शेतकरी कर्जमाफीसाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर रासपाची निदर्शने
उद्योगपतींची कर्जे माफ करता मग शेतकऱ्यांची कर्जमाफी का नाही? : राष्ट्रीय समाज पक्ष
अलिबाग (२३/६/२०२५) : राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे व सातबारा कोरा करा या मागण्यांसाठी राष्ट्रीय समाज पक्षाने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. उद्योगपतींची कर्जे माफ करता मग शेतकऱ्यांची कर्जमाफी का नाही? असा सवाल राष्ट्रीय समाज पक्षाचे विद्यार्थी आघाडी माजी प्रदेशाध्यक्ष शरद दडस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रसार माध्यमांशी बोलताना केला. अदानी अंबानी यासारखे उद्योगपतींचे कर्ज माफ करण्यासाठी आंदोलन, मोर्चे काढावे लागत नाही, निवेदन द्यावे लागत नाही अशी बोचरी टीका शरद दडस यांनी राज्यसरकारविरोधात केली.
शेतकऱ्यांची मते मिळवण्यासाठी कर्जमाफीचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले होते. आज शेतकऱ्यावर वाईट वेळ आली आहे, राज्य सरकारने लवकरात लवकर कर्जमाफी करून, शेतकऱ्याचा सातबारा कोरा करून दिलेली आश्वासने पाळावीत, असे रासपच्यावतीने सांगण्यात आले. रायगड जिल्हा महसूल तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी रासपचे निवेदन स्वीकारत आपल्या मागण्यांचे निवेदन शासनापर्यंत पोहचवू, असे आश्वासन रासपच्या शिष्टमंडळास दिले.यावेळी रासपचे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य भगवान ढेबे, राज्य कोषाध्यक्ष सुदामशेठ जरग, राज्य विद्यार्थी आघाडी मा. प्रदेशाध्यक्ष शरद दडस, कोकण प्रांत अध्यक्ष सुशांत पवार, कळंबोली शहराध्यक्ष अण्णासाहेब वावरे, पनवेल तालुका युवक आघाडी अध्यक्ष शशिकांत मोरे, प्रा. दत्ता अनुसे सर, अशोक कोकरे आदी पदाधिकारी/ कार्यकर्ते उपस्थित होते. रासपाचे आंदोलनास शेतकरी संघटनेचे मुस्ताक गट्टे, छवा संघटना खालापुर यांनी पाठिंबा दिला.
No comments:
Post a Comment