दि. ३ जुलै २०२० रोजी पुकळेवाडी ता- माण येथे महाराष्ट्रीयन बेंदूर सण साजरा करण्यात आला. पारंपरिक पद्धतीने शेतकरी बांधवांनी हा सण साजरा केला. बैलाची खांदे मळणी, पुरण पोळीचा नैवद्य, मंदिर प्रदिक्षणा आदी पार पडले. परिसरातील विविध गावात आज बेंदूर साजरा होत आहे. मात्र आषाढी एकादशी नंतर त्रयोदशी दिवशी परंपरेने बेंदूर सण साजरा करण्याची रूढ समाजमान्य आहे, त्यामुळे दिनदर्शिकेनुसार बेंदूर साजरा न करता, परंपरेने चालत आलेल्या रूढी नुसार पुकळेवाडी येथे काल बेंदूर साजरा केला.
व्हिडिओ साठी पुकळेवाडी बेंदूर येथे क्लिक करा
No comments:
Post a Comment