खुशनाझ दादरेवाला हि मुंबईची एकमात्र बक्षीस विजेती होती.

एस.एन.डी.टी महिला विद्यापीठतर्फे विविध स्पर्धेत भाग घेण्यासाठी सतत प्रोत्साहन दिले जाते असे शारिरीक शिक्षण विभागाच्या संचलिका डॉ.श्रध्दा नाईक ह्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...