Monday, June 16, 2025

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा; पनवेल तहसीलदार यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे निवेदन

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा; पनवेल तहसीलदार यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे निवेदन 



पनवेल (१६/६/२०२५)  : शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढला आहे. राज्यात दिवसाला रोज आठ शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे राज्यातील सरसकट शेकऱ्यांची कर्जमाफी करा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या मागण्यांचे निवेदन पनवेल तहसीलदार श्री. पाटील यांना राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने देण्यात आले. 

निवेदनाची लवकरात लवकर शासनाने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाचे वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रासपने दिला आहे. निवेदनावर राज्य शाखेचे कोषाध्यक्ष सुदामशेठ जरग, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बलभिमशेठ सरक, माजी कळंबोली शहर अध्यक्ष अण्णासाहेब वावरे, रासपा नेते मच्छिंद्र मोरे, युवा नेते नारायण वीरकर, युवा नेते अंकुर जरग यांच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025