Wednesday, June 18, 2025

दिल्लीचे तख्त राखण्यासाठी महादेवराव जानकर सारखा रांगडा माणूस दिल्लीत: हर्षवर्धन सपकाळ

दिल्लीचे तख्त राखण्यासाठी महादेवराव जानकर सारखा रांगडा माणूस दिल्लीत: हर्षवर्धन सपकाळ 

दिल्ली : दिल्लीचे तख्त राखण्यासाठी महादेवराव जानकर यांच्या सारखा रांगडा माणूस आज दिल्लीच्या तालकटोरा मैदानात अहिल्याबाई होळकर यांचा कार्यक्रम घेत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचे प्रतिनिधी म्हणून हर्षवर्धन सपकाळ रासपच्या मंचावर उपस्थित होते. 

श्री. सपकाळ म्हणाले, बहुजन हिताय बहुजन सुखाय, संविधानाचे संरक्षण करण्यासाठी आमचे परममित्र महादेव जानकर साहेब यांची साथ घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. 

दिल्लीचे तख्त राखीतो महाराष्ट्र माझा आणि आज दिल्लीचे तख्त राखण्यासाठी महादेवराव जानकर सारखा रांगडा माणूस, तालकटोरा स्टेडियमध्ये कार्यक्रम घेतो, उर भरून आलेला आहे. जातीवादी विषाचा महाराष्ट्राला लागलेला कलंक जानकर साहेब महाराष्ट्रात आपल्याला केवळ हातात हात घेऊन भागणार नाही तर  विचाराला विचार देऊन आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे. जानकर साहेब, मैत्रीचा हात घेऊन, विचाराचा हात घेऊन मी आज आपल्यात उभा आहे. 

अहिल्याबाई यांचा जीवनगौरव हा विचारांचा गौरव आहे. त्यांचा विचार भारत निर्माणसाठी महत्वाचा आहे. आज सामाजिक न्यायासाठी आरक्षण आहे, परंतु सगळीकडे आता शासकीय नोकऱ्या व अन्य क्षेत्रात खाजगीकरण होत आहे, खाजगीकरणात हे आरक्षणाची भागीदारी मिळाली पाहिजे यासाठी संघर्ष करावा लागेल.

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025