कु. विजया गवळी ह्या विद्यार्थिनीने आदिवासी बांधवांना एकत्र करुन सुमारे विविध प्रकारच्या 30 प्रजतींचे केले वृक्षारोपण
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या पोचाडे गावातील एस.एन.डी.टी महिला विद्यापीठच्या समाजकार्य विभागात शिकत असलेल्या कु. विजया गवळी ह्या विद्यार्थिनीने तिच्या गावातील आदिवासी बांधवांना एकत्र करुन सुमारे विविध प्रकारच्या 30 प्रजतींचे वृक्षारोपण करून एक वस्ती पातळीवर कार्य करण्यचा वस्तुपाठ घालुन दिला आहे.
सध्या लॉकडाउन च्या काळात समाजकार्य अभ्यास्क्रमात समुदाय संघटन ह्या विषयातून वस्ती पातळीवर कसे कार्य करायचे हे विजया गवळी शिकली होती परंतु तिच्यातील सामजिक कार्यकर्ता तिला स्वस्थ बसू देत नव्हता आणि ह्या सामजिक उपक्रमाला मूर्त स्वरूप देण्याचा निर्णय घेतला. ह्या सामजिक उपक्रमात क्षेत्रकार्य पर्यवेक्षक श्री. रत्नाकर खैरे ह्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.
समाजकार्य अभ्यास क्रमाचे वैशिष्ट म्हणजे समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी तसेच संवेदनशील विषयांवर अभ्यास करुन उपाय योजना करणे आणि विभागा तर्फे विद्यर्थिनिंना सतत प्रोत्साहन दिले जाते असे विभागप्रमुख प्रा. डॉ. आशा पाटील यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment