Saturday, August 1, 2020

पुकळेवाडीत बाजरी, मका पिके वादळी वाऱ्यासह भुईसपाट

पुकळेवाडीत बाजरी, मका पिके भुईसपाट

दि.१ ऑगस्ट २०२०, पुकळेवाडी.
माण तालुक्यातील पुकळेवाडी येथे गुरुवारी व शुक्रवारी रात्री झालेल्या वादळी पाऊस वाऱ्यामुळे बाजरी व मका ही पिके जमिनीवर आडवी झाली असून प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. काही शेतकऱ्यांकडून भुईसपाट झालेले पिक उभे करुन बांधन्याचा प्रयत्न सुरु आहे. पुकळेवाडीच्या शिवारात बाजरीचे पिक पोटऱ्यात व काही ठिकाणी निसावले आहे. पण हेच पीक भुईसपाट झाल्याने शेतकरी चिंतातुर आहे.

पुकळेवाडीसह संपूर्ण माण तालुक्यावर दुष्काळाचे सावट कायम असते. मात्र  खरीप हंगामात सुरवातीस झालेल्या पाऊसाच्या हलक्या सरी कोसळल्यानंतर पुकळेवाडी येथील शेतकऱ्यांनी कमी ओलीत बाजरी व मका पिकाची पेरणी केली होती. काही शेतकऱ्यांवर बाजरीचे पीक दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. मका पिकावर किडीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून वाऱ्यासह पावसाची हजेरी लागत असल्यामुळे बाजरी, मका हे संपूर्ण पिकच वाया जाण्याची भिती व्यक्त होत आहे. 

पुकळेवाडीसह परिसरात शुक्रवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. जोरदार वाऱ्यायामुळे फुलोऱ्यात आलेले बाजरीचे पिक भुईसपाट झाले आहे. पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यामधून होत आहे.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...