Monday, October 16, 2023

काँग्रेस आणि भाजपला पाणी पाजल्याशिवाय जतला पाणी मिळणार नाही : महादेव जानकर

काँग्रेस आणि भाजपला पाणी पाजल्याशिवाय जतला पाणी मिळणार नाही : महादेव जानकर 

सलगरे ता - मिरज जि- सांगली येथे जन स्वराज यात्राप्रसंगी आ. महादेव जानकर यांचे ग्रामस्थांनी स्वागत केले.

सांगली : (२०/८/२३) यशवंत नायक ब्यूरो

काँग्रेस आणि भाजपला पाणी पाजल्याशिवाय जतला पाणी मिळणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आ. महादेव जानकर यांनी केले. संख ता - जत जिल्हा - सांगली येथे जन स्वराज यात्रेच्या सांगता सभेत आ. जानकर बोलत होते. दिनांक १९ ऑगस्ट २०२३ रोजी संत चोखामेळा यांच्या प्रतिमेस अभिवादन करून सांगली लोकसभा मतदार क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्ष जन स्वराज प्रारंभ आटपाडी - विटा- कडेगाव - तासगाव - सांगली- मिरज - कवठेमहांकाळ - जत मार्गे संख येथे समारोप करण्यात आला.

जन स्वराज यात्रेच्या सांगता सभेत आ. जानकर पुढे म्हणाले, ज्यांनी आत्तापर्यंत सत्ता भोगली ते निवडणुकीच्या तोंडावर पाण्याची घोषणा करत होते. काँग्रेस बदलल्यानंतर भाजप न्याय देईल, पण या दोन्ही पार्ट्यांची नियत जत तालुका बद्दल सारखीच राहिलेली आहे. मतशक्तीची ताकद दाखवल्याशिवाय तुम्हाला कुणीही विचारनार नाही. आमच्याकडे फार मोठी सत्ता आहे असे काही नाही, पण जनतेचा जनरेटा उभा करून भारताचे केंद्र सरकार असेल किंवा महाराष्ट्राचे राज्य सरकारची खुर्ची हलवण्याची ताकद राष्ट्रीय समाज पक्षात जरूर आहे. पिण्याच्या पाण्याची साधी मागणी आहे. इंग्रज आल्यानंतर देखील अडचण झाली नव्हती, पण हे काळे इंग्रज आमच्या डोक्यावर बसलेत. त्यांची आजही जतला पाणी द्यायची नियत नाही. दोन तीन गावचे सरपंच म्हणाले, साहेब आम्हाला कर्नाटकला जावे लागेल. नियत असती तर दहा मिनिटात प्रश्न सोडवला असता. जत तालुक्याच्या जनतेने सावध राहावं. काँग्रेसवाल्यांना प्रश्न विचारा, पंडित नेहरू, इंदिरा गांधी पासून सत्तेत आहात का आम्हाला प्यायला पाणी देऊ शकला नाही. आम्ही भाजप बरोबर युती केली, पण भाई और बहनो शिवाय दुसर काय केलं नाही. म्हणून यांना बदलायसाठी जनतेची स्वराज यात्रा सुरू केलेली आहे. आपली पोरं देखील राजकीय सत्तेत घुसली पाहिजेत. समाजाच्या हिताच कायदे लोकसभेत आणि विधानसभेत होतात. काँग्रेस आणि भाजपला पाणी पाजा, त्याशिवाय जत तालुक्याला पाणी मिळणार नाही. राष्ट्रीय समाज पक्ष जतला पाणी दिल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रीय समाज पक्षाचा लढा पिण्याच पाणी बरोबर शेतीला देखील पाणी मिळावं यासाठी लढा आहे. रस्ते, आरोग्य, वीज या मोठया समस्या आहेत.  चांगले शिक्षण व्यवस्था राष्ट्रीय समाज पक्ष देऊ शकतो. काँगेस भाजपला मत देऊन तुमचा विकास होणार नाही, तर तुमचा भकास होईल. जनतेला जागं करण्यासाठी आम्ही फिरत आहे. चुकीच्या ठिकाणी मत दिल्याने वाटोळं झालं.  हे कसल स्वातंत्र्य आहे? सगळ्यात मोठी तिजोरी दिल्लीत आहे आणि छोटी तिजोरी मुंबईत आहे. आपल तिकडे लक्ष नाही. आपण गावगाड्यात हाणामारी करत बसलो आहे. जतच्या जनतेने शपथ घ्यावी, येथून पुढे माझं पोरग ऊस तोडनार नाही तर तुमचं प्रस्थपितांच राजकारण तोडन्यासाठी जिवाचं रान करू. आगामी निवडणुकीत मत विकू नका.

यावेळी फुलेपिठावर महंत तुकाराम महाराज, माजी राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते, राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनिलदादा बंडगर, सांगली जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब थोरात, लक्ष्मण सरगर, प. महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील, जत तालुकाध्यक्ष बंडू डोंबाळे, जत शहराध्यक्ष भूषण काळगी, अखिल नगारजी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025