दिल्लीवर रासपचे शासन आणणे हेच अंतिम लक्ष्य : महादेव जानकर
![]() |
तालकटोरा मैदान दिल्लीतून मार्गदर्शन करताना राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर |
रासपतर्फे दिल्लीच्या तालकटोरा मैदानात महाराणी अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती साजरी
दिल्ली (३१/५/२०२५) : समातामुलक समाजाची निर्मिती करण्यासाठी या देशावर राज्य करण्यासाठी दिल्लीवर शासन आणणे हेच अंतिम लक्ष्य असल्याचे, महादेव जानकर यांनी ठणकावून सांगितले. दिल्लीच्या तालकटोरा मैदानात राष्ट्रीय समाज पक्षाने महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त स्वराज महारॅलीचे आयोजन केले होते. यावेळी रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर बोलत होते.
महादेव जानकर दिल्लीतून भाषणात म्हणाले, राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मंचावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मोहन जोशी, रासपचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर, दिल्लीचे वीरपाल, राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर, छाया पाटील, राजदच्या सुशीलाताई मोराळे, लोकजनशक्ती पार्टीचे चौरसिया आणि देशभरातून आलेले भाऊ आणि बहीण, विचारवंत यांचे स्वागत.
![]() |
उपस्थित जनमाणसास हात उंचावून अभिवादन करताना डावीकडून एस. एल. अक्कीसागर, हर्षवर्धन सपकाळ, महादेव जानकर, मोहन जोशी, काशिनाथ शेवते, अजित पाटील. |
श्री. जानकर पुढे म्हणाले, दोस्तहो, आजच्या कार्यक्रमासाठी हरियाणा, मध्यप्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, बिहार, दिल्ली, उत्तराखंड आदी राज्यातून निवडक लोक आलेले आहेत, त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो. मी लोकांना पैसा काही दिला नाही, गाडीचे तिकिट दिले नाही. स्वतःच्या ताकदीवर हे लोक स्वाभिनाने आलेले आहेत. मी त्यांना धन्यवाद देईन. तुम्हाला वाटले असेल, राहुल जी, पवार साहेब, अखिलेशजी आले नाहीत, तुम्हाला सांगेन इंतजार का फल मिठा होता है! जे होत आहे ते चांगल्यासाठी होत आहे. जिस समाज का दल नहीं! उस समाज का बल नहीं!! तुमचे दल नसल्यामुळे या देशात तुम्ही बेदखल होता. आता दखल करण्याची वेळ आलेली आहे. मी ३० वर्षापूर्वी अकेला चला था! कारवा बनता गया! चार राज्यात आमच्या परतीला मान्यता मिळाली. महाराष्ट्रात चार आमदार जिंकले. गुजरात राज्यात २८ नगरसेवक जिंकले १ आमदार कमी मताने हरला. कर्नाटकात चांगले आहे. उत्तर प्रदेशात चांगले मते मिळवली. मध्य प्रदेशात पार्टीचा जनाधार वाढत आहे.
![]() |
दीपप्रज्वलन करताना रासप सर्वेसर्वा महादेव जानकर, महाराष्ट्र काँगेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मोहन जोशी, अत्तरसिंह पाल, राजद नेत्या सुशीलाताई मोराळे व अन्य. |
श्री. जानकर राजकीय भाष्य करताना म्हणाले, मागच्यावेळेस आम्ही एनडीए सोबत होतो. आमची मजबुरी होती. सपकाळ साहेब तुमची पार्टी त्यावेळी मोठी होती, त्यावेळी आम्हाला विचारत नव्हती, त्यामुळे आम्हाला काही वेगळे करावे लागले. आता आम्ही संघर्ष करू, संविधानवादी सरकार कसे येईल, यासाठी काम करू.
श्री. जानकर पुढे बोलताना म्हणाले, राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीची सुरुवात चोंडीत मीच केली होती. तिथेच राष्ट्रीय समाज पक्षाची घोषणाही केली. तिथे महाराष्ट्र सरकार जयंती साजरी करायला लागल्यानंतर आम्ही चौंडी सोडून दिली. त्यानंतर आम्ही मुंबईत जयंती साजरी केली, तिथेही महाराष्ट्र सरकार जयंती साजरी करायला लागल्यानंतर, आम्ही दिल्लीत जयंती चालू केली. ज्या दिवशी केंद्र सरकार दिल्लीत अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करेल, त्या दिवशी मी अमेरिकेत जयंती साजरी करेन. केवळ जयंती साजरी करणे माझे ध्येय नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, स्वामी विवेकानंद, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत भगवानबाबा यांच्या कृपाशीर्वादाने त्यांच्या विचाराने चाललो आहोत. आम्ही महात्मा फुले यांना आयडॉल मानले आहे. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, पुढील काळात आप आपल्या राज्यात पार्टीची ताकद वाढली पाहिजे.
![]() |
रासपच्या स्वराज महारॅली समवेत दिल्लीपर्यंत सारथ्य करणारे पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना गोविंदराम शुरनर, एस. एल. अक्कीसागर, बाळकृष्ण लेंगरे . |
आज सकाळी पत्रकारांनी विचारल्यावर सांगितले, मी एनडीए सोबत नाही, इंडियावाल्यांनी विचारले तर विचार करू असे सांगितले. आज राहुलजी, पवार साहेब, अखिलेशजी आले नाहीत म्हणून मी नाराज नाही, ही तर सुरुवात आहे. पुढे आम्हाला खूप प्रवास करायचा आहे, देशावर राज्य करायचंय. अहिल्याबाई होळकर जयंती तो बहाणा है! दिल्ली मे शासन लाना मेरा आखरी निशाणा है! असे जानकर यांनी ठणकावून सांगितले.
ज्यावेळी मी चोंडीत जयंती चालू केली, त्यावेळेस आज साजरी करणारे विरोध करत होते, मला साथ देत नव्हते. २५ लोकांपासून जयंती चालू केली. जे आज साजरी करत आहेत, त्यावेळेस ते लोक विरोध करत होते. पहिल्यांदा तलवारधारी फोटो बनवला तर मला विरोध केला, त्यावर मी कमेंट दिली नाही. आज सर्वजण तलवारधारी अहिल्याबाई होळकर फोटो सर्वजण स्वीकारत आहेत. शिवलिंगधारी अहिल्याबाई पाहिजे, पण त्यासोबत ३० वर्ष या देशात राज्यकारभार केलाय, यासाठी मी दिल्लीच्या तालकटोरा मैदानात आलोय. समतामुलक समाज निर्माणासाठी अहिल्याबाई होळकर यांचा आदर्शवाद घेऊन चाललोय, असे जानकर यांनी स्पष्ट केले.
जानकर पुढे म्हणाले, सकाळपासून लोक याठिकाणी येत आहेत. दिल्लीतील चारशे ऑटोवाले लोक आलेत, त्यांनाही धन्यवाद देईन. लाल किल्ल्यावरून भाषण देईच आहे. आम्ही प्रधानमंत्री बनलो नाही तर आमची डेड बॉडी कुठे जाती. यशवंतराव चव्हाण यांची डेडबॉडी कराडला गेली. आम्हाला राजघाटच्या बाजूला जागा मिळावी, इथेच अंत्यसंस्कार व्हावेत ही इच्छा आहे. सपकाळ साहेब, जोशी साहेब आम्ही तुम्हाला मदतीसाठी हात पुढे केलाय, तुम्ही हात द्या अगर न द्या एक दिवस आम्ही दिल्ली काबीज करणार हे आमचे मिशन आहे. मला समाजकारण राजकारण करायचे आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून मी बघतं आहे, ज्या समाजातून अहिल्याबाई होळकर घडल्या, त्या समाजातून एकही संसदेत खासदार निवडून आला नाही. कुणी तिकीटही दिले नाही. परंतु महादेव जानकरने तिकिट देणारी फॅक्टरी खोलली आहे. आम्ही आमच्याच तिकिटावर येण्याचा प्रयत्न करू. शिव्या देऊन काही होणार नाही, आमचा बुद्धीवर विश्वास आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचाराने राजकारण व्हायला पाहिजे. ज्यांनी आम्हाला धोका दिला, त्यांना आम्ही मोका आल्यावर हटऊ. तालकटोराचा इतिहास आहे. या ठिकाणी मल्हारराव होळकर, जिवाजी शिंदे आणि पेशव्यांनी दहा दिवस वेढा दिला होता, ही मराठ्यांची ऐतिहासिक भूमी आहे, म्हणून ठरवले महाराणी अहिल्याबाई होळकर यांची जयंती याच मैदानावर घेऊ, त्यात यशस्वी झालो. राष्ट्रीय समाज पार्टी देशात चांगल्या प्रकारे उभारेल, अहिल्याबाई होळकर यांचे विचार. देशभर घेऊन जाऊ. समाजातील विचारवंत यांचे आभार मानून जय हिंद जय भारत.
महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त देशभरातून राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते रेल्वे, बस, विमानाने प्रवास करून मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. ग्वाल्हेरहून जीवाराम बघेल यांनी खास माता भगिनीसंह बस, दोन चारचाकी दिल्लीत आणल्या होत्या. अहिल्याप्रेमी नागरिक, रासप सैनिकांच्या गर्दीने तालकटोरा स्टेडियम खचाखच भरले होते. राजे मल्हारराव होळकर यांच्या नंतर उत्तर भारतात सर्व भाषिक लोकांना जोडण्याचे काम महादेव जानकर यांनी केले. अहिल्याबाई होळकर यांनी तीन दशक आदर्श राजकारभार केला आहे. अहिल्याबाई होळकर यांची उपेक्षा झाली. पहिली जयंती महादेव जानकर यांनी चौंडीत साजरी केली. राष्ट्रीय समाज पक्षाला दिल्लीवर राज्य करायचे आहे, म्हणून आम्ही आज दिल्लीत आलोय. आजच्या घडीला राष्ट्रीय समाज पक्ष, महादेव जानकर यांच्या सारखा सर्वात सुपर पक्ष व सुपर नेता दुसरा कोणी नाही. आम्हाला महादेव जानकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय समाज पक्षाला संसदेची सत्ता हस्तगत करायची आहे, आणि ती आम्ही मिळवू, असा विश्वास एस. एल. अक्कीसागर यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
शरद पवार, राहुल गांधी, अखिलेश यादव गैरहजर
रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी काँग्रेसचे नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांना कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते. ३१ मे च्या कार्यक्रमास राहुल गांधीना घेऊन येऊ, असे शरद पवार यांनी कळविले असल्याचे रासपाच्या सूत्रांकडून यशवंत नायकला सांगण्यात आले होते. रासपाने मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसारही केला होता. मंचावर तिन्ही नेत्यांचे बॅनरवर फोटो झळकत होते. एकीकडे भाजपने देशभरात अहिल्याबाई होळकर जयंती कार्यक्रम घेतल्याने वरील नेत्यांना राजधानी दिल्लीत आयता रासपचा मंच मिळाला होता, मात्र अनुपस्थित राहिल्याने त्यांनी मोठी संधी गमावली.
No comments:
Post a Comment