पीडित मुलीच्या न्यायासाठी महादेव जानकर प्रयागराज उत्तरप्रदेश येथे रस्त्यावर!
पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या महादेव जानकर यांना पोलिसांनी रोखले
प्रयागराज (१७/६/२०२५) : आज पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह थेट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केलं. प्रयागराज विमानतळावरून कौशांबीकडे निघालेल्या महादेव जानकर यांचा ताफा पोलिसांनी अडवला. महादेव जानकर यांच्या दौऱ्याचा धसका घेऊन उत्तर प्रदेश सरकारने कलम 144 लागू केले. पीडित बालिकेच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी निघालेल्या महादेव जानकर यांना रोखण्यासाठी हजारो पोलिसांना रस्त्यावर उतरवले होते. महादेव जानकर यांनी प्रयगराज येथे स्थानिक कार्यकर्त्यांसोबत मीटिंग घेऊन पीडित कुटुंबीयांवर केलेल्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. महादेव जानकर यांनी कार्यकर्त्यांसह थेट रस्त्यावर उतरवून उतर प्रदेश सरकाच्या विरोधात निदर्शने केली. प्रयागराजच्या लाल गिरिजा घर चौकात पीडित कुटुंबीयांना न्याय द्या, उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक मुर्दाबाद, योगी सरकारची तानाशाही नहीं चलेगी अशा प्रकारच्या जोरदार घोषणा दिल्या.
पक्षपाती कारभारावरून भाजपवर महादेव जानकर यांनी गंभीर आरोप केले. योगी आदित्यनाथ यांना कठोर शब्दात सुनावले तसेच ब्रिजेश पाठक यांच्या सांगण्यावरून पीडित कुटुंबावर अन्याय केल्याने तातडीने त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. जिल्हा पोलिस अधीक्षकाचे निलंबन करावे. सदर घटनेची सीबीआय चौकशी करावी, असे मत श्री. जानकर यांनी स्थानिक वृत्तवाहीणीशी बोलताना केले.
अन्यायाविरोधात आवाज उठवणं हीच खरी समाजसेवा आहे! पीडितेला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा महादेव जानकर यांनी दिला आहे. श्री. जानकर यांनी प्रशासनाला कठोर कारवाईसाठी अल्टिमेटम दिला असून, दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. “सामान्य माणसाच्या मुलीवर अन्याय होतो आणि सत्ताधारी गप्प राहतात, हे आम्ही खपवून घेणार नाही. समाजहितासाठी आवाज उठवणाऱ्या प्रत्येक लढवय्याचे संघटनेचे आम्ही आभार मानतो. हा लढा फक्त एका मुलीसाठी नाही, तर प्रत्येक बहिणीसाठी आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे एड. विवेक टायगर यांनी उत्तर प्रदेशच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पीडितेला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहील, असा इशारा दिला. यावेळी शेकडो राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment