![]() |
विराट मेळाव्यात बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिदधरामय्या. |
सर्व वंचित घटकांनी संघटित होऊन संविधानिक अधिकार मिळवले पाहिजेत : सिद्धरामय्या
![]() |
बेळगांव : विराट मेळाव्यात बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय नेते महादेव जानकर, मंचावर विराजमान कर्नाटक मुख्यमंत्री सिद्धरामय्या, हरियाणा राज्यपाल बंडारू दत्तात्रेय. |
दिल्लीची सर्वोच्च सत्ता ताब्यात घेऊनच उपेक्षित समजाचे प्रश्न सोडवता येतील : महादेव जानकर
बेळगाव : (०३/१०/२३) यशवंत नायक ब्यूरो
बेळगाव येथे शेफर्ड्स इंडिया इंटरनेशनलचे आयोजित शेफर्ड्स/ धनगर पाल बघेल गडरिया समाजाचे ९ वे महा अधिवेशन पार पडले. कर्नाटक मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे महादेव जानकर यांनी सत्कार करून अभिनंदन केले. सिद्धरामय्या यांच्यानंतर महादेव जानकर यांचे भाषण गाजले, व ते अतिशय महत्वपूर्ण होते, अशी प्रतिक्रिया उपस्थितांमधून यशवंत नायक ब्यूरो जवळ पोहचली.
कर्नाटक मुख्यमंत्री सिद्धारमैया म्हणाले, कर्नाटक राज्यात कुरुबा नावाने ओळखले जाणारे धनगर समाज व अन्य समाजाची शिफारस राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवली आहे. केंद्राकडून मंजूर करन्यासाठी पाठपुरावा करू. धनगर समाजाला सांस्कृतिक वारसा आहे. राजकीय इतिहास आहे. संघटना नसती तर कागिनेली गुरुपीठ संस्थान बनले नसते. हक्काबुक्का पासून अहिल्याबाई होळकर यांच्यापर्यंत ऐतिहासिक वारसा आहे. समाजातील सर्व वंचित घटकांनी संघटित होऊन संविधानिक अधिकार मिळवले पाहिजेत. प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामजिक आणि राजकिय विकास झाला तरच समानता शक्य आहे. प्रत्येकाला त्यांचा वाटा आणि संधी मिळाली पाहिजे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी आद्य स्वातंत्र्यवीर संगोळी रायन्ना यांच्या भूमीत शेफर्ड इंडिया इंटरनॅशनलच्या राष्ट्रीय संम्मेलनास शुभेच्छ्या दिल्या. महादेव जानकर आपल्या जोषपूर्ण भाषणात म्हणाले, काँग्रेस, भाजपने मुख्यमंत्री राज्यपाल केले तरीही दिल्लीची सत्ता ताब्यात घेतल्याशिवाय धनगर, पाल, बघेल, गडरिया, गायरी, कुरुबा, कुरुमान, रबारी, देवासी, रायका, मालधरी, भरवाड, चांगपा, बकरवाल आदी समाजाच्या समस्या सुटणार नाहीत. मुख्यमंत्री पदाबरोबरच समाजाचा प्रधानमंत्री बनला पाहिजे. प्रधानमंत्री बनण्यासाठी राजकिय ताकदही तयार करावी लागेल. पशुपालक समाजाची ओळख फक्त शेळी मेंढी पाळणारे एवढीच नसून अखंड भारतावर राजा बनून राज्य करणारी होती. आपल्या हातात सत्ता ताब्यात घेऊन देशाला सुजलाम सुफलाम बनवण्याची ताकद आमच्यात आहे आणि ती वेळ आली आहे.
शेफर्ड्स इंडिया इंटरनेशनलचे अध्यक्ष विश्वनाथ म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर राहून सर्वच क्षेत्रात भरारी घेतली पाहिजे. या कार्यक्रमास काश्मीर पासून केरळ पर्यंत वेगवेगळ्या राज्यातून मान्यवर सहभागी झाले आहेत. पुढचे दहावे संमेलन दिल्लीच्या रामलीला मैदानात आयोजीत केले जाईल. गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी राजकीय बांधिलकी कोणत्याही पक्षाकडे असली तरी आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.
यावेळी कनकगुरुपीठाचे सर्व स्वामी आणि शेफर्ड समाजाचे सर्व प्रतिनिधी उपस्थित यांचे स्वागत केले. राष्ट्रीय समाजाचे सर्वोच्च संस्था शैफर्ड इंडिया इंटरनेशनलचे स्थापना दिवस सोहळ्यास बेलगांव, कर्नाटक आयोजित विराट सभेत कर्नाटक मुख्यमंत्री सिद्धारमैया, शेफर्ड इंडिया इंटरनॅशनलचे अध्यक्ष ए. एच. विश्वनाथ, उपाध्यक्ष एच एम रेवन्ना, शेफर्ड इंडीया इंटर नॅशनलचे संस्थापक सदस्य सिध्दप्पा अक्कीसागर, कनकपीठाचे स्वामी श्री श्री निरंजनानंद पूरीजी, स्वामी श्री श्री ईश्वरानंद पूरीजी, स्वामी श्री श्री सिद्धरामानंद पुरीजी, श्री साधी माताजी पीठचे स्वामी अर्जुनभाई पूरी स्वामीजी, हरियाणाचे गवर्नर श्री दत्तात्रेय बंगारू लक्ष्मण, श्री सतीश जारकीहोली बांधकाम मंत्री कर्नाटक, श्रीमती लक्ष्मी हेब्बलकर महिला बाल विकास मंत्री कर्नाटक, डॉ. बी के रवी - कुलगुरू कोप्पल विश्वविद्यालय, गोवा राज्यचे पूर्व उपमुख्यमंत्री श्री चंद्रकांत कावलेकर, श्री गोरोनांटला माधव खासदार आंध्रप्रदेश, श्री सागर रायका पूर्व खासदार गुजरात, डॉ विकास महात्मे पूर्व खासदार महाराष्ट्र, दिनेश मोहनिया आमदार दिल्ली, येग्गे मल्लेश्याम आमदार आंध्रप्रदेश, गणेश हाक्के, सतीश पाल उ.प्र, राकेश पाल उ.प्र, अत्तरसिंह पाल दिल्ली, राजेंद्र पाल हरियाणा, निकेत राज प्रवक्ता कांग्रेस कर्नाटका तथा भारतभर वेगवेगळ्या प्रदेशातून लोक आले होते.
No comments:
Post a Comment