रासपच्या स्वराज महारॅलीस मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा दिल्लीत उत्स्फूर्त प्रतिसाद
 |
दिल्लीतून महाराष्ट्राच्या दिशेने परतीच्या प्रवासात स्वराज महारॅली समवेत रासपचे महादेव जानकर, अंकुश अनुसे, डी. के. पाटील |
मुंबई : महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्षाने आयोजित केलेल्या स्वराज महारॅलीस उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेश, दिल्ली आदी राज्यात नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत करून जोरदार प्रतिसाद दिला. स्वराज महारॅलीच्या परतीच्या प्रवासात रासपा सुप्रीमो महादेव जानकर यांनी सारथ्य केले. श्री. जानकर यांचे मध्यप्रदेश राज्यात फटाके वाजवत, ढोल वाजवून जोरदार स्वागत केले. श्री. जानकर यांनी नागरिकांना मार्गादर्शन केले. उत्तरेकडील हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, रासेफचे वीर पाल यांनी जाहीर सभाद्वारे मार्गदर्शन केले. पालघर महाराष्ट्र नेते रामदरश पाल, विनायक रुपनवर, अंकुश अनुसे, अनिल शेंडगे, डी. के. पाटील आदी विराजमान होते
 |
मध्यप्रदेश राज्यात सुंदरपूर जिल्हा मुरैना येथे स्वराज महारॅलीचे परतीच्या प्रवासात महादेव जानकर व रॅलीचे नागरिकांनी स्वागत केले. |
उत्तर प्रदेशात चीरघाट वृंदावन, आगरा किल्ला, धनगर समाज धर्मशाळा गोवर्धन मथुरा, गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील डुडेरा, ग्रेटर नोएडा, डी. ए. बी. स्कूल, हैबतपूर, गाजियाबाद जिल्ह्यात मवाई विजयनगर, भोहापुर कोसंबी आदी ठिकाणी स्वागत करण्यात आले. हरियाणा राज्यात पलवल जिल्ह्यात होडल, खिरवी, हसनपूर, खामी, घसेडा, गुधराणा, सेवली, मानपूर, गुदराणा, रेयार मोहल्ला या गावात स्वागत करण्यात आले. दिल्लीत गोयल डेअरी, गगन सिनेमा, नंदगिरी, ताहीर, मौजपूर, भगीरथ विहार, रोहिणी सेक्टर 18 आदी परिसरात स्वागत करण्यात आले. परतीच्या प्रवासात सुंदरपूर मुरैना, बदरवास शिवपुरी आदी ठिकाणी स्वागत करण्यात आले. छत्रपती संभाजी नगर येथे स्वराज महारॅलीतून श्री. महादेव जानकर हे गोपीनाथगड परळीकडे रवाना झाल्याचे विनायक रुपनवर कळवितात. पुणे येथील महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती कार्यालयात स्वराज महारॅली सोबत ४२ दिवस प्रवास करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केल्याचे राज्य सरचिटणीस अजित पाटील यांनी सांगितले.
 |
मिसा पलवल हरियाणा येथे स्वराज महारॅलीचे स्वागत शाळकरी मुलांसह नागरिकांनी केले. |
 |
नंदनगिरी दिल्ली येथे राष्ट्रीय समाज पक्ष स्वराज महारॅलीचे स्वागत करताना स्थानिक नागरिक |
No comments:
Post a Comment