मुंबई विद्यापीठातून शाहीराच्या मुलाने केली एल.एल.बी उत्तीर्ण
कळंबोली : मराठी लोकसाहित्यात भर घालणारी, मौखिक पद्धतीने पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या धनगरी ओव्या गाणाऱ्या शाहिर ज्ञानेश्वर वाक्षे यांच्या मुलाने मुंबई विद्यापीठातून नुकतीच एल.एल.बी परीक्षा उत्तीर्ण केलीय.
प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून उदय लता ज्ञानेश्वर वाक्षे या युवकाने मुंबई विद्यापीठाच्या केएलई कॉलेज कळंबोली येथून एल.एल.बी परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल मायाक्कादेवी मंदिरात सत्काराचे आयोजन केले होते. आर्थिक परिस्थितीचे कारण न देता उदय वाक्षे यांनी रावजी चहाचा व्यवसाय करत, ही परीक्षा उत्तीर्ण केल्याने, सर्वत्र कौतुक होत आहे. उदय वाक्षे यांनी परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल विश्वनायक फाऊंडेशन संस्थापक विजय ज्ञानेश्वर वाक्षे यांनी आनंद व्यक्त केला.
भगवान मोटे यांनी उदय वाक्षे यांना मानाचा फेटा बांधून, शाल श्रीफळ देत विशेष सत्कार केला. सत्कारप्रसंगी सुखदेव खांडेकर, वाक्षेवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच आगतराव मोटे, प्राध्यापक एन. पी. खरजे, मायाक्कादेवी मंदिराचे पुजारी श्री. कोळेकर, सदाशिव मोटे, काशिनाथ पुकळे, किरण मोटे, दीपक मोटे, कुणाल मोटे,ओंकार मोटे व अन्य मित्र परिवार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment