Wednesday, June 18, 2025

राष्ट्रीय समाज पक्षाची ग्रामपातळीवर भक्कम घोडदौड! मोगराळे सरपंचपदी नंदाताई राऊत

राष्ट्रीय समाज पक्षाची ग्रामपातळीवर भक्कम घोडदौड! मोगराळे सरपंचपदी नंदाताई राऊत 

दहिवडी (१५/६/२५) : दोनच दिवसांपूर्वी मोगराळे ता. माण, जि. सातारा येथील गावामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव राऊत यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली मोगराळे ग्रामपंचायत सरपंचपदी सौ. नंदाताई संजय राऊत (राष्ट्रीय समाज पक्ष) यांची विजयी निवड झाली. त्यांच्या निवडीनंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/ राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी त्यांच्या घरी भेट घेतली निवडीबद्दल अभिनंदन केले व सत्कार केला.

 महादेव जानकर यांनी गावाच्या समग्र विकासासाठी कटिबद्ध राहण्याच्या सूचना देत शासनाच्या योजनांचा योग्य लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा मंत्र दिला. गावपातळीपासून विकासाची दिशा ठरते, आणि रासप त्यासाठी कार्यरत आहे!. माण तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे, महादेव जानकर यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. यावेळी  पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख विनायक रूपनवर, माण तालुका अध्यक्ष शिवाजीराव बरकडे (आबा), युवक आघाडी तालुकाध्यक्ष तात्याराम दडस, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025