Wednesday, June 18, 2025

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या; राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे राज्यभरात तहसीलदार मार्फत सरकारकडे निवेदन

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या; राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे राज्यभरात तहसीलदार मार्फत सरकारकडे निवेदन

फलटण जिल्हा सातारा येथे तहसीलदार यांना निवेदन देताना प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक व अन्य.


मुंबई (१६/६/२०२५) : राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने महाराष्ट्र राज्यभर विविध तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी निवेदन देण्यात आले, असल्याची माहिती रासपचे राज्य सरचिटणीस अजित पाटील यांनी यशवंत नायकाला दिली. 

राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. शेतकरी हा देशाचा कणा असून, सततच्या नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ व बाजारातील मंदीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळावा यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय समाज पक्ष नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांचे हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करत राहील, असे श्री. पाटील यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व तालुक्यात पदाधिकारी यांनी निवेदन दिल्याबद्दल त्यांचे राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी अभिनंदन केले. 


प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांच्या मार्गदर्शनात राज्यातील  खालील ठिकाणी निवेदने देण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र विभागात सातारा जिल्ह्यात - माण, फलटण, सातारा, कराड, खटाव, पाटण. सोलापूर जिल्ह्यात- अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मंगळवेढा, माढा, बार्शी, पंढरपूर, माळशिरस, करमाळा, मोहोळ, सांगोला. पुणे जिल्ह्यात बारामती, हवेली, इंदापूर, दौंड, पिंपरी चिंचवड, मावळ, खेड, पुरंदर. कोल्हापूर जिल्ह्यात - शाहुवाडी, करवीर, इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळ, सांगली जिल्ह्यात- आटपाडी, जत, वाळवा, शिराळा. मराठवाडा विभागात धाराशिव जिल्ह्यात – धाराशिव, भूम, तुळजापूर, परंडा, कळम, वाशी. हिंगोली जिल्ह्यात – हिंगोली, सेनगाव, वसमत. लातूर जिल्ह्यात – लातूर, उदगीर. नांदेड जिल्ह्यात – देगलूर, बिलोली, मुखेड, नांदेड. बीड जिल्ह्यात – बीड, वडवणी, गेवराई, आंबेजोगाई, परळी, माजलगाव, शिरूर कासार. परभणी जिल्ह्यात – पूर्णा, सोनपेठ, पाथरी, परभणी, गंगाखेड. जालना जिल्ह्यात – जालना, अंबड, मंठा, घनसावंगी. छ. संभाजीनगर जिल्ह्यात – छत्रपती संभाजीनगर, पैठण. उत्तर महाराष्ट्र विभागात अहिल्यानगर जिल्ह्यात – श्रीरामपूर, संगमनेर, कर्जत, जामखेड, राहुरी, अकोले, शेवगाव. नाशिक  जिल्ह्यात – चांदवड, नाशिक, बागलाण, सिन्नर, निफाड. विदर्भ विभागात बुलढाणा जिल्ह्यात – सिंदखेडराजा, अकोला जिल्ह्यात अकोला, अकोट, मूर्तीजापुर, तेल्हारा, यवतमाळ जिल्ह्यात – यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात - चंद्रपूर, वाशिम जिल्ह्यात - रिसोड. कोकण विभागात रायगड जिल्ह्यात – पनवेल, माणगाव, खालापूर, पेण, उरण, कर्जत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात – सावंतवाडी, वेंगुर्ला. पालघर जिल्ह्यात – वसई. ठाणे जिल्ह्यात – मुरबाड, शहापूर, कल्याण. मुंबई विभागात मुलुंड, बोरिवली, अंधेरी आदी तहसील कार्यालयात राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी निवेदने देण्यात आली. या निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर कर्जमाफीची घोषणा न केल्यास राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयावर उग्र स्वरूपाचे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येईल, राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांनी दिला आहे. निवेदन देणाऱ्या सर्व राज्यभरातील पदाधिकारी यांचे राज्य महासचिव श्री. सलगर यांनी अभिनंदन करून आभार यशवंत नायकशी बोलताना मानले.

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025