उत्तर मुंबईत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश
मुंबई महिला आघाडी राष्ट्रीय समाज पक्ष सचिवपदी रीमा मोहिते यांची वर्णी
मुंबई (१२/६/२०२५) : काही दिवसांवर येऊन ठेपलेली मुंबई महानगरपालिका निवडुकीत सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत. राष्ट्रीय समाज पक्षानेही मुंबई महानगरपालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरुवात केली आहे. आज सायंकाळी 5 वाजता दहिसर पश्चिम येथील आर के रोड, डेविड विल्ला येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल यादव यांनी पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पक्ष प्रवेश कार्यक्रमासाठी रासप महाराष्ट्र प्रदेश सचिव जिवाजी लेंगरे, रासप मुंबई महानगर कोषाध्यक्ष महावीर (आण्णा) वाघमोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर मुंबई जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय समाज पक्षात जाहीर प्रवेश केला. धडाकेबाज नेत्या रीमा मोहिते यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केल्यानंतर मुंबई महिला आघाडी सचिवपदी वर्णी लावत श्री. लेंगरे यांनी त्यांची नियुक्ती जाहीर केली. रीमा मोहिते यांच्या समवेत अली मोहम्मद शेख, नीलम सोलंकी, सुरेश जयसवाल, किशोर वाघरी, गणेश जैयसवाल यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला.
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांचे हात बळकट करण्यासाठी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष सर्वसामान्यांचे प्रश्न हाती घेऊन रणांगणात लढणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षात सर्वांना स्थान असून, सर्वापरि राष्ट्र मोठे मानून, राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या राष्ट्रीय समाज घटकाना राष्ट्रीय समाज पक्षाचे दरवाजे उघडे आहेत.
उत्तर मुबई जिल्हा व्यापार आघाडी जिल्हाध्यक्षपदी अली मोहम्मद शेख, उत्तर मुंबई महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी सौ. नीलम सोलंकी, उत्तर मुंबई जिल्हा सचिव सुरेश जयसवाल, उत्तर मुंबई व्यापारी आघाडी जिल्हा सचिवपदी गणेश जैयसवाल, वॉर्ड क्रमांक 9 अध्यक्षपदी किशोर वाघरी यांना राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
No comments:
Post a Comment