तर सरकारचा बीपी वाढवू : महादेव जानकर यांचा इशारा
प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आंदोलनास महादेव जानकर यांचा पाठिंबा
अमरावती (११/६/२५) : बच्चू कडूंची तब्येत बिघडली आहे. त्यांचा बीपी वाढत आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन दिलेली आश्वासने पाळावीत, वेळप्रसंगी सरकारचा बीपी वाढवू, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिला. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आंदोलनास भेट देऊन रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी पाठिंबा जाहीर केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारच्या विरोधात पश्चिम महाराष्ट्रसह राज्यभर राष्ट्रीय समाज पक्ष आंदोलन तीव्र करेल, असा इशारा दिला. यावेळी जानकर यांच्यासमवेत विदर्भ रासप नेते तोसीफ शेख व अन्य रासप पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपचे सरकार फसवे सरकार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजेत. आज अमेरिकेसारख्या देशात सरकार विरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. इकडं आमच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू यांनी चार दिवसांपासून अन्नत्याग केलाय. आज हे उपोषण संयमानं सुरू आहे. या उपोषणाचं गांभीर्य सरकारनं घ्यायला हवं. संयमाचा बांध मात्र फुटू देऊ नका, असा सल्ला राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी सरकारला दिलाय.
"विधानसभा निवडणुकीच्यावेळी सरकारनं जे वचन जनतेला दिलं होतं. त्याची वाचनपूर्ती सरकारनं करावी हीच आमची मागणी आहे. आम्ही एसीमध्ये बसून नेते झालो नाही. आम्हाला जनतेचं दुःख कळतं. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, दिव्यांगांना न्याय देणार अशी अनेक वचने सरकारनं निवडणूक काळात दिलीत. आता जनता हुशार झाली आहे. जनतेनं ठरवलं तर जनता सरकारचा डोलारा उलथवू शकते," असा इशारा देखील महादेव जानकर यांनी दिला.
No comments:
Post a Comment